मंगळवार दिनांक ४ फेब्रुवारी २०२५

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेवराव पाटील…
डी.ए.पाटील उपाध्यक्षपदी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेवराव पाटील/धामणेकर यांची तर उपाध्यक्षपदी दौलती उर्फ डी.ए.पाटील (कोरीवडे)यांची बिनविरोध निवड करण्यात आली.निवडीच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक निबंधक सुजयकुमार येजरे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक पार पडली.
बैठकीत अध्यक्षपदी महादेवराव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी दौलती उर्फ डी.ए.पाटील यांची निवड करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना तालुका संघाला आणखी प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे नूतन पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
यावेळी मुकुंदराव देसाई, वसंतराव धुरे, सुधीर देसाई,विष्णुपंत केसरकर, उदय पवार, अनिल फडके,विक्रम देसाई,राजू होलम, विठ्ठलराव देसाई, एम.के.देसाई, सौ.राजलक्ष्मी देसाई, मधुकर येल्गार,गणपतराव सांगले, महादेव हेब्बाळकर,महेश पाटील, रवींद्र होडगे,ज्ञानदेव पोवार, गणपती कांबळे, जोतिबा चाळके, संजय उत्तूरकर,सौ.माया पाटील,अमित सामंत, जयराम संकपाळ,भाऊसो किल्लेदार, व्यवस्थापक जनार्दन बामणे उपस्थित होते.
गणपतराव सांगले यांनी आभार मानले.

‘अन्याय निवारण’ चा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनासमोर शंख ध्वनी
संतप्त शहरवासीयांकडून अधिकारी ,कर्मचारी धारेवर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
लेंड ओहोळ, वडाचा गोंड या नाल्यामधील सांडपाणी थेट नदीत मिसळत असल्याने काविळीच्या रुग्णांची शहरासह परिसरातील गावात संख्या वाढली आहे. त्याचबरोबर आजरा शहरात पाण्याचे वेळापत्रक कोलमडले असून शहरवासीयांना दोन दिवसा आड पिण्याचे पाणी मिळत आहे.याबाबत आज आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती आक्रमक पावित्रा घेत अधिकान्यांना धारेवर धरत जाब विचारला आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी केबीन समोर चार तास ठिय्या ठोकून शंखध्वनी आंदोलन केले. पूढील महीन्यात ३१ मार्च पर्यंत शहरवासीयांना शुध्द पाणी देण्याची लेखी ग्वाही नगरपंचायत प्रशासनाने दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी उपस्थित नागरीकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त करीत संताप व्यक्त केला. शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळत असून काविळ रुग्णांची संख्या वाढली आहे. मुरुडे, बुरुडे, हात्तीवडे, बोलकेवाडी या गावाना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. आजरा नगरपंचायतीच्या दुर्लक्षामुळे काविळ रुग्णांची संख्या वाढल्याचा आरोप अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे यांनी केला. याबाबत कोणती कार्यवाही केली ? अशी विचारणा बांधकाम विभागाचे अभियंता प्रविण बैले, आरोग्य निरीक्षक अमर कांबळे यांना करत जाब विचारला .अधिकारी केवळ लेखी ग्वाही देतात.कार्यवाही करीत नाहीत असा आरोप दयानंद भोपळे, महेश दळवी, पांडुरंग सावरतकर, बंडोपत चव्हाण, गुरु गोवेकर, दिलीप महाडीक यांनी केला. त्यांनी अधिका-यांवर प्रश्नाची सरबत्ती केली. बांधकाम अभियंता श्री. बैले, आरोग्य निरीक्षक श्री. कांबळे, वरिष्ठ कारकून संजय यादव यांनी उपस्थितांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
कार्यवाहीबाबत अधिकारी जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाहीत तोपर्यंत जागेवरून उठणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला. लेखी पत्रानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. विश्वनाथ कोरे, कोगेकर, बुरुडेचे माजी सरपंच विनायक गिरी, मंडोली सरपंच विलास जोशीलकर, हेमंत गिलबीले, शंकरराव शिंदे, दिनकर जाधव, नाथा सावंत, आकाश पाटील, शरद कोगेकर, उदय कोरे, विश्वनाथ कोरे, महेश दळवी,अशोक गाइंगडे, बंडोपंत चव्हाण, गुरु गोवेकर, यासह पदाधिका-यांनी आंदोलनात सहभाग घेतला.
अन्याय निवारण समितीचे आरोप…
♦ नगरपंचायतीचे अधिकारी खोटे बोलतात. खोटे लेखी पत्र देतात.
♦ नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना हाताळणारे बोलवते धनी वेगळेच आहेत.
♦ कर्मचाऱ्यांवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण नाही.
♦ शहरातील टँकर पाणीपुरवठा धारक व पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी यांची मिली भगत
♦ कर नगरपंचायतीला, पाणीपुरवठा बुरुडे ग्रामपंचायतीकडून… अशी पटेल कॉलनीवासीयांची अवस्था
♦ शहरात रोगराई पसरायला नगरपंचायत जबाबदार…

