mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

 


माकडचेष्टा महागात…. दोघेजण जखमी…

        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा शहरासह तालुकाभर माकडांचा उपद्रव वाढला असून काल मंगळवार दिनांक २० रोजी सोहाळे (ता.आजरा) येथून आज-याच्या दिशेने जात असताना माकडाने सुभाष उर्फ संतोष देसाई यांच्या धावत्या दुचाकीवर अचानक उडी मारली. यामध्ये संतोष आप्पासाो देसाई (वय ४०) व निखिल धोंडीबा कळेकर (वय २९, दोघेही रा. सोहाळे, ता. आजरा) हे दुचाकीवरून वरून पडून गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी सकाळी घडली. रस्त्यावरून उड्या मारणे, वाहन चालकांच्या मागे लागणे, वाहन चालकांच्या अंगावर धावून जाणे या माकड चेष्टा आता वाहन चालकांना अडचणीत आणू लागल्या आहेत.

     याबाबत  मिळालेली माहिती अशी की, देसाई व कळेकर हे नेहमीप्रमाणे सकाळी आजरा या ठिकाणी कामाकरिता आपली दुचाकी घेवून जात होते. दरम्यान सुलगाव फाटयानजीक पाच ते सात माकडांच्या कळपातील माकडाने अचानकपणे गाडीवर उडी मारली. यामध्ये संतोष देसाई व निखिल कळेकर हे गंभीर जखमी झाले. तातडीने स्थानिकांच्या मदतीने नातेवाईकांनी त्यांना गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले.त्या ठिकाणी जखमींवर प्राथमिक उपचार करण्यात आले.

        दरम्यान याची माहिती समजताच आजरा वनविभागाचे वनक्षेत्रपाल स्मिता डाके, वनपाल बाळेश न्हावी, चंदगडचे वनपाल कृष्णा डेळेकर, वनरक्षक प्रियंका पाटील आदींनी उपचार घेत असलेल्या ठिकाणी जखमींची भेट घेतली व चौकशी केली.

      दरम्यान प्राथमिक उपचारानंतर जखमींना खाजगी दवाखान्यात पुढील उपचाराकरिता दाखल करण्यात आले. देसाई यांना डाव्या पायाला तर कळेकर यांच्या डाव्या खांदयाला गंभीर दुखापत झाली आहे.

नुकसानच नुकसान…

       हत्ती,गव्यांपाठोपाठ माकडांचाही उपद्रव
अलीकडे वाढला आहे. माकडांकडूनही शेती पिकांच्या नुकसानीसह अन्य हल्ल्यांसारख्या घटना घडत आहेत.आजरा शहरांमध्ये तर घराशेजारील फळझाडे, वाळवण्यासाठी घातलेले साहित्य, घरांची कौले यांचे माकडांकडून प्रचंड नुकसान सुरू आहे. वनविभागाने माकडांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

संजय गांधी निराधार योजनेची कार्यकारिणी जाहीर
अल्बर्ट डिसोझा अध्यक्षपदी

          आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       संजय गांधी निराधार योजनेची आजरा तालुका कार्यकारिणी जाहीर झाली असून पुन्हा एक वेळ माजी पंचायत समिती सभापती अध्यक्ष पदाची संधी अल्बर्ट डिसोझा यांना देण्यात आली आहे.

       इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे…
सदस्य : संभाजी बाबु आयवाळे (निंगूडगे), सौ.समिक्षा शिरीष देसाई (उत्तुर), विठ्ठल महादेव उत्तुरकर (उत्तुर), चंद्रकांत धोंडीबा खंडाळे (लाकूडवाडी), निवृत्ती भिमराव शेंडे (बोलकेवाडी), सयाजी भाऊ पाटील (सरोळी), दत्तात्रय जोतिबा पाटीत (कोरीवडे),सौ. श्वेता रणजित सरदेसाई (लाटगांव), जी.एम. पाटील (देवर्डे), गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा (पदसिद्ध सदस्य), तहसीलदार आजरा (पदसिद्ध सदस्य सचिव). निवड करण्यात आलेल्या समितीकडे संजय गांधी निराधार अनुदान योजनेसह विविध योजनांचे लाभार्थी निवडण्याचे काम असणार आहे.

देवर्डे शाळेत सलग सतराव्या वर्षी योगा शिबिर


         आजरा: मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      देवर्डे तालुका आजरा येथील विद्या मंदिर व श्री रवळनाथ हायस्कूल देवर्डेत सलग १७ वर्षी योगा शिबिराला प्रारंभ झाला. योगा शिक्षक सुनील सुतार यांनी २००७ ला योगा शिबिराची सुरुवात केली. उन्हाळी सकाळी सत्रा मध्ये पंधरा दिवसाचे योगा शिबिराचे आयोजन केले जाते. पहिली ते नववीचे  विद्यार्थी सहभागी झाले आहेत. यावर्षी सहाय्यक शिक्षक राजेंद्र पाटील योगासनाचे आसने विद्यार्थ्यांच्याकडून करून घेत आहेत. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.

       या उपक्रमामध्ये मुख्याध्यापक नामदेव माईनकर व सर्व शिक्षकासह विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी सहभागी होत आहेत.

मुख्यमंत्री माझी शाळा स्पर्धेत हात्तिवडेचे सरस्वती हायस्कूल प्रथम


        आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेमध्ये महात्मा शिक्षण प्रसारक मंडळ हात्तिवडे च्या श्री सरस्वती हायस्कूलने आजरा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला . सरस्वती हायस्कूल तीन लाख रुपयांच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले असून कोल्हापूर येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले .

       हात्तिवडे येथील श्री सरस्वती हायस्कूल ही एक आदर्श प्रशाला म्हणून ओळखली जाते . शाळेने गेल्या १७ वर्षांमध्ये दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्याची परंपरा जपलेली आहे . क्रीडा स्पर्धेमध्ये शाळेने यशाची परंपरा कायम जे ठेवलेली आहे अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असणाऱ्या श्री सरस्वती हायस्कूल हात्तिवडे ने आपल्या कार्याचा ठसा पुन्हा एकदा उमटवला आहे.

छायावृत्त…


        आजरा:मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आजरा येथे संभाजी चौकात गटर्स झाकण्याकरता घातलेले लोखंडी झाकण हे पादचारी व वाहनधारकांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरत असून छोट्या मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरत आहे. ते व्यवस्थित तरी बसवावे अन्यथा त्यावर स्लॅब टाकून ते मुजवून घ्यावे अशी मागणी होत आहे.


 

संबंधित पोस्ट

संजय कडोली यांचे निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तीन विद्यमान नगरसेवक राष्ट्रवादीच्या वाटेवर…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!