

कारखान्याला केंद्रातून निधी उपलब्धतेची नेत्यांकडून हमी:अशोक चराटी
एरंडोळ, पोळगाव येथे चाळोबादेव शेतकरी आघाडीची सभा

आजरा:प्रतिनिधी
आजरा कारखान्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्धत करून दिला जाईल अशी हमी राज्यातील भाजप नेते व आघाडी प्रणित नेत्यांनी दिली आहे. त्यामुळे कारखाना कर्जमुक्त करून सक्षमपणे चालवणार आहे. या गोष्टींचा विचार करून मतदारांनी एकहाती सत्ता आमच्या आघाडीला दयावी असे आवाहन श्री चाळोबादेव आघाडीचे प्रमुख अशोक चराटी यांनी केले.
एरंडोळ, पोळगाव, लाटगाव सह अन्य गावात श्री. चाळोबादेव शेतकरी विकास आघाडीने प्रचार फेरी काढली. श्री. चराटी यांनी एरंडोळ येथील विठ्ठल मंदिर व पोळगाव येथील रवळनाथ मंदिरातील प्रचार सभेत आघाडीची भूमिका मांडली. या वेळी उमेदवार अभिषेक शिंपी, विजय देसाई, संगिता माडभगत, मलिककुमार बुरुड, बाबाजी नाईक, संभाजी पाटील, युवराज पोवार, डॉ. इंदजीत देसाई प्रमुख उपस्थित होते.
श्री. चराटी म्हणाले, कारखान्याची निवडणूक बिनविरोधात करण्याचे ठरलेले असतांना विरोधकांनी जागा वाटपावरून प्रस्ताव अमान्य केला व माधार घेतली. त्यांना जादाची जागा देण्यास आमची तयारी होती. कारखान्याला अकारण अडचणीत आणण्यासाठी त्यांनी निवडणूक लादली आहे. कारखाना कर्जमुक्त करण्यासाठी, तो स्वबळावर चालवण्यासाठी आमचे प्रयत्न राहणार आहेत. राज्यातील नेत्यांशी चचर्चा झाली असून केंद्रातून विशेष पॅकेज आणून कारखाना सक्षमपणे चालवू. सभासद, शेतकन्यांनी आमच्यावर विश्वास टाकून आघाडीला विजयी करावे. कारखान्याला गतवैभव प्राप्त करून देवू या वेळी अभिषेक शिंपी यांचे भाषण झाले.
या वेळी आनंदा फडके, रंगराव माडभगत, अशोक परीट, मनोहर पाटील, रणजित सरदेसाई यांच्यासह एरंडोल, पोळगाव व लाटगाव येथील सभासद, शेतकरी उपस्थित होते, आघाडीचे उमेदवार संजय पाटील, प्रकाश चव्हाण, भिक् गुरव, उमेश आपटे यांनी चिमणे, आरदाळ, पेंढारवाडी या उतूर- मडिलगे गटात प्रचार फेरी काढली. हात्तीवडे- मलिये गटात उमेदवार प्रा. सुनिल शिंत्रे, आनंदराव बुगडे, सुरेश सांवत यांनी समर्थकांसह प्रचार फेरी काढली. आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.

प्रचार आणि मतदारांच्या गाठीभेटी
करवाढ विरोधी समिती व नगरपंचायत प्रशासनामध्ये सकारात्मक चर्चा
आजरा नगरपंचायतमध्ये बैठक : विविध मागण्या मांडल्या