शासनाला हिसका दाखवण्यासाठी मुंबईत ६ मार्चला मोर्चा काढणार… काॅ. अतुल दिघे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आमच्या पाच पिढ्या मुंबईत राबत आहेत. त्यांच्या श्रमामुळे मुंबईला सोन्याचे दिवस आले आहेत. एके काळी अडीच लाख गिरणीकामगारानी संप केला तर संपूर्ण जन जीवन विस्कळीत होत होते.आमच्या हक्काच्या जागेवरच घरे मिळाली पाहीजेत. ती कशी उपलब्ध होऊ शकतात याचे निवेदन महाराष्ट्रातील आमदार व मंत्र्यांना दिले आहे. त्याची जाणीव करून देण्यासाठी व गिरणी कामगारांच्या रोषाचा हिसका दाखवण्यासाठी मुंबईत ६ मार्चला मोर्चा काढणार असलेचे मत आजरा येथील किसान भवन मध्ये झालेल्या गिरणीकामगार मेळाव्यात काॅ. अतुल दिघे यांनी व्यक्त केले.
स्वागत व प्रास्ताविक नारायण भंडागे यांनी केले, यावेळी काॅ. दिघे यांनी पुढे बोलताना मुंबईतील गिरणीच्या शिल्लक जागा भांडवलदाराना विकल्या जात आहेत, त्यामध्ये गिरणीकामगाराचा हिस्सा असून, आम्ही हक्कचे मागतो आहोत. शासन लोकांची दिशाभूल करीत आहे. पालकमंत्र्यानी आमच्या प्रश्नांची निर्गत केली तर त्यांची गारगोटी येथे हत्तीवरून मिरवणूक काढू. आम्ही आमदार, मंत्र्यांच्या विरोधात नसून, शासनाच्या विरोधात लढतो आहोत.
काॅ.धोडिबा कुंभार म्हणाले, जे मंत्री आमचा प्रश्न सोडवतील त्यांचा भोई व्हायची आमची तयारी आहे. काॅ.शांताराम पाटील यांनी संघटनांची ताकद मोलाची असून कामगारांना लढल्याशिवाय काहीच मिळाले नाही. मंत्री आबीटकर यांनी घरासाठी प्रश्न लावून धरले हे आम्ही विसरणार नाही. शासनाने मुंबई बाहेर घरे देण्याचा जीआर रद्द करावा. शेलो वांगणी या आदिवासी भागातील घरे घेऊन कामगारांचे भले होणार नाही. तरी कामगारांनी संघटनेत ताकतीने उतरण्याचे आवाहन केले. यावेळी चंदगड तालूका अध्यक्ष काॅ. गोपाळ गावडे, काॅ.संजय घाटगे यांनी मनोगत व्यक्त केली.या मेळाव्यास नारायण राणे, हिंदूराव कांबळे, मनपा बोलके, रघुनाथ कातकर, जोतीबा सासुलकर, काशिनाथ मोरे, बाबू केसरकर, जे. के. सावंत, राजश्री कुंभार, अनिता बागवे, प्रभावती राणे याच्यासह तालुक्यातील महिला व गिरणीकामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार निवृत्ती मिसाळे यांनी मानले.

