mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार   दि. ६ जानेवारी २०२५    

सातव्यांदा आमदार होणार…
केंद्रात मंत्री होण्याची इच्छा... ना. हसन मुश्रीफ

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कागल विधानसभा मतदार संघात मोठ- मोठ्या नेत्यांनी उठाबशा व जोर बैठका मारत मुलगा होण्याआधीच बाळाच बारस घालून मंत्रीपदही बहाल केले होते. पण सर्वसामान्य जनतेसाठी केलेल्या कामाच्या जोरावर सहाव्यांदा आमदार तर नऊवेळा मंत्री होण्याची संधी मिळाली. सातव्यांदाही या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करू असा विश्वास व्यक्त करत  भविष्यात केंद्रात मंत्री होण्याची इच्छा वैद्यकिय मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली.

     वेळवट्टी (ता. आजरा) येथे वैद्यकिय मंत्री हसन मुश्रीफ यांचा जाहीर सत्कार झाला. माजी खासदार निवेदिता माने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, श्रुती काटकर, स्मिता गवळी, आजरा कारखाना अध्यक्ष वसंतराव धुरे, उपाध्यक्ष एम. के. देसाई, माजी सभापती विष्णुपंत केसरकर, तालुका संघाचे अध्यक्ष विठ्ठलराव देसाई प्रमुख उपस्थित होते.

     जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई यांनी स्वागत केले. प्रास्ताविकात ते म्हणाले, मंत्री मुश्रीफ यांनी विविध योजना तळागाळापर्यंत पोहचवून आदर्श घालून दिला. खाते कोणतेही असू देत त्यांचे सोने करण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राचा श्रावण बाळ म्हणून त्यांनी आपली ओळख निर्माण केली. जिल्हा बँक पुनर्जीवीत करण्याबरोबरच जिल्ह्यात अडचणीत असणारे साखर कारखाने मुश्रीफ यांच्या मदतीने सुस्थितीत येत आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी आजरा तालुक्याचे पालकत्व स्वीकारावे व तालुक्याकडे विशेष लक्ष द्यावे असेही त्यांनी स्पष्ट केले

     यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जनतेने घसघशीत साथ दिली असल्यामुळे जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रासह सर्वच क्षेत्रामध्ये असणारी विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपला प्रयत्न राहील सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य करण्यात साठी आपण अग्रभागी राहू वैद्यकीय शिक्षण मंत्री कसा असावा याचे उदाहरण भविष्यात मंत्री मुश्रीफ यांच्यासारखा असे उत्तर मिळण्याजोगे काम निश्चित करू असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आजरा साखर कारखान्याला यांची एनसीडीसी कडून १३३ कोटी रुपये मिळवून देण्याचा आपला प्रयत्न आहे परंतु कोणत्याही परिस्थितीत आजारात कारखान्याचे प्रतिदिन गाळप ५००० मे. टनापेक्षा जास्त करण्यासाठी संचालक मंडळाने प्रयत्न करावेत आपण त्यांच्या पाठीशी राहू असे आश्वासनही त्यांनी दिले.

     माजी खासदार श्रीमती माने म्हणाल्या, मुश्रीफ म्हणजे कर्तुत्व, नेतृत्व व दातृत्व याचा अनोखा संगम असून सर्वसामान्यांच्या हितासाठी ते झटत असतात. ना. मुश्रीफ यांच्या कामाची पद्धत निश्चितच कौतुकास्पद आहे. मतदारसंघाशी असणारी नाळ त्यांनी कधीही तोडलेली नसल्यामुळे सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी आहे.भविष्यात त्यांना उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळेल. अशी आशाही व्यक्त केली.

      यावेळी आजरा साखर कारखान्याच्या अध्यक्ष वसंतराव धुरे यांचेही भाषण झाले.

     यावेळी संभाजी पाटील, युवराज पोवार, शिवाजी नांदवडेकर, गणपती सांगले, रवि भाटले, रचना होलम, सुभाष देसाई, मधुकर यल्गार, मनिषा देसाई, भैरवी सावंत, दत्ता पाटील, विजय वांगणेकर, नामदेव नार्वेकर, डी. ए. पाटील, विक्रम देसाई, शिरीष देसाई, अबुताहेर तकिलदार , दीपक देसाई, महादेव पाटील, संजयभाऊ सावंत, रवी भाटले, विक्रम देसाई, धनाजी शिंदे ,निवृत्ती कांबळे, गोविंद पाटील, महादेव हेब्बाळकर,लहू पाटील, अंकुश पाटील, सुरेशराव होडगे, राजू होलम, दादासाहेब मोकाशी, संजय घाटगे, अनिकेत कवळेकर, गणपतराव सांगले, सुभाष देसाई, मधुकर येल्गार. बी.टी. जाधव, अनिल फडके, राजू मुरकुटे, जी.एम. पाटील, दत्ता पाटील, निसार दरवाजकर, इम्तियाज माणगावकर, भीमराव वांद्रे, आप्पासाहेब पाटील, संतोष पाटील, तहसीलदार समीर माने, वसंत पोवार, विजय कुंभार, अरविंद ठाणेकर, सिद्धार्थ तेजम, जयवंत मिटके, शंकर सुतार,दिगंबर देसाई, शोभा माने, नामदेवराव नार्वेकर, विजय वांगणेकर, राजू जोशीलकर, काशिनाथ तेली, विजय देसाई, कल्लेश्वर कला- क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते यांच्यासह विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित होते.

