mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

पेरणोली येथे महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

पेरणोली येथे महाविद्यालयीन तरुणाची आत्महत्या

 


पेरणोली (ता. आजरा) येथे योगेश बाबुराव लोखंडे या सतरा वर्षीय महाविद्यालयीन तरुणाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.शनिवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला .

 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, योगेशसह त्याच्या घरची मंडळी मळणीनिमित्त शेतावर गेली होती. त्याला पिण्यासाठी घरातून पाणी आणण्यासाठी शेतातून पाठवले होते.दरम्यान हीच संधी साधून योगेशने राहत्या घरी गळफास घेतला. त्याच्या पश्चात दोन बहिणी,भाऊ, आई,वडील असा परिवार असून तो आजरा येथील महाविद्यालयात अकरावीच्या वर्गात शिकत होता.

 

सामान्य कुटुंबातील योगेशने आत्महत्या केल्यानंतर पेरणोली पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा येथील ‘ते’ वादग्रस्त गाळे आज जमीनदोस्त होणार….डॉक्टर नजीर मुजावर यांचे निधन

mrityunjay mahanews

जनता बैंक आजराला रू. ६ कोटी ५५ लाखाचा नफा…दाभिल येथील शंभू महादेव विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी कृष्णा कदम…व्हा. चेअरमनपदी तानाजी हासबे  

mrityunjay mahanews

इटे येथे घरफोडीत दोन लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

वेळवट्टी येथे मारामारी… दोघे जखमी… पाच जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews
error: Content is protected !!