आत्महत्येवर सहृदयी संवाद व प्रबोधन हाच प्रभावी उपाय : इमरान शेख

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आत्महत्या हा अतिशय गंभीर आणि तितकाच संवेदनशील विषय असो सहृदयी संवाद व प्रबोधन हाच प्रभावी प्रभावी उपाय असल्याचे प्रतिपादन ‘अवनी’चे इमरान शेख यांनी केले.आजरा महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर अग्रणी महाविद्यालय योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी क्लस्टर अंतर्गत ‘बदलती सामाजिकता आणि युवकांच्या आत्महत्या’ या विषयावर एक दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इमरान शेख बीजभाषक म्हणून बोलत होते.
ते पुढे म्हणाले, जगभरामध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत असून, १५ ते ३० या तरुण वयोगटातील युवकांची संख्या लक्षणीय व तितकी चिंताजनक आहे.
वाढते मानसिक ताण-तणाव, पालकांच्या अवास्तव अपेक्षा, प्रेम आणि व्यवसायातील अपयश, बेरोजगारी ही आत्महत्येची प्रमुख कारणे असली तरी प्रत्येक आत्महत्येमागील परिस्थिती भिन्न असते. त्यांच्यासह अवनीमधील त्यांच्या ‘स्माईल टीमचे’ सहकारी जयश्री कांबळे, शाहरुख आटपाडी, कौशल्य आग्रे आणि विक्रांत जाधव यांनीही या कार्यशाळेतील चर्चासत्रात सहभाग घेत मार्गदर्शन केले.
कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे व मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला जलार्पण करून झाले. डॉ. अविनाश वर्धन यांनी स्वागत करून प्रास्ताविकात कार्यशाळेचा हेतू विषद केला. यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, उपप्राचार्य प्रा. डी. पी. सकपाळ, डॉ. एम. आर. ठोंबरे, प्रा. रमेश चव्हाण, डॉ. संजय चव्हाण तसेच क्लस्टर महाविद्यालयामधील विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन डॉ. सलमा मणेर यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. स्वप्निल जाधव यांनी कार्यशाळेचे आभार मानले.


वन्य प्राण्यांमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत बहुजन मुक्ती पार्टीचे निवेदन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या समस्यांचे निराकरण करण्यासंदर्भात परिक्षेत्र वन अधिकारी आजरा यांना निवेदन देण्यात आले. यावेळी तेथील कर्मचाऱ्यांशी वन्य प्राण्यांमुळे होणारा त्रास पिकांचे नुकसान याबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.
यावेळी किरण के. के., अमित सुळेकर, मा. काशिनाथ मोरे, रवी देसाई, डॉ. सुदाम हरेर, सुरेश दिवेकर व डॉ. उल्हास त्रिरत्ने उपस्थित होते..

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे शालेय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. सौ. शुभांगी गजानन वायंगणकर यांचे स्मृतिप्रीत्यर्थ आजरा तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी गुरूवार, दिनांक १३ फेब्रुवारी, २०२५ रोजी नाट्यछटा स्पर्धा आयोजित केली आहे. इयत्ता पहिली ते पाचवी व सहावी ते दहावी या दोन गटात या स्पर्धा होणार आहेत. दोन्ही गटातील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना अनुक्रमे रोख रूपये ५०१, ४०१, ३०१ स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे.
नाट्यछटा सादरीकरणासाठी ५ मिनीटे वेळ देण्यात येणार आहे. नाट्यछटा सादर करताना कोणत्याही नाटकातील स्वगत सादर करता येणार नाही स्पर्धकांनी संगीत, पार्श्वसंगीत, मेकअप, बाहयसजावट इत्यादी बाबींचा वापर करणेचा नाही स्पर्धेसाठी अभिनय, संवाद फेक, वेळेचे बंधन, एकंदरीत परिणाम या बाबींचा प्रामुख्याने विचार केला जाईल. स्पर्धकांची नावे शाळेमार्फत बुधवार, दिनांक १२ फेब्रुवारी, २०२५ पूर्वी पाठवावीत असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी यांनी केले आहे.

निधन वार्ता
गंगुबाई सावंत

गोठण गल्ली,आजरा येथील गंगुबाई बंडू सावंत यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ९२ वर्षे होते.
त्यांच्या पश्चात पाच विवाहित मुले, तीन विवाहित मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
फोटो पूजन कार्यक्रम आज दिनांक ४ फेब्रुवारी रोजी आहे.


