mrityunjaymahanews
अन्य

शक्ती पीठ महामार्ग सर्वेला शेतकऱ्यांचा विरोध

 


 

शक्तीपीठ महामार्गच्या सर्व्हे पथकाला शेतकऱ्यांनी माघारी पाठवले.

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       शक्तीपीठ महामार्गचे सर्व्हेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला आज आजरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विरोध करून माघारी पाठवले.

    आज कोणतीही पूर्वसूचना न देता आजरा तालुक्यातील खेडगे, पारपोली, सुळेरान, शेळप येथे महामार्गचे पथक आले होते. या पथकाला शेतकऱ्यांनी विरोध केला. खरंतर या महामार्गला शेतकऱ्यांचा विरोध आहे, गेले अनेक दिवस शेतकरी निवेदने, मेळावे, परिषदा सभा घेऊन आपला विरोध दर्शवत आहेत. पण या विरोधाला सकारात्मक प्रतिसाद न देता त्यांचा विरोध लक्षात न घेता सरकार बळजबरीने सर्व्हे करू पाहत आहे.

    आज आलेल्या पथकाला खेडगे येथे पारपोलीच्या सरपंच प्रियांका शेटगे, धोंडिबा सावंत, प्रकाश कवीटकर, धाकु कविटकर, अनिल अमुनेकर यांच्या पुढाकाराने शेतकऱ्यांनी एकत्र येत सर्व्हे पथक माघारी पाठवले. २५ तारखेला वाघापूर ता भुदरगड येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी मेळाव्याला कॉ संपत देसाई यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचा निर्धारही यावेळी शेतकऱ्यांनी केला


पाऊस पाणी…

वळीव पावसामूळे शेतकरी सुखावला,
पिकांना जिवदान


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     गेल्या दोन महिन्यांच्या प्रचंड उष्म्यानंतर वादळ- वा-यासह आजरा तालुक्यातील बहुतांशी भागामध्ये वळीव बरसल्याने तालुक्यातील शेतकरी सुखावला असून करपू लागलेल्या पिकांना जिवदान मिळाले आहे.

      गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात वळीव पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस पिक घेतले .विहिर व कुपनलिकेचे अपूरे पाणी असले तरी वळीव पावसाच्या जोरावर पीक चांगले आले होते. यावर्षी मात्र वळीव पावसाने पाठ फिरवल्याने ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त झाला होता.उस पिके करपू लागली होती.

     गुरूवारपासून वादळी वा-यासह पावसाने हजेरी लावली आहे. शनिवारी दुपारी पेरणोली ,साळगावसह ठीक- ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला आहे.

शालेय…

उर्दू शाळेच्या विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     जिल्हा परिषद कोल्हापूरच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी प्रज्ञाशोध परीक्षेत (उर्दू विभाग) येथील उर्दू विद्यामंदिर शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरीय व तालुका स्तरीय यश संपादन केले आहे.

      कु.ओवेस वसीम पटेल याने जिल्ह्यात द्वितीय क्रमांक,कु.उमामा मन्सुर बुखारी हीने जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला तर कु.अलिशा म.शफी तकीलदार हीने तालुक्यात द्वितीय क्रमांक प्राप्त केला.कु.सादिया आरिफ मालदार तालुक्यात सहावा क्रमांक,कु.रिजा़ इरफान आगलावे तालुक्यात आठवा क्रमांक,कु. बशाअर जावेद चांद तालुक्यात अकरावी,कु.माहीन मुबारक मुजावर तालुक्यात बारावी तर कु.हुमेरा अमजद मुल्ला याने तालुक्यात पंधरावा क्रमांक मिळविला.

       विद्यार्थ्यांना वर्गशिक्षिका मिनाज नुरमहंमद नदाफ, युनूस कासिम नाईक यांचे मार्गदर्शन लाभले.तर गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, उर्दू शिक्षण वि.अधि.मा.मुसा ईलाही सुतार ,सुनीत चंद्रमणी,मुख्याध्यापक युनूस लाडजी व सर्व शिक्षकांचे प्रोत्साहन मिळाले.

गौरव…
वृषाली कांबळे

           उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       उत्तुर ,ता.आजरा येथील यशस्वी कन्या वृषाली संतराम कांबळे यांनी यूपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल जनता सह. गृहतारण संस्था,आजरा व मराठा महासंघ,आजरा तालुका आजरा यांचे मार्फत वृषाली कांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

      यावेळी तालुका अध्यक्ष श्री बंडोपंत चव्हाण,मारुती मोरे ,ओंकार उत्तूरकर,अमित येसादे,दौलत कांबळे इतर पदाधिकारी,मान्यवर उपस्थित होते.