काळजी करू नका…

      केवळ मतदार संघातील नव्हे तर कोणतीही व्यक्ती गंभीर आजारी पडली तर काळजी करू नका. राज्यातल्या दर्जेदार रुग्णालयात तुमच्यावर मोफत उपचार करुन घरातून उपचारासाठी नेण्यापासून ते घरी पुन्हा व्यवस्थित पोहोचवण्याची जबाबदारी मी स्वीकारली आहे आणि ती सक्षमपणे पार पाडत आहे काळजी करू नका असे ना मुश्रीफ यांनी सांगितले. लाडक्या बहिणींनी विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नये. तुमच्या पैशांमध्ये कोणतीही कपात होणार नाही अथवा तुम्हाला यादीतून वगळले जाणार नाही याबाबत निश्चिंत रहा असेही सांगितले.

राज्यातील जनतेला अभिमान वाटेल असे काम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

आजरा येथे मंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांचा नागरी सत्कार

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सर्वसामान्य जनतेचे प्रेम व सहकार्य या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. यामध्ये आजरा तालुका वासीयांचे योगदान मोठे आहे. आतापर्यंत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेला अभिमान वाटेल असे काम केले आहे. मिळालेल्या आरोग्य मंत्री पदाच्या माध्यमातून जनतेला अभिमान वाटेल असेच काम केले जाईल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नाम. प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजीराव पाटील यांचा आजरा तालुक्यातील जनता व अण्णाभाऊ संस्था समूहाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.

      स्वागत व प्रास्ताविक करताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुक्याला तीन आमदार असून त्यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री आहेत हे तालुक्याचे भाग्य आहे. उत्तूर परिसर सुजलाम सुफलाम करण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. मंत्री आबिटकर यांनी आजरा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भरपूर काम केले आहे. शिवाजी पाटील यांनी गेली पाच वर्षे आमदार  नसतानाही काम केले. त्यामुळे या तिघांनाही लोकांनी भरपूर प्रेम दिले. मंत्री मुश्रीफ व आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा तालुक्याचा विकास होणार आहे. तालुक्यात एमआयडीसी विस्तारीकरण, मेडिकल कॉलेज, वन विभागाचे प्रश्न, काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग, रामतीर्थ पर्यटन स्थळ विकास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

      यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आजरा तालुक्याच्या विकासासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल. राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या हाती आहे ते चांगले काम करतील. आगामी काळात जिल्ह्याच्या आरोग्याचा बृहत आराखडा तयार करावा लागेल. निराधार योजनेची पेन्शनची रक्कम वाढवून लवकरच दोन हजार रुपये करण्यात येईल. दिवाळीपर्यंत कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण होईल. तसेच आगामी दोन वर्षात शेंडा पार्क मध्ये ११०० बेडचे हॉस्पिटल पूर्णत्वास जाईल. निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली कोणती योजना सध्याचे शासन बंद करणार नाही. राज्याच्या विकासाचा वेग कायम ठेवत कुणाला काही कमी पडणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल. आजरा तालुका अग्रेसर बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. स्व. काशिनाथ चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांचे कार्य आदर्शवत होते असे त्यांनी सांगितले.

      आरोग्य मंत्री आबिटकर पुढे म्हणाले, आजरा तालुक्याला समृद्ध करण्यासाठी ताकतीने व शक्तीने काम करणार कवा गावामध्ये आरोग्याच्या सुविधा देण्यासाठी आपण बांधील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

       आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, चंदगड सारख्या मतदार संघातून कोणतेही संस्थात्मक पाठबळ नसताना जनतेने आपणाला आमदार बनवले आहे चंदगडच्या विकासासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू विशेषत: आरोग्य व पर्यटन या विषयावर आपण येत्या पाच वर्षात काम करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या विजयामध्ये अण्णाभाऊ संस्था समूह व अशोक चराटी यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नम्रपणे नमूद केले.

      यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांचेही भाषण झाले.

