mrityunjaymahanews
अन्य

Breaking

सोमवार  १६ जून २०२५       

नवदाम्पत्याचा अपघाती मृत्यू


         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      महिनाभरापूर्वी विवाह झालेल्या शिवाजीनगर, आजरा येथील सागर सुरेश करमळकर ( वय ३२ वर्षे ) व सुषमा सागर करमळकर (वय २६ वर्षे ) यांचा गॅस गिझरच्या लिकेजमुळे गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की…

       महिनाभरापूर्वी विवाह झालेले करमळकर दाम्पत्य हे फिरण्यासाठी आंबोली येथे रविवारी दुपारच्या दरम्यान गेले होते. आंबोलीहून परतल्यानंतर त्यांच्या भावेश्वरी कॉलनी येथील नवीन घरामध्ये असताना त्यांचा फोन उचलला जात नव्हता. कालांतराने फोन स्विच ऑफ झाल्याने मित्र परिवाराने सोमवारी सकाळी त्यांच्या घरी भेट देऊन माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता गॅस गिझरचा गॅस कोंडून बाथरूम मध्येच त्यांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे निदर्शनास आल्याचे समजते. घरामध्ये सर्वत्र गॅसचा वास होता. त्यामुळे गॅस लिकेजनेच सदर मृत्यू झाल्याची चर्चा परिसरात होती.

       प्रचंड मित्रपरिवार असणाऱ्या सागरच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात आई व भाऊ असा परिवार आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्यासह पोलीस दाखल झाले आहेत.

          महिनाभरापूर्वी विवाह

     सागर याचा वीस मे रोजी आजरा येथील अण्णाभाऊ सभागृहांमध्ये मोठ्या थाटामाटात विवाह झाला होता. महिन्याभरात सदर दुर्दैवी घटना घडली.

          कष्टातून उभारलेल्या सागर चा दुर्दैवी मृत्यू

     कोरोनामध्ये वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पश्चात सागरने मोठ्या कष्टाने व्यवसाय करत जम बसवला होता. संपूर्ण करमळकर कुटुंबीयांवर या प्रकाराने शोककळा पसरली आहे.

 

संबंधित पोस्ट

जाहीर आघाडीशी आमचा कोणताही संबंध नाही…. शिंदे गटाचा खुलासा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

News

mrityunjay mahanews

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

mrityunjay mahanews
error: Content is protected !!