mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

दि. १० सप्टेबर २०२४


बहिरेवाडीत मारामारी… एका विरोधात गुन्हा नोंद

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     बहिरेवाडी ता. आजरा येथे सामायिक भिंतीच्या वादातून शिवीगाळ व मारामारी करण्यात आल्या प्रकरणी अवधूत उत्तम पोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अशोक विष्णू आत्याळकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

        याबाबत अधिक माहिती अशी…

     फिर्यादी पोरे व अत्याळकर शेजारी- शेजारी राहणेस आहेत. पोरे यानी सामाईक भिंत व घराचे बांधकाम चालू केल्यापासून अत्याळकर कोणत्या ना कोणत्या कारणावरुन वाद घालत असे. काल सोमवारी सकाळी पोरे हे आपले घराचे बांधकामास पाणी मारत असताना अत्याळकर हातात काठी घेवून त्यांना व त्यांच्या आई, वडीलांनाही शिवीगाळ केली व तुम्हाला कुठे जायचे ते जावा एका रात्रीत तुम्हाला गायब करतो, अशी धमकी दिली व पोरे यांना काठीने मारहाण करून जखमी केले असे फिर्यादीत म्हटले आहे.

     या फिर्यादीवरून पोलिसांत आत्याळकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करीत आहेत.

उत्तूर येथून दुचाकीची चोरी


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     वसंतदादा पाटील विद्यालय, उत्तुर परिसरात लावलेली दुचाकी ४ सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा ते सात वाजण्याच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची वर्दी प्रदीप खंडू कांबळे (रा. अकनूर ता. राधानगरी) यांनी पोलिसात दिली आहे.

      पोलीस हवालदार सुदर्शन कांबळे पुढील तपास करीत आहेत.

समरजितराजेंना विजयी करून स्वाभिमानाची लढाई जिंकू : जयवंतराव शिंपी
आजरा येथे शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेली वीस-पंचवीस वर्षे राजे समरजितसिंह घाटगे कोणतेही संविधानिक पद नसताना शाश्वत विकासकामांचा अजेंडा गावोगावी राबवत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे सर्वसामान्य माणसांच्या अपेक्षा ओळखण्याची चिकित्सक वृत्ती चांगली आहे. त्यामुळे या तालुक्यातील स्वाभिमानी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत राजे समरजितसिंह घाटगे यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करून स्वाभीमानाची आणि हक्काची लढाई नक्की जिंकू असा विश्वास आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आजरा येथे आयोजित केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

      यावेळी राजे समरजिसिंह घाटगे यांचा सत्कार जयवंतराव शिंपी यांच्या हस्ते करण्यात आला. शिंपी पुढे म्हणाले, समरजितसिंह घाटगे एक उच्चविद्याविभूषित नेतृत्व आहे. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाणीव त्यांना चांगली आहे. त्यामुळे कोणी कितीही आमिषे दाखवली तरी जनतेने त्यांच्या आमिषांना बळी न पडता समरजितसिंह घाटगे यांना निवडून देऊया असे आवाहनही केले.

     यावेळी राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले, शाहू ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष स्व. राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या शिकवणीप्रमाणे, मतांमध्ये नको तर माणसांमध्ये गुंतवणूक करत आहे. हा परिसर विकासाच्या बाबतीत उपेक्षित राहिला असला तरी येत्या काळात या परिसराच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी आपण नक्की प्रयत्नशील राहू. त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपला लोकसेवक म्हणून आपल्या सर्वांचीच सेवा करण्याची एक संधी द्या असे आवाहन केले.

      यावेळी जनार्दन निऊंगरे, ॲड..धनंजय देसाई यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.

     यावेळी माजी सभापती भिकाजी गुरव, के. जी.पटेकर, एस. पी. कांबळे, विलास पाटील, सदाशिव डेळेकर, गणपतराव नाईक, डी. एम. पाटील, बाबाजी नाईक, सुनील शिंदे यांच्यासह कागल विधानसभा मतदार संघातील या परिसरातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      आभार प्रा.सुनील देसाई यांनी मानले.

पूर परिस्थिती प्रतिबंध उपाय करा
डॉ.धनाजी राणे

आ.सतेज पाटील यांना निवेदन


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पावसाळ्यामध्ये नदी, नाल्यांना पूर येतो. नेहमीप्रमाणे पूर आल्यानंतर शासनांकडून उपाययोजना व कार्यवाही काही प्रमाणात राबवली जाते.परंतु पूरच येवू नये म्हणून शासनांकडून ठोस प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी अशी मागणी डॉ. धनाजी राणे यांनी विधीमंडळ गटनेते आमदार सतेज पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

      निवेदनामध्ये नदी व ओढ्यातील गाळ काढून नदी पात्राची खोली वाढवावी,नदी व ओढ्याच्या दोन्हीं बाजूने काही ठिकाणी शेतकऱ्यांने भराव टाकून अतिक्रमण केल्याने नदीपात्राची रुंदी कमी झाली आहे. यासाठी सदरची अतिक्रमणे कायदेशीर मार्गाने काढून नदीपात्राची रुंदी पुर्ववत करणेत यावी.प्लास्टीक, घरातील कचरा व टाकावू वस्तू, निर्माल्य इ. गोष्टी काही नागरिकांकडून नदीपात्रात टाकल्या जातात. असे घडू नये म्हणून कायदेशीर मार्गाने शासनांने यावर कार्यवाही करावी किंवा त्या नागरिकांना दंडात्मक शिक्षा द्यावी.

      जमिनीची कांही नागरिकांकडून तीन फुटाच्या खाली  बेकायदेशीररित्या खुदाई केली जाते. यामुळेही सदर माती पावसाळ्यामध्ये नदीत वाहून जाते. हे कृत्य पूर येण्यास कारणीभूत ठरत आहे. ईको- सेंसिटीव्ह झोन मधील काही गावात अजूनही स्टोन क्रशर राजकीय मंडळींच्या हस्तक्षेपामुळे व वरदहस्तामुळे चालू आहेत. यांमुळे जमिनीत खडकांची उलथापालत होवून पावसाळ्यात यांमधून दगड- माती वाहत जाते. ही गोष्टीही पुर येण्यास कारणीभूत ठरते.आदी प्रकारच्या उपाययोजना करण्यात करण्यात याव्या अशी मागणी करण्यात आली आहे.

गणेश दर्शन 

१.सुभाष चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा

अध्यक्ष – नितीन (आबू) कारेकर
उपाध्यक्ष – मनीष टोपले
खजिनदार – रोहित कारेकर
सचिव – कपिल नलवडे
मूर्तिकार – सुनील कुंभार

२.एकता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, देवर्डे

अध्यक्ष – मारुती चाळके
उपाध्यक्ष – सुनील जाधव
सचिव – आनंदा पाटील
खजिनदार – आनंदा तानवडे
मूर्तिकार – दशरथ कुंभार (साळगाव)
मूर्ती देणगीदार – सागर गोपाळ चाळके


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मासेवाडी येथे तिघाविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

‘छावा’ मुळे आजऱ्याच्या मातीचा सुगंध जगभर दरवळला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

पाऊस थांबता थांबेना… आजऱ्यातील परिस्थिती …व्यंकटराव”च्या शिक्षिका भारती कांबळे यांना आंतरराज्य पुरस्कार…आजरा महाविद्यालयात झिम्मा फुगडी उत्साहात..वर्षभरात 500 कोटीच्या अँटिबायोटिक औषधांची खरेदी ! कोणताही विचार न करता भारतीय करत आहेत औषधांचा उपयोग

mrityunjay mahanews
error: Content is protected !!