शुक्रवार दि.२० फेब्रुवारी २०२६

शिवजन्मोत्सव..२०२६
अखिल भारतीय मराठा संघ
आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मराठा महासंघाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.प्रथम स्वागत व प्रास्ताविक संभाजी इंजल कार्याध्यक्ष मराठा महासंघ यांनी केले छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पूजन तालुका अध्यक्ष बंडोपंत चव्हाण व जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, उपनगराध्यक्ष सौ. पूजा अश्विन डोंगरे यांच्या हस्ते व नगरसेविका सौ. अश्विनी चव्हाण, अनिकेत चराटी असिफ सोनेखान व डॉ.स्मिता कुंभार आणि मंडळाचे सदस्य यांच्या उपस्थितीत पार पडला.
यावेळी शरण्या कुंभार , सिद्धि नाईक व स्वराली ओतारी या मुलींनी शिवगर्जना व ध्येयमंत्र सादर केला. डॉ. गौरी भोसले यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रसंगासंदर्भात छत्रपतींच्या कार्याबद्दल मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनी रिया संतोष पारपोलकर हिने हिरकणीने आपली सुटका कशी करून घेतली याबद्दल नाट्य सादर केले. याबरोबरच स्वराली सागर सावंत हिने पन्हाळगडाच्या वेढ्यातून छत्रपती सहीसलामत सुटण्यासाठी शिवा काशिदनी जी भूमिका वठवली. आपले बलिदान देशासाठी दिली याचे सादरीकरण केले महिला लेझीम सादरीकरण मध्ये मुरुडे संघ व मसोली संघ यांनी भाग घेतला . प्रामुख्याने उपाध्यक्ष शंकरराव शिंदे,शिवाजीराव पाटील, सरचिटणीस प्रकाशराव देसाई विष्णू सुपल, दत्तात्रय मोहिते, सी.डी. सरदेसाई, गणपती गणपतराव डोंगरे, शिवाजीराव इंजल, चंद्रकांत पारपोलकर, सी.आर. देसाई, राजेंद्र सावंत, धनश्री देसाई, महादेव पोवार, भाऊसो निर्मळे, आनंदा गावडे, राजू होलम उपस्थित होते.

व्यंकटराव शिक्षण संकुल

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील व्यंकटराव शिक्षण संकुलामध्ये जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन आजरा महाल शिक्षण मंडळचे संचालक श्री सुधीर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संचालक श्री पांडुरंग जाधव ,श्री सचिन शिंपी ,श्री विलास पाटील उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे बद्दल प्राध्यापक केतन सुतार यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट मांडला.त्यानंतर व्ही.टी.कांबळे यांनी छ. शिवाजी महाराजांची शौर्यगाथा आपल्या स्वरचित काव्यातून म्हणून दाखवली
यावेळी प्राचार्य एम. एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री. एम. ए. पाटील, प्राथमिक मुख्याध्यापक श्री. आर. व्ही. देसाई सीनिअर कॉलेज विभाग प्रमुख श्री. शखामकर , सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आजरा हायस्कूल

आजरा : मृत्युंजय महान्युज वृत्तसेवा
आजरा हायस्कूल,येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक श्री.अजित तोडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीपूजनाने झाली. यावेळी सौ. विद्या हरेर यांनी छत्रपती शिवरायांचा जीवनपट, शौर्य आणि पराक्रम विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडला. शिवरायांनी दाखवलेली एकता, शौर्य व नीतिमत्ता हीच खरी शक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक सौ. एच. एस. कामत, पर्यवेक्षक श्री. ए. आर. व्हसकोटी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज व्यायामशाळा होनेवाडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
होनेवाडीत राजर्षि शाहू व्यायामशाळेच्या वतीने शिवजयंती उत्सव जल्लोषात साजरा
करण्यात आला.
उत्सवाची सुरुवात श्री प्रतापराव गुजर स्मारक येथून शिवज्योत आणून करण्यात आली. त्यानंतर गावातून भव्य शिवजयंती मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मुलींच्या पारंपरिक वेशभूषेतील लेझीम पथकाने विशेष आकर्षण ठरले. तसेच लहान मुली, महिला भगिनी आणि ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. मुलांच्या मार्फत दिल्या गेलेल्या शिवगर्जनांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले.
मिरवणुकीनंतर रवळनाथ मंदिर येथे छत्रपती शिवरायांच्या मूर्तीचे पूजन होणेवाडीच्या सरपंच मा. श्रीमती प्रियंका चंद्रकांत आजगेकर व उपसरपंच सौ संगीता विश्वास सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थान कमिटीचे अध्यक्ष नारायण कातकर, संस्थापक अध्यक्ष कृष्णा पाटील व उपाध्यक्ष शामराव कातकर यांच्या हस्ते शिवज्योतीचे पूजन करण्यात आले.
यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष श्री. कृष्णा सुतार, श्री.मारुती पाटील यांनीही प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य, देवस्थान कमिटीचे अध्यक्ष, पोलीस पाटील, ज्येष्ठ नागरिक कमिटीचे अध्यक्ष, राजर्षी शाहू व्यायामशाळेचे सर्व संस्थापक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
व्यायामशाळेचे अध्यक्ष रमेश पाटील व संस्थापक सदस्य संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारिणी अध्यक्ष सुजल पाटील, उपाध्यक्ष श्रेयश पाटील, सचिव सिद्धार्थ कातकर, खजिनदार पारस कातकर तसेच पंकज कातकर, अभिषेक पाटील, आदिनाथ पाटील, ऋग्वेद कातकर, साहिल शेंडे, रोहित शेंडे, गिरीश आजगेकर,युवराज पाटील, प्रविण कातकर , अक्षय सुतार, अक्षय आसबे, सार्थक पाटील, सक्षम पाटील,अनुच पाटील,अथर्व शेंडे, गौरव सुनील पाटील, संकेत पाटील व आयुष पाटील ,तेजस आजगेकर या सर्व कार्यकर्त्यांनी उत्सव यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
चाफवडे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
चाफवडे, तालुका आजरा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवप्रतिमेचे पूजन श्री. जयवंत मसणु सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवीन चाफवडे ग्रामस्था तर्फे करण्यात आले. याप्रसंगी चाफवडे गावचे माजी सरपंच विलास धडाम, मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग धडाम, सुनील धडाम, किणेचे माजी सरपंच सुरेश गिलबिले, उपसरपंच सखाराम केसरकर, तुकाराम बामणे, विठ्ठल बामणे, विष्णू मांजरेकर, अमोल सुतार, गणपती पाटील आदी उपस्थित होते.

