mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


गवसे येथे गोवा बनावटीच्या दारूसह ५,५५,३६०/-किंमतीचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्कची कारवाई

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज या कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार आजरा-आंबोली रोडवर, गवसे गावच्या हद्दीत पुलाजवळ सापळा रचून गोवा बनावटीची दारु वाहतूक करणारे वाहन (मारुती सुझुकी कंपनीची अल्टो चारचाकी वाहन क्रं. MH-06-BE-0435 हे वाहन पकडण्यात आले. सदर कारमधील गोवा बनावटी दारुच्या विविध ग्रॅण्डचे ४१ कागदी पुठृठ्याचे बॉक्स मिळून आले. सदर वेळी वाहनासहित एकूण ५,५५,३६०/-किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन पुढील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला.

      याप्रकरणी रविराज आंबाजी सावंत याचेवर बेकायदेशीररीत्या गोवा बनावटी दारुची वाहतूक केलेबाबत महाराष्ट्र दारुबंदी कायदया अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

      सदर कारवाईमध्ये  श्री.पी. आर. खरात, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज, दुय्यम निरीक्षक श्री.डी.एम. वायदंडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री.एन.एस. केरकर, तसेच जवान वर्ग श्री.एस.डी. जानकर, श्री.बी.ए. सावंत, श्री. एस. बी. चौगुले यांनी मदत केली.

       सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री.डी.एम. वायदंडे, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, गडहिंग्लज हे करत आहेत.

अपघातातील जखमी महिलेचा मृत्यू

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सुशिला तुकाराम सावंत  वय ६५ रा. जाधेवाडी ता. आजरा या दि.२५ ऑगस्ट रोजी २ वाजण्याच्या सुमारास भादवणवाडी बस स्टॉप येथे अपघातात जखमी झालेल्या होत्या. त्यांना उपचारासाठी दि.२५ रोजी हत्तरकी हॉस्पीटल, गडहिंग्लज येथे दाखल केले असता त्याच्यावर औषधोपचार चालु असताना त्यांचा मृत्यू झाला.

      याबाबत वैद्यकीय अधिकारी, हत्तरकी हॉस्पीटल गडहिंग्लज यांनी पोलिसात वर्दी दिली आहे.

आजरा भूमी अभिलेख अधिकारी-कर्मचारी धारेवर
चूकीच्या मोजणी प्रकरणाची अधिक्षकाकडून दखल

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       आजरा तालूक्यातील अनेक गावात झालेल्या चूकिच्या पद्धतीने झालेल्या जमीन मोजणीची दखल जिल्हा अधिक्षकाडून घेण्यात आली असून कार्यालयातील भूमी अभिलेख अधिकारी व मोजणी करणा-या नियामतदारांना चांगलेच धारेवर धरले.

     आजरा भूमी अभिलेख कार्यालयाच्या कारभाराच्या चौकशीसाठी किटवडे येथील शेतकऱ्यांनी चार दिवसापासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले होते. गेला काही दिवसात भूमी अभिलेखच्या कारभाराबाबत तक्रारीही वाढल्या आहेत. येथील
जमीन मोजणी प्रकरणाची अधिक्षकाकडून दखल घेऊन जिल्हा अधिक्षक शिवाजी भोसले यांनी भूमीलेख अधिकारी विद्या तांगडे व नियामतदार योगेश पाटील यांना चांगलेच धारेवर धरले.तसेच निंगूडगे येथील मराठी शाळेतील जमीन मोजणीसह अनेक तक्रारींची दखल भोसले यांच्याकडून घेण्यात आली.

      किटवडेतील चुकीच्या पद्धतीने मोजणी केल्याच्या विरोधात ८ जुलै रोजी तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख आजरा यांच्या दरम्यान तहसीलदारांच्या दालनात आंदोलक प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन योग्य न्याय देण्याबाबतचे आश्वासन दिले होते. मात्र ११ मार्च २०२३ रोजी त्यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी केलेली मोजणी रद्द करत असल्याचे पत्र दिले होते.याविरोधात ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले होते.आंदोलना दरम्यान यामधील दोघांची संध्याकाळी चारच्या दरम्यान प्रकृती खालावली होती.तसेच अधिका-याकडून जनतेची वेळेत कामे होत नव्हती.याबाबत तालूक्यातील नागरीकांनी आमदार प्रकाश आबिटकर यांच्याकडे तक्रार केली होती.याची दखल घेऊन शुक्रवारी संध्याकाळी तांगडे व पाटील यांच्या कारभाराची भोसले यांनी कसून चौकशी केली.यावेळी पाटील यांचे जिल्हा बाहेर बदलीचे आदेश भोसले यांनी दिले.

भूमी अभिलेख सुधारणार तरी कधी…?

     आजरा भूमी अभिलेख विभाग सुधारणार तरी कधी असा प्रश्न होता उपस्थित केला जात आहे. सहा महिन्यापूर्वी येथील एका कर्मचाऱ्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली होती. तक्रारी वाढत असूनही कारभारात कोणतीच सुधारणा नसल्याने तालुकावासीयांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

सिरसंगी येथील रवळनाथ विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात


            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      सिरसंगी येथील श्री रवळनाथ विकास सेवा संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन मधुकर येलगार होते.

      स्वागत एम. व्ही. देसाई यांनी केले. अहवाल वाचन सचिव सुभाष चौगुले यांनी केले. यावेळी चेअरमन येलगार यांनी संस्थेला चालू आर्थिक वर्षांमध्ये ३ लाख ८५ हजारांचा नफा झाल्याचे सांगितले.

      यावेळी आजरा कारखान्याचे नूतन संचालक सुभाषराव देसाई यांचा विकास सेवा संस्थेमार्फत सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन येलगार यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला व संस्थेने चालू आर्थिक वर्षांमध्ये ९० लाख कर्ज वाटप केले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर संस्थेचे एकूण ४० लाख भागभांडवल असल्याचे नमूद केले यावेळी यलगार यांनी विकास सेवा संस्थेकडून शेतकऱ्यांसाठी विविध पातळीवरती कर्ज योजना उपलब्ध असल्याचे सांगितले याचा फायदा सभासदांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी भिमराव सडेकर, दत्तात्रय देसाई, बाबुराव सडेकर, वसंत दळवी, धोंडीराम देसाई, बाळासाहेब घोरपडे रामू कांबळे, प्रकाश बुडके, दत्तात्रय येलगार उपस्थित होते.

      आभार सुभाष देसाई यांनी मानले.

शाळा व्यवस्थापन अध्यक्षपदी सौ.नेहा पाटील

            आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

     स्वामी विवेकानंद विद्यामंदिर ,आजरा शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीचे नुकतेच पुनर्गठन करण्यात आले. या वेळी झालेल्या पालक मेळाव्याच्या अध्यक्षपदी मुख्याध्यापक सुनील सुतार होते. त्यानंतर झालेल्या शाळा व्यवस्थापन  समितीच्या अध्यक्षपदी सौ. नेहा प्रवीण पाटील यांची तर उपाध्यक्षपदी श्री. दीपक विठ्ठल बल्लाळ यांची एकमताने निवड करण्यात आली.


 

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!