दि. ९ सप्टेबर २०२४



विष प्राशन केलेल्या तरुणाचा मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तूर ता.आजरा येथे विषारी रसायन प्राशन करून मृत पावलेल्या व कुजलेल्या अवस्थेत अवधूत मधुकर पाटील (वय ३२ वर्षे, राहणार,म्हापसा/ गोवा, मुळगाव रा. कासारी ता. कागल) यांचा मृतदेह आढळून आला.
हॉटेल मत्स्यम च्या मागील बाजूच्या ऊस पिकात सदर मृतदेह आढळला. याबाबतची वर्दी प्रवीण दाजीबा पाटील रा. कासारी ता. कागल यांनी आजरा पोलिसात दिली आहे. दिनांक ३१ ऑगस्ट ते ८ ऑगस्ट दरम्यान सदर प्रकार घडला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

३१ ऑगस्ट रोजी अवधूत बेपत्ता असल्याची वर्दी पोलिसांत देण्यात आली होती. त्यानंतर त्याची दुचाकी हॉटेल मत्स्यम समोर आढळून आली. दरम्यान हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या उसामध्ये त्याचा मृतदेह आढळून आला.



पेरणोलीत गांजा मुक्त गाव करण्याचा निर्णय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
पेरणोली ता. आजरा येथे झालेल्या बैठकीत गांजासह तंबाखूजन्य पदार्थ व अन्य व्यसनापासून तरूणांना मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला.बैठकीत व्यसनाधीनतेबाबत गंभीर चर्चा करण्यात आली.
यावेळी उ.बा.ठा. शिवसेनेचे तालूका प्रमूख राजेंद्र सावंत म्हणाले,पेरणोली सारख्या मोठ्या गावातील तरूण गांजा व अन्य व्यसनात अडकले आहेत.पोलीस कारवाई झाल्यानंतर मदतही केली आहे.परंतु यापूढे अद्दल घडवण्यासाठी मदत केली जाणार नाही.तंबाखू मुक्त अभियानाचे समन्वयक संजय मोहीते म्हणाले, व्यसनाधीनता वाढत आहे.पालकांनी आपल्या मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवून अंकुश ठेवण्याची गरज आहे.
यावेळी माजी सभापती उदय पवार यांनी गावातील व्यसनात अडकलेल्या मुलांच्या पालकांना भेटून प्रबोधन करण्याची सूचना मांडली.स्वाभिमानीचे तानाजी देसाई यांनी पथक तयार करून कारवाई करण्याची सूचना केली.तर शेखर कोळेकर यांनी मराठी व माध्यमिक शाळेत पालक मेळावा घेऊन प्रबोधन करण्याची सूचना केली.
चर्चेत तानाजी भोकरे,ऊदय कोडक, कृष्णा सावंत, संतोष जाधव,आदेश गुरव, एकनाथ जोशीलकर, रणजीत फगरे,संदीप पारदे, श्रावण मोहीते आदींनी भाग घेतला.
बैठकीवेळी रविंद्र देसाई, सुरेश कालेकर,रणजीत कालेकर, सयाजी देसाई,अविनाश जोशीलकर,काका देसाई, नामदेव मोहिते,शंकर नार्वेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


निलांबरी कामत यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
येथील रवळनाथ प्राथमिक विद्यामंदिरच्या अध्यापिका सौ. नीलांबरी सुनिल कामत यांना सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर या आंतरराष्ट्रीय संस्थेचा ‘ नेशन बिल्डर अवॉर्ड आदर्श शिक्षक’ पुरस्कार कोल्हापूर अप्पर जिल्हाधिकारी संपत खिलारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .
यावेळी रोटरी गव्हर्नर राहूल कुलकर्णी , सेक्रेटरी रविंद्र जाधव, अभिजीत पिंपळकर, शिक्षक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संभाजी बापट , मारुती वरेकर सौ. अर्चना पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


गणेश दर्शन
१.शिवसेनाप्रणीत जय शिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, आजरा.

अध्यक्ष – अभिजीत मनगुतकर
उपाध्यक्ष – रविराज भाटी
खजिनदार – रोहन गिरी
सचिव – शरद कोरगावकर
मूर्तिकार – इंद्रजीत आनंदा कुंभार
मूर्ती देणगीदार – बापू दळवी
२.सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ(रवळनाथ मंदिर) आजरा.

अध्यक्ष – किशोर म्हापसेकर
उपाध्यक्ष – सुरेश कुंभार
खजिनदार – रमण केसरकर
सचिव – दीपक कुरुणकर
मूर्तिकार – इंद्रजीत आनंदा कुंभार
मूर्ती देणगीदार – सतीश पवार