      यावेळी साजरा कारखान्याचे संचालक वसंतराव धुरे, आजरा सूत गिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णादेवी चराटी, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, रमेश कुरुणकर, नगरसेविका सुमय्या खेडेकर,भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, सुधीर कुंभार, आतिश कुमार देसाई, सुरेश डांग, डॉ. अनिल देशपांडे, डॉ. दीपक सातोसकर, राजेंद्रभाऊ सावंत, आनंदा कुंभार रणजीत सरदेसाई, विजय थोरवत, दशरथ अमृते, विलासराव नाईक, वसंतराव धुरे, बाळासाहेब नाईक, शिरीष देसाई, जयवंत सुतार,दीपक देसाई, संदीप चौगले, अनिकेत चराटी, समीर पारदे, अभिजीत रांगणेकर, अश्विन डोंगरे, संतोष भाटले,धनंजय पाटील, मिलिंद गुरव, सुनील दिवेकर, मनीषा गुरव, दयानंद भुसारी, अरुण देसाई, संजय चव्हाण, दयानंद नेउंगरे, डॉ. सुरजित पांडव, नाथा देसाई, मंदार बिरजे, मारुती मोरे, संतोष डोंगरे, प्रकाश हरमळकर, परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर, राजू विभुते, गौरव देशपांडे, जितेंद्र भोसले, बंटी सूर्यवंशी, समीर मोरजकर, मायकल फर्नांडिस, काका देसाई, संतोष जाधव, रवी पारपोलकर, उमेश पारपोलकर, रवी हुक्केरी, समीर चांद, विलास भादवणकर, उदय चव्हाण, इंद्रजीत देसाई ,मयूर कुंभार, गौतम भोसले, विनोद जाधव,अमानुल्ला आगलावे, दिलावर चांद, गोविंद गुरव, रेश्मा सोनेखान, यास्मिन बुड्डेखान, महेश दळवी, असीफ पटेल यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी शहरवासीय महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      डॉ. अशोक बाचूळकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर विजयकुमार पाटील यांनी आभार मानले.

त्या आठवणीला उजाळा

      मंत्री मुश्रीफ हे १९९९ साली ज्यावेळी पहिल्यांदा मंत्री झाले त्यावेळी आपण कार्यकर्ता म्हणून त्यांच्या मिरवणुकीमध्ये सहभागी झालो होतो. स्वप्नात देखील आपण भविष्यात मंत्री होऊ असे वाटले नव्हते. परंतु सर्वसामान्यांच्या बळावर आपण मंत्रीपदावर पोहोचलो त्यामुळे मुश्रीफ यांच्या मिरवणुकीची ती आठवण आजही कायम आहे असे नामदार आबिटकर यांनी सांगितले.

जल्लोषी मिरवणूक…

      नाम. मुश्रीफ, नाम. आबिटकर यांच्यासह आमदार शिवाजी पाटील यांची उघड्या जीपमधून जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली. जेसीबी वरून फुलांची उधळण व जोरदार आतषबाजी यावेळी करण्यात आली. मिरवणुकीमध्ये आजरेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

एटीएम मशीन फोडून १८ लाख ७७ हजार लंपास

           चंदगड : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

        कोवाड (ता. चंदगड) येथील कोवाड ते निट्टूर रोडवरील भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेनजीकची एटीएम मशीन गॅस कटरच्या सहाय्याने फोडून त्यातील तब्बल १८ लाख ७७ हजार ३०० रुपये इतकी रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. ही घटना ४ जानेवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसात ते रात्री साडेबाराच्या दरम्यान घडली. याबाबतची फिर्याद शाखा व्यवस्थापक आशिष हरिश्चंद्र रोकडे यांनी कोवाड पोलिसात दिली.

       या घटनेमुळे कोवाड पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली. ए. एस. डोंबे (पोलीस उपनिरीक्षक चंदगड) व सहकारी अधिक तपास करत आहे.

गुन्ह्यात वापरलेली गाडी सापडली

      गुन्ह्यात वापरलेली क्रेटा गाडी राजस्थान राज्यातील असून प्रत्यक्षात गाडीच्या मागे डुप्लिकेट नंबर प्लेट लावण्यात आली होती. सीसीटीव्हीच्या मदतीने या गाडीचा तपास केला असता. ही गाडी गडहिंग्लज तालुक्यातील हेब्बाळ जलद्याळ मार्गावर सापडली आहे. गाडीत गॅस कटर व गुन्ह्यात वापरलेले इतर साहित्य तसेच टाकून दुसऱ्या गाडीतून चोरट्यांनी पोबारा केला असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

आजरा गारगोटी रस्त्याने बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची पेरणोलीत मंगळवारी बैठक

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा- गारगोटी रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. हा रस्ता नेमका किती रुंदीचा होणार आहे. पूर्वी वापरात असलेल्या रस्त्यापेक्षा जादा जागा लागणार आहे ? लागणार असेल तर ती शेतकऱ्यांकडून संपादन करून घेणार ? संपादन करणार असेल तर त्याचे संपादन कसे होणार ? या रस्त्यात घर, कठडा किंवा अन्य बांधकाम असेल तर त्याबाबत काय धोरण असणार? असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडले आहेत. याबाबत रस्त्याकडेला असणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्यांना कांहीही कल्पना न देता रस्त्याचे काम मात्र वेगाने सुरू केले आहे.

      याबाबत विचार विनिमय करण्यासाठी साळगाव, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव रस्त्याकडेला असलेल्या शेतकऱयांची बैठक मंगळवार दि ७ जानेवारी २०२५ रोजी ठीक ११.०० वाजता पेरणोली येथील हनुमान मंदिरात बैठक आयोजित केली आहे. साळगाव ते देवकांडगाव गावातील सर्व बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

‘उचंगी’ घळभरणी च्या पार्श्वभूमीवर जोरदार हालचाली… जादा पोलीस फौजफाटा तैनात

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!