mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

दि. २८ सप्टेबर २०२४


विष्णू जाधव यांचे अपघाती निधन…

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

    मलिग्रे ता.आजरा येथील मलिकार्जून विकास सेवा संस्थेचे विद्यमान चेअरमन विष्णू महादेव जाधव यांचे अपघाती निधन झाले. निधन समयी त्यांचे वय ६५ वर्षे होते.

      आजरा- महागाव मार्गावर मलिग्रे फाट्यावर त्यांची दुचाकी घसरून अपघात होऊन ते जखमी झाल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होते. नुकतेच त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले.

     मलिग्रे येथील तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. मंबईत गिरणी कामगार म्हणून काम करीत असताना संघटनेचे कार्यकर्ते, मुंबई मंडळाचे प्रभावी वक्ते ,सत्य शोधक चळवळीचे कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. सामाजिक, राजकीय माध्यमातून गावच्या विकासासाठी ते नेहमी अग्रभागी रहात असत.

      त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

माझी वसुंधरा’ अंतर्गत आजरा नगरपंचायतीला दीड कोटींचा उत्तेजनार्थ पुरस्कार

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      पर्यावरणीय व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र यांचे कडून ‘ माझी वसुंधरा ‘ अंतर्गत आजरा नगरपंचायतीने दीड कोटी रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षीस जाहीर झाले आहे. हे बक्षीस जाहीर झाले असतानाच सोशल मीडियावर मात्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. यामुळे ही निवड वादाच्या भोव-यात सापडली आहे.

      मुळातच शहरातील कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले दिसते. यामुळे शहरवासीयांकडून वेळोवेळी आंदोलने छेडली जात आहेत. शहरातील सांडपाण्याची व्यवस्थापन नसल्याने गटर्समधील पाण्यासह नाल्यांमधील दूषित पाणी थेट नदीमध्ये मिसळले जाते. कांही भागांमध्ये तर गटर्सचा पत्ताच नाही. शहरामध्ये कुठेही नगरपंचायतीने वृक्षारोपण केल्याची व वृक्ष जगवल्याची उदाहरणे नाहीत. पावसाळ्यात तर चिखलामुळे शहरवासी यांचे होणारे हाल सर्वश्रुत आहेत. हे सर्व वास्तव समोर असताना नगरपंचायतीला कोणत्या निकषावर हा पुरस्कार प्राप्त झाला ? असा सवाल सर्वसामान्य शहरवासीय उपस्थित करत आहेत.

     मूल्यांकनाबाबत प्रश्नचिन्ह ?

      या पुरस्कारासाठी मूल्यांकन करताना जी परीक्षण कमिटी नेमण्यात आली होती त्या कमिटीने खरोखरच मूल्यांकन केले की केवळ कागदावरच मूल्यांकन झाले आहे ? असा सवाल ही आता उपस्थित होत आहे.

पुरस्कार मिळाला पण प्रश्न कायम…?

         कागदी घोडे नाचवून नगरपंचायतीने हा पुरस्कार मिळवला असल्याचे चर्चिले जात असले तरीही स्वच्छतेबाबतचे प्राथमिक प्रश्न अद्यापही कायम आहेत. शहरातील डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर यासारख्या आजारांचे गेल्या तीन-चार वर्षातील रुग्ण पाहीले तर शहरातील स्वच्छतेबाबत जादा काही सांगण्याची गरजही भासत नाही.

खाजगी प्रवासी वाहतूकदारांच्या मनमानी बाबत बहुजन मुक्ती पार्टीचे आंदोलन

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     खासगी बससेवेकडून सणासुदीला अनियंत्रित व मनमानी पध्दतीने तिकीट दर आकारला जात आहे. यामुळे मुंबई, पुणे, यासह लांब पल्याच्या प्रवासात प्रवाशांच्या खिशाला चाट बसत आहे. याविरोधात बहुजन मुक्ती पार्टीने आजरा तहसीलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.निश्चित तिकीट दर करण्याची मागणी लावून धरली. प्रांताधिकारी हरेश सुळ व निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांच्याबरोबर झालेल्या चर्चनंतर आंदोलन मागे घेतले.