तिघांना दोन दिवसांची पोलीस कोठडी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मंगळवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास वझरे (ता. आजरा) येथे बंद घर फोडून संगनमताने चोरी करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या राजवर्धन दत्तात्रय मांडरे (रा. कर्पेवाडी), प्रेम अनिल कांबळे (रा. वझरे) आणि अभिजीत अमृत आरेकर ( रा. उत्तूर, ता. आजरा ) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर आजरा न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
यापूर्वी उत्तूर,धामणे, चिमणे परिसरात घडलेल्या चो-यांच्या तपासाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा सक्रिय झाली आहे. याप्रकरणी काजू उद्योग प्रक्रिया कामगारांसह आणखी तिघांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे समजते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

आजरा साखर कारखान्यातील दोन कामगारांच्या वारसांना आर्थिक मदत

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याने आपल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी कारखाना व कर्मचारी यांनी संयुक्तपणे न्यू इंडिया कंपनीचा अपघाती विमा योजना सुरू केली आहे. या विमा योजनेतून कारखान्याच्या अपघाती निधन झालेल्या प्रकाश घेवडे, सुहास बुगडे यांच्या वारसांना प्रत्येकी रू. १० लाख आर्थिक मदतीचा धनादेश सुपूर्द केला.
यावेळी कारखान्याचे अध्यक्ष मुकुंदराव देसाई, उपाध्यक्ष सुभाष देसाई, ज्येष्ठ संचालक वसंतराव धुरे, जि.प.सदस्य सुधीर देसाई, संचालक अनिल फडके, मारुती घोरपडे, उदय पवार, सौ.रचना होलम, सौ. मनीषा देसाई, पं.स. सदस्या सौ. यशोदा पोवार कार्यकारी संचालक संभाजीराव सावंत यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिवजयंती फोटो क्लिक





पाणी वेळेत द्या…
महीलांची मागणी नगरपंचायत, नगरसेवकाना निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायतीच्या नवीन जलवाहीनी टाकण्याचे काम सुरु असल्याने सध्या शहरातील पाण्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. शहरातील काही गल्यामधे रात्री अपरात्री पाणी येत असल्याच्या नागरीकांच्या तक्रारी आहेत. दीडबाग काॉलनीतही हीच अवस्था असल्याने प्रसे पाणी मिळत नसल्याने नागरीकांचे हाल होत आहे. या कालनीत पूर्वीप्रमाणे पिण्याचे पाणी सोडावे. अशी मागणी कालनीतील महीलांनी केली आहे. याबाबतचे निवेदन आजरा नगरपंचायत व प्रभागातील नगरसेविका प्रभावती कांबळे यांना दिले आहे.
निवेदनात म्हंटले आहे की, नगरपंचायतीकडून पहाटे पाच वाजता या कालनीत पिण्याचे पाणी सोडले जात होते. सध्या कधी सायंकाळी, सकाळी तर कधी द्वारी पाणी येत आहे. यामुळे महिलांची तारांबळ उडत आहे. सध्या रमजानचा महिना सुरु आहे. सायंकाळी पावणे सहा वाजता रोजा इफ्तार करण्याची वेळ आहे. याच वेळेला दीडबाग कॉलनीतील पाणी सोडण्याची नवीन वेळ निर्धारित केल्याचे समजते. त्यामुळे सर्वांना अडचण होणार आहे. त्यामुळे या कशॉलनीत पूर्वीच्या वेळापत्रकानुसार पहाटे पाच वाजता पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. येथील प्रभागाच्या नूतन नगरसेविका श्रीमती कलावती कांबळे यांना भेटून त्यांनी निवेदन दिले आहे.




