mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार दि. २० मार्च २०२६

गुढीपाडवा आर्थिक संस्थांच्या पथ्यावर

तालुक्यातील संस्थांकडे एकाच दिवशी २० कोटींवर ठेवी जमा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे साडेतीन मुहूर्तांपैकी महत्त्वाचा मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याचे औचित्य साधून आर्थिक संस्थांनी उघडलेल्या ठेव संकलन मोहिमेस ठेवीदारांकडून उत्फूर्त प्रतिसाद मिळाला. २० कोटींवर एकाच दिवशी ठेवी संकलित झाल्या आहेत.

दि आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक …

आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. (मल्टी-स्टेट) या बँकेने यंदाच्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर ठेवींचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. बँकेत एकाच दिवसात १,४७९ नवीन खाती उघडून तब्बल ८ कोटी ४७ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागात विस्तारलेल्या या बँकेवर ग्राहकांनी दाखवलेल्या दृढ विश्वासामुळेच हे यश मिळाल्याचे बँकेने म्हटले आहे. ​१८९६ कोटींचा एकूण व्यवसाय ​बँकेच्या सद्यस्थितीतील प्रगतीचा आढावा घेतल्यास, बँकेकडे सध्या १,१२८ कोटी रुपयांच्या ठेवी असून ७६८ कोटी रुपयांची कर्जे आहेत. यामुळे बँकेचा एकूण मिश्र व्यवसाय १,८९६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या यशाबद्दल बँकेचे चेअरमन व अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख मा. श्री. अशोकअण्णा चराटी, व्हा. चेअरमन मा. श्री. संजय चव्हाण व संचालक मंडळाने सर्व ठेवीदार, सभासद आणि हितचिंतकांचे आभार मानले असून
​विविध कर्ज योजना आणि सवलती
​बँकेमार्फत केंद्र व राज्य शासनाच्या विविध  योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.

स्वामी विवेकानंद पतसंस्था

 

आजरा येथे स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या., आजरा या संस्थेने गुढीपाडव्याच्या मंगल पर्वावर ३ कोटी ५५ लाख २० हजार ३५० रुपयांच्या विक्रमी ठेव संकलनाचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. संस्थेने अवघ्या एका दिवसात तब्बल ३ कोटी ५५ लाख २० हजार ३५० इतके ठेव संकलन करत संस्थेच्या आर्थिक बळकटीकरणाचा व आपल्या विश्वासार्हतेचा ठसा उमटवला आहे.

संस्थेच्या संचालक मंडळाच्या नियोजनबध्द कार्यपध्दती आणि सभासदांच्या विश्वासामुळेच हे विक्रमी ठेव संकलन करणे साध्य झाल्याचे संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी यांनी सांगितले.संस्थेचे सभासद, ठेवीदार, ग्राहक, हितचिंतक यांनी संस्थेवर दाखविलेल्या प्रचंड विश्वासाबद्दल व कर्मचारी यांनी ठेव संकलनासाठी केलेल्या विशेष परिश्रमाबद्दल संस्थेचे चेअरमन दयानंद भुसारी, व्हा. चेअरमन, सुधीर कुंभार, सरव्यवस्थापक अर्जुन कुंभार व संचालक मंडळ यांनी सर्वांचे आभार मानले.

जनता सहकारी गृहतारण संस्था

जनता सहकारी गृहतारण संस्था मर्या.,आजरा संस्थेमध्ये गुढीपाढव्या निमित्त ७ शाखांमध्ये मिळून तब्बल १ कोटी ३५ लाख ९१ हजार इतक्या ठेवींचे संकलन झाले, अशी माहिती जनता सह गृ आताहतारण संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांनी दिले.

