mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

प्रजासत्ताक दिन २०२५  

पदोन्नती…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     आजरा येथील विजया पांडुरंग सांबरेकर यांची सहाय्यक फौजदारपदी तर पोलीस नाईक सुरेश जयवंत भदरगे व जयप्रकाश लक्ष्मण बेनके यांची हवालदार पदी पदोन्नती झाली आहे.

       सांबरेकर या सध्या निरीक्षक कक्ष, कोल्हापूर येथे कर्तव्यावर आहेत तर भदरगे व बेनके हे आजरा पोलीस ठाण्यात काम पाहत आहेत.

      प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सदर पदोन्नती करण्यात आल्याचे आदेश पारित झाले आहेत. तिघांचेसर्वत्र कौतुक होत आहे.

आजऱ्यात संविधान पूजन

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथे शिवसेनेच्यावतीने संविधान पूजन करण्यात आले. यावेळी संविधान बचाव देश बचाव अशा घोषणा देण्यात आल्या.

      उबाठाचे जिल्हा प्रमुख प्रा. सुनील शिंत्रे व आजरा साखर कारखान्याचे संचालक अशोक तर्डेकर यांच्याहस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाचे पूजन करण्यात आले.

       यावेळी जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मुकुंदराव देसाई, माजी नगरसेवक किरण कांबळे, सलिम लतीफ मंजूर मुजावर, दिनेश कांबळे, समीर चाँद, ओंकार माद्याळकर, दयानंद भोपळे, रवींद्र भाटले, डॉ. नवनाथ शिंदे यांच्यासह शिवसैनिक तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

‘गंगामाई’ तर्फे हळदी कुंकू व सुगम गायन स्पर्धा

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजराच्या वतीने कै. सौ. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ महिलांकरिता हळदी कुंकू व सुगम गायन स्पर्धेचे शनिवार दिनांक १ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजता वाचन मंदिराच्या सभागृहातआयोजन करण्यात आले आहे.

      स्पर्धेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रू. ७०१/- व प्रशस्तिपत्र, रोख रू. ५०१/- व प्रशस्तिपत्र, रोख रू. ३०१/- व प्रशस्तीपत्र आणि सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत.

      शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी २०२५ पर्यंत वाचनालयात नोंदवावीत . नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा, फोन नं. (०२३२३) २४४४७४ / ९७६४२७९५१४ शी संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

कानोली येथे आठवडी बाजार शुभारंभ…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     गवसे पाठोपाठ आता कानोली (ता. आजरा ) येथे ग्रामपंचायत प्रशासनमार्फत आठवडा बाजाराचा शुभारंभ सरपंच सौ. सुषमा सुभाष पाटील यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी उपस्थित व्यापारी वर्गांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. पहिल्याच दिवशी ग्रामस्थ व व्यापारी वर्ग यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला, भाजीपाला, किराणा व खाद्य पदार्थ यांचे स्टॉल लागले होते, खरेदीसाठी ग्रामस्थांनी गर्दी केली,

      यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्रीपतराव देसाई, सोसायटी चेअरमन दिलीप पाटील, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष शंकर पाटील, गजानन दूध संस्थेचे चेअरमन बाजीराव पाटील,ग्रा. प. सदस्य सुधीरकुमार पाटील, सौ. सारिका भोसले, चंद्रकांत पाटील यांच्यासह पंडितराव पाटील, राजू पाटील, तानाजी पाटील, जयसिंग पाटील, बळवंत पाटील, राजू आपगे, सूर्यकांत मुरुकटे, शामराव पाटील, चंद्रकांत पाटील, रंजना आपगे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते आभार सुभाष पाटील यांनी मानले.

उपचारासाठी सचिन मदतीच्या प्रतीक्षेत

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शिवाजी एकनाथ पाटील रा.धामणे यांचा १६ वर्षीय मुलगा सचिन हा विवेकानंद ऑलंपॅड निवासी शाळा मुरगुड येथे इयत्ता १० मध्ये शिकत आहे. २६ डिसेंबर रोजी उंच उडी मारत असताना मानेवर पडुन मज्जातंतूला दुखापत झाली.तो पडला त्यावेळेपासून संवेदना गेल्या.त्याला कोल्हापूर येथे लाईफ लाईन रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी जसलोक रुग्णालयात मुंबई येथे दाखल केले असून त्याच्या वर उपचार चालू आहेत. शिवाजी पाटील यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे.

       सचिनच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याची नितांत गरज आहे. आपल्या मदतीसाठी फोन पे गुगल पे नंबर ७२४९८२५९५८ वर मदत पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

निधन वार्ता
धनाजी साठे

       कोवाडे ता.आजरा येथील धनाजी अंतू साठे ( वय ५० वर्षे) यांचे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.

सौ.उषा चिमणे

        कोवाडे ता. आजरा येथील सौ. उषा संभाजी चिमणे (वय ४८ वर्षे) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी,मुलगा असा परिवार आहे.

शासकीय ध्वजारोण…

        प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी ९.१५ वाजता आजरा येथे तहसीलदार कार्यालयाच्या आवारात तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आज आजरा येथील रामतीर्थ यात्रा

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कीणे येथे भिंत कोसळून महिला ठार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!