प्रचार…
प्रा.संजय मंडलीक यांच्या प्रचारार्थ आ. राजेश पाटील यांचा संपर्क दौरा

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      कोल्हापुर लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलीक यांच्या प्रचारार्थ मलिग्रे ता.आजरा येथे प्रचारार्थ आमदार राजेश पाटील यांनी मतदारांच्या व प्रमुख मंडळींशी संपर्क साधून प्रा. संजय मंडलीक यांना भरघोस मतानी विजयी करण्याचे आवाहन केले.

      यावेळी आजरा कारखान्याचे माजी अध्यक्ष व सन्मित्र संस्था समूहाचे प्रमुख अल्बर्ट डीसोजा , साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एम.के.देसाई ,अनिल फडके ,संजय संपकाळ , अभय देसाई ,सुभाष देसाई , संभाजी पाटील सो,मलिग्रे गावातील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.

जनजागृती… 
पेरणोली,कोरीवडे येथे मतदान जनजागृती रॅली

       आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       पेरणोली,कोरीवडे आदी गावात लोकसभा निवडणूकीसाठी मतदान जनजागृती रँली काढण्यात आली.पेरणोलीत प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी रँलीत सहभाग घेतला.

        पेरणोली येथे बसस्थानकापासून रँलीला सुरुवात झाली. ‘मतदार राजा जागा हो… लोकशाहीचा धागा हो’ असा फलक हातात घेऊन घोषणा देण्यात आल्या.रँलीत मुख्याध्यापक सुभाष विभूते, व्हसकोटी,ग्रामसेवक ज्ञानदेव काळे,अनुष्का गोवेकर,कविता नाईक,सुप्रिया पाटील,आबासाहेब शेडेकर,शिवाजी कुदळे,जितेंद्र निर्मळे,संदीप फगरे आदी सहभागी झाले.

     कोरीवडे येथील रॅलीत ग्रामस्थ व प्राथमिक शाळेतील विद्यार्थी सहभागी झाले होते.’ मी मतदान करणारच… आपणही आपल्या मतदानासाठी सज्ज राहा’ असे फलक यावेळी झळकले. कोरीवडे ग्रामपंचायतीने रॅलीचे आयोजन केले होते.

       बैठक…                ग्राहक पंचायतीची आजरा व चंदगड येथे बैठक

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      ग्राहक पंचायत महाराष्ट्र यांची विभागीय स्तरावरील सर्व सदस्यांची बैठक नुकतीच चंदगड व आजरा येथे पार पडली. यावेळी ग्राहक पंचायत चंदगड तालुका शाखा स्थापन करण्यात आली असून चंदगड येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य कार्यकारणीच्या सदस्या सुनिता राजे घाटगे होत्या. या बैठकीत चंदगड तालुका कार्यकारणी स्थापन करून निवड करण्यात आली. यावेळी झांबरेची सरपंच गावडे यांनी स्वागत केले चंदगड तालुका ग्राहक पंचायतीच्या कार्यकारणी मध्ये जयवंत पेडणेकर, अर्जुन गावडे, ज्योतिबा आपके, प्राध्यापक सोनाप्पा गोरख ,प्राध्यापक ए.डी कांबळे ,समर्थ गावडे ,वेदांत गावडे, सुधाकर बांदिवडेकर, सौ कमल कोरे ,सौ मनस्वी कांबळे आशिष करताना, ॲड.विजय कडूकर यांची निवड करण्यात आली.

         कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्हा ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष बी. जे.पाटील ,जिल्हा संघटक सुरेश माने ,आजरा तालुका प्रमुख महादेव सुतार ,विभाग प्रमुख शिवाजी गुरव हे उपस्थित होते.

        त्यानंतर आजरा येथील किणे या गावी आढावा बैठक पार पडली. यावेळी सुनिता सुतार, सुरेश बुगडे , आनंदा सुतार, काशिनाथ मोरे ,कुमार कांबळे, महादेव मनवाडकर हे उपस्थित होते. यावेळी सौ. घाटगे म्हणाल्या ग्राहकांना जास्तीत जास्त न्याय मिळवून देण्यासाठी ग्राहक चळवळ या भागात वाढीस लागणे आवश्यक आहे.

        आभार सुरेश बुगडे यांनी मानले.


                             (७५३)

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!