आजरा: प्रतिनिधी
नगरपंचायतीकडून झालेल्या करवाढीसह नगरपंचायतीशी संबंधित विविध प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आजरेकर आक्रमक होऊन आजरा बंदसह नगरपंचायतीवर विराट मोर्चा काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आजरा नगरपंचायत प्रशासनासोबत आज करवाढ विरोधी कृती समितीची बैठक झाली. या बैठकीमध्ये नगरपंचायत प्रशासनासोबत सकारात्मक चर्चा झाली. करवाढ विरोधी कृतीसमितीने विविध मागण्या मांडल्या. सकारात्मक पध्दतीने करवाढीतून मार्ग काढला जाईल. अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली. मुध्याधिकारी सुर्वे अध्यक्षस्थानी होते.
ग्रामपंचायतीच्या काळात काही जणांना बांधकाम परवाने दिले होते. काही दिले गेले नाहीत. त्यामुळे काही बांधकामे विनापरवाने झाली आहेत. त्यांच्यावर दंड न आकारता येवू नये, अशी मागणी करवाढ विरोधी कृती समितीने केली. याला प्रशासकीय अधिकारी यांनी मान्यता दिली. हा प्रश्न सामोपचाराने सोडवीला जाईल असे सांगीतले. काही उपकर लावले आहेत. ते नगरपंचायत प्रशासनाने लावले आहेत. ते रद्द करावेत अशी मागणी या वेळी करण्यात आली. त्याला प्रशाकीय अधिकान्यांनी समंती दर्शवली. आजरा तालुका हा अतिपावसाचा आहे. येथे अतिवृष्टी होत असल्याने छताची गळती होते. यावर नागरीकांनी पत्र्याचे शेड मारले आहे. यालाही प्रशासनाने कर बसवला आहे. हे अन्यायकारक आहे. हा वाढीव कर रह करावा, अशी मागणी या वेळी कृती समितीच्या सदस्यांनी केली.
कृती समितीचे अध्यक्ष परशराम बामणे, प्रा. सुधीर मुंज,ॲड. शैलेश देशपांडे, सुधीर कुंभार, संदिप पारळे, रवी तळेवाडीकर, अतुल पाटील, पांडुरंग सावरतकर, दिनकर जाधव, गाौरव देशपांडे, अमित खेडेकर उपस्थित होते.
आजरा शहरात नविन रिक्षा परवाने बंद करण्याची मागणी

आजरा : प्रतिनिधी
आजरा शहरामध्ये रिक्षाचे पन्नास परवाने मंजूर असून ते पूर्ण झाले आहेत. रिक्षातून प्रवास करणारे प्रवाशी खूप कमी झाले आहेत. सध्या रिक्षावर उदरनिर्वाह करणाऱ्या मंडळीना बँकेची कर्ज फेडणे, संसार चालवणे याकरीता बरीच आर्थिक कसरत करावी लागत आहे.
अशातच नवीन परवाने दिले गेल्यास सध्या असणारे रिक्षा चालकांच्या अडचणीत वाढ होणार आहे. त्यामुळे नवीन परवाने देणे बंद करावे. अशी मागणी रिक्षा मित्र मंडळाच्यावतीने प्रादेशीक परिवहन अधिका-यांकडे केली आहे. याबाबतच्या निवेदनावर संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत केसरकर, उपाध्यक्ष नामदेव घेवडे यांच्या सह्या आहेत.
निधन वार्ता
अनिल म्हापसेकर

आजरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्य व प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल मुकुंद म्हापसेकर (वय ७०) यांचे अल्पश: आजाराने कोल्हापूर येथे निधन झाले.
म्हापसेकर हे स्व. काशिनाथअण्णा चराटी यांचे विश्वासू कार्यकर्ते होते. आजरा सूतगिरणीच्या उभारणी त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या पश्चात आई,पत्नी, एक विवाहित मुलगा, विवाहित मुलगी, सून, जावई,पाच भाऊ, बहीण असा मोठा परिवार आहे.
इम्तियाज कौजलगी

हैदर नगर,आजरा येथील इम्तियाज सिकंदर कौजलगी (वय ४५ ) यांचे अल्पश: आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.
वसंतराव कोडक

वसंतराव लक्ष्मण कोडक वय (८०) रा. पेरणोली, तालुका आजरा यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी सुन व नातवंडे असा परिवार आहे. प्रगतशील शेतकरी म्हणून त्यांची ओळख होती सेवानिवृत्त वनपाल बाळासाहेब कोडक यांचे ते बंधू होत. रविवार दि १० रोजी सकाळी नऊ वाजता रक्षा विसर्जन कार्यक्रम पेरणोली येथे होईल.