आजरासह गडहिंग्लज, कोल्हापूर, गारगोटी, इचलकरंजी, सांगली, पाटणे फाटा (ता. चंदगड) या शाखेमधून ठेवी जमा झाल्या असून संस्थेचे संचालक मंडळ, सर्व शाखांचे संचालक मंडळ व मुख्य कार्यालय अधिकारी, सर्व शाखांचे शाखाधिकारी व स्टाफ यांनी विशेष प्रयत्न करुन ठेवीचे संकलन केले.

शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था

शिक्षणतपस्वी जे.पी. नाईक नागरी सहकारी पतसंस्था मुख्य कार्यालय व दोन शाखा मिळुन आपल्या प्रगतीचा आलेख उंचावत एकाच दिवसात १ कोटी ६० लाख रुपयांच्या ठेवी जमा करण्याचा विक्रम केला आहे.

सभासद आणि ग्राहकांनी संस्थेवर दाखवलेल्या अढळ विश्वासामुळेच हे यश शक्य झाले असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर संस्थेने विशेष ठेव योजना राबवली होती, ज्याला ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संस्थेची पारदर्शक कारभार पद्धत आणि ग्राहकांसाठी असलेल्या आकर्षक व्याजदरामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक झाली.याप्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ, जनरल मँनेजरआणि कर्मचारी उपस्थित होते.

सतीश लांडे यांचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गजरगाव ता. आजरा येथील सतीश केरबा लांडे वय ( ३० वर्षे ) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने काल गुरुवारी निधन झाले. उत्कृष्ट आचारी व गोठा पालनामध्ये अभ्यासक असणारे लांडे हे अत्यंत मनमिळावू स्वभावाचे होते.

त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. ऐन गुढीपाडव्या दिवशी ट्रॅक्टर चालवत असताना घडलेल्या सतीश यांच्या मृत्यूच्या घटनेमुळे गजरगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पोश्रातवाडीत आग


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

पोश्रातवाडी येथील शिप्पूर मार्गावर असणाऱ्या माळावरील गवत गंजीनाज्ञ लागलेल्या आगीमध्ये नरसु शिंदे यांचे गवत जळून खाक झाली.कांही काजूची झाडे पण जळून गेल्याने शिंदे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी…… सभापती सौ. जयश्री गाडे


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

स्वच्छ भारत मिशन टप्पा -२ अंतर्गत तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांचे करिता तालुका स्तरीय एक दिवशीय कार्यशाळा पार पडली.

स्वच्छता ही आपल्या जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आपण ज्या वातावरणात राहतो ते स्वच्छ असेल तर आपले आरोग्य चांगले राहते. अस्वच्छतेमुळे अनेक रोग पसरतात, त्यामुळे स्वच्छता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.आपल्या देशात स्वच्छ भारत मिशन सुरू करण्यात आले आहे. या अभियानाचा उद्देश प्रत्येक गाव आणि शहर स्वच्छ ठेवणे हा आहे. विशेषतः ग्रामीण भागात शौचालयांचा वापर वाढवणे, कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करणे आणि लोकांमध्ये स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करणे यावर भर दिला जातो. घरातील ओला व सुका कचरा वेगळा केला पाहिजे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. आपण स्वतः स्वच्छ राहिलो आणि इतरांनाही स्वच्छतेचे महत्त्व सांगितले, तर आपले गाव, आपला देश नक्कीच स्वच्छ बनेल. “स्वच्छता हीच सेवा” मानून सर्वांनी योगदान दिले पाहिजे असे प्रतिपादन सभापती सौ. जयश्री गाडे यांनी उद्घाटन प्रसंगी बोलताना केले.

यावेळी उपसभापती सौ. यशोदा पोवार, जि. प. सदस्य श्री. सुधीर देसाई, पं.स.सदस्य श्री. विकास चोथे , श्री. समीर पारधे यांनी मनोगते व्यक्त केली.