     यापुर्वी बहूजन मुक्ती पार्टीने तहसीलदार यांना खासगी बस सेवेच्या तिकीट दरवाढी विरोधात निवेदन दिले होते. तिकीट दर निश्चित करण्याची मागणी करत आंदोलनाचा इशारा दिला होता. यापार्श्वभूमीवर आंदोलन झाले. युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष किरण के. के. यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

     डॉ. उल्हास त्रिरत्ने म्हणाले, सणासुदीच्या काळांत खासगी बससेवेक़डून अनियंत्रित तिकिट दरवाढ केली जाते. यामुळे प्रवाशांना आर्थिक फटका बसतो. खासगी बसधारकांनी प्रवाशांना परवडेल इतके तिकीट दर आकारावे. प्रवाशांचेही आर्थिक नुकसान होणार नाही व बसधारकांचा तोटा होणार नाही. अशी संघटनेची भूमीका आहे. याबाबत निवासी नायब तहसीलदार श्री. देसाई यांनी खासगी संघटनेला लेखी पत्र देवून खासगी बसधारकांच्याबरोबर बैठक लावण्याची ग्वाही दिली. यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

      राहूल मोरे, रवी देसाई, अमित सुळेकर, प्रसाद पिळणकर, डॉ. सुदाम हरेर, झुबेर माणगावकर, झुल्पिकार शेख, द्वारका कांबळे, अॅड. निष्ठा त्रिरत्ने, जोतीबा सुतार, यांच्यासह बहुजन पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते.

‘श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर’ची वार्षीक सभा खेळीमेळीत

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्री. बळीराजा कुरकुंदेश्वर पतसंस्था पेरणोलीची वार्षीक सभा उत्साहात पार पडली. यावेळी संस्थेच्या आर्थिक पत्रकांचे वाचन मॅनेजर श्री. नेताजी बंडु पाटील यांनी केले.

      अहवाल सालात संस्थेकडे ९९ लाख ४४ हजार १७५ इतके वसुलभागभंडवल असुन १ कोटी १२ लाख ३५ हजार ९५३ रूपयांचा राखीव व इतर निधी आहे. संस्थेकडे ११ कोटी ६१ लाख ८३ हजार ५८४ इतक्या ठेवी असुन सभासदांना ९ कोटी १५ हजार ८४२ इतके कर्ज वितरीत केले आहे. चालु आर्थिक सालात संस्थेला २२ लाख ८४ हजार ८९७ इतका नफा झाला असुन सभासदांना १२% लाभांश देणेचे निश्चित केलेले आहे अशी माहिती चेअरमन शिवाजीराव देसाई यांनी दिली. यावेळी गुणवंत विदयार्थ्यांचा सत्कार करणेत आला.

      यावेळी सभेला व्हा. चेअरमन,टं सर्व संचालक मंडळ शाखेचे सर्व सल्लागार मंडळ व बहुसंख्येने सभासदवर्ग उपस्थित होता.

     स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे संचालक श्री इनास फर्नाडिस यांनी केले. तर आभार शाखाधिकारी दिपक देसाई यांनी मांडले.

आजरा येथे सोमवारी गिरणी कामगार व पेन्शनरांचा मेळावा

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      शासनाने मुंबई बाहेर घरे देवून पुनर्वसन करणार असलेला जी आर रद्द करून गिरणी कामगारांना मुंबई येथे हक्काचे घर मिळाले पाहीजे तसेच सातत्याने रस्त्यावरची लढाई व मोर्चा आंदोलने करून ही केंद्र शासनाने पेन्शनरांना अंधारात ठेवले असून मासिक नऊ हजार पेन्शन व महागाई भत्ता वाढ करावी या मागणी साठी काॅ. अतूल दिघे प्रमुख मार्गदर्शक असून गिरणीकामगार वारसदार व पेन्शनरांनी सोमवार दिनांक ३० सप्टेंबर रोजी सकाळी आकरा वाजता किसान भवन आजरा येथे मेळाव्याला उपस्थित रहाण्याचे आवाहन काॅ. शांताराम पाटील यांनी केले आहे.

                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त...

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क

            +91 9527 97 3969

 


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पट्टेरी वाघाच्या हल्ल्यात बैल ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी महादेवराव पाटील… उपाध्यक्षपदी दौलती पाटील

mrityunjay mahanews
error: Content is protected !!