सर्व सरपंच व सदस्य यांनी अशा प्रशिक्षणामध्ये सहभागी होऊन आपले गावात शाश्वत स्वच्छता राखणेसाठी कार्य करावे,असे जि. प. सदस्य श्री. सुधीर देसाई यानी सूचित केले.प्रशिक्षक श्री. धनाजी गुरव, श्री. राम पाटील जिल्हा तज्ञ यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

स्वागत व प्रास्ताविक सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. दिनेश शेटे यांनी केले.तालुका आरोग्य अधिकारी डॉ .श्री.रवींद्र गुरव, विस्तार अधिकारी श्री.मासाळ, श्री.गवळी, श्री चव्हाण तसेच विविध गावचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी, पाणी व स्वच्छता विभागाकडील गट/समूह समन्वयक श्री सर्जेराव घाटगे, श्री. कुंडलिक शिर्सेकर, डाटा ऑपरेटर स्वाती जाधव, पाणी गुणवत्ता सल्लागार सुहास डोंगरे, सुनिल अस्वले, तालुका स्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . गटविकास अधिकारी श्री. सुभाष सावंत यांनीही मार्गदर्शन केले .

सूत्रसंचालन श्री.एकनाथ गिलबिले यांनी केले.

तरुणांनी विधायक उपक्रम राबवावेत जि.प.सदस्य सुधीर देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

व्यसनाधीनतेपासून दूर राहून तरुणांनी आरोग्य जपण्यासह विधायक उपक्रम राबवावेत असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सुधीर देसाई यांनी केले.

श्री कलेश्वर तरुण मंडळ वेळवट्टी यांचा २४ वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. जि.प.सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सुधीर देसाई यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

निधन वार्ता
मुबारक इंचनाळकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

नाईक गल्ली, आजरा येथील मुबारक जैदूद्दीन इंचनाळकर ( वय ५६ वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवारी पहाटे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी विवाहित मुलगी जावई दोन मुले असा परिवार असून दफनविधी दुपारी दोन वाजता आहे.

आजचे पंचांग

दिनांक : २० मार्च २०२६
वार : शुक्रवार

माह (अमावस्यांत) : चैत्र
माह (पूर्णिमांत) : चैत्र
ऋतु : वसंत
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया तिथी (२१ मार्च पहाटे ०२.३० पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : रेवती नक्षत्र (२१ मार्च पहाटे ०२.२६ पर्यंत) त्यानंतर अश्विनी नक्षत्र
योग : ब्रह्म योग (रात्री १०.१४ पर्यंत) त्यानंतर इन्द्र योग
करण : बलवा करण (दुपारी ०३.४३ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : मीन राशी (२१ मार्च पहाटे ०२.२७ पर्यंत) त्यानंतर मेष राशी
सूर्य राशी : मीन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ११.१६ ते दुपारी १२.४६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.२२ ते दुपारी ०१.१०
सूर्योदय : सकाळी ०६.४४
सूर्यास्त : सायंकाळी ०६.४८
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

छायावृत्त…

पुढे धोका आहे…
आजरा  पेरणालीमार्गे गारगोटी रस्त्याची पहिल्याच पावसात दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहन चालकांना सावध होण्याची आवश्यकता आहे.

स्थळ : कमल कुंज अपार्टमेंट समोर.

 

संबंधित पोस्ट

पाऊस थांबता थांबेना… आजऱ्यातील परिस्थिती …व्यंकटराव”च्या शिक्षिका भारती कांबळे यांना आंतरराज्य पुरस्कार…आजरा महाविद्यालयात झिम्मा फुगडी उत्साहात..वर्षभरात 500 कोटीच्या अँटिबायोटिक औषधांची खरेदी ! कोणताही विचार न करता भारतीय करत आहेत औषधांचा उपयोग

mrityunjay mahanews

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये चराटी-शिंपी यांचे महाविकासआघाडी समोर कडवे आव्हान राहणार….

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीच्या सभापती निवडी बिनविरोध

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गडहिंग्लज आजरा चंदगड परिसर वृत्त –मसोली येथे गव्यांचा धुमाकूळ, आवंडी धनगर वाड्यावर बिबट्याचा शेळीवर हल्ला व इतर बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!