mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्रसामाजिक

बाप्पांच्या मुर्त्यांचे विसर्जन शांततेत व डॉल्बीमुक्त पद्धतीने करा : राजीव नवले….आजरा महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा…बारामतीवर झेंडा फडकवण्याची भाजपची तयारी, शरद पवारांच्या ‘दिल्ली ’काबीज करण्यासाठी हालचाली

 

 

 

बाप्पांच्या मुर्त्यांचे विसर्जन शांततेत व डॉल्बीमुक्त पद्धतीने करा : राजीव नवले

शांतता कमिटीची बैठक उत्साहात

गडहिंग्लज उपविभागात सर्व जाती-धर्माचे लोक एकत्र येऊन अत्यंत उत्साहात गेले आठ दिवस गणेश उत्सव साजरा करीत आहेत गणेश विसर्जन मिरवणुका काढत असताना कोणताही अनुचित प्रकार होणार नाही. त्या मिरवणुका शांततेत व डॉल्बीमुक्त पद्धतीने निघतील याची खबरदारी मंडळांनी घ्यावी असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी राजू नवले यांनी केले आजरा येथे आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. उत्साहाच्या भरात मध्ये कळत नकळत काही कार्यकर्त्यांकडून चुका होण्याची शक्यता असते अशा कार्यकर्त्यांना वेळीच मंडळाच्या जबाबदार मंडळींनी सूचना करून त्यांना अनुचित प्रकारापासून रोखावे. शांततेत व आदर्श पद्धतीने गणेश मूर्तींचे विसर्जन करावे असेही नवले यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस प्रशासन हे कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असते. मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा उपक्रम राबवला जात आहे असे असताना या उपक्रमामध्ये कोणत्याही प्रकारचे गालबोट लागणार नाही याची दक्षता घेण्याची जबाबदारी सर्वांचीच आहे. पोलिसांना सर्व मंडळांनी सहकार्य करावे असे आवाहनही नवले यांनी केले.

आज-याचे तहसीलदार विकास अहिर यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांनीही यावेळी मंडळांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शंकर उर्फ भैय्या टोपले, संजय इंगळे यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी व गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांशी संवाद साधून अडीअडचणी सांगितल्या. बैठकीवेळी सचिन इन्दलकर, पंचायत समितीचे माजी सदस्य बशीर खेडेकर, उमेश पारपोलकर, महेश पाटील, अजित हरेर, महेश पाटील, सागर नाईक यांच्यासह विविध मंडळांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आज आठवडा बाजार भरणार

अनंत चतुर्थी आजरा येथील  आठवडा बाजारदिवशी येत असल्याने आठवडा बाजार आज गुरुवार दि. 8 रोजी भरणार आहे.

आजरा महाविद्यालयात ‘शिक्षक दिन’ साजरा

आजरा महाविद्यालयात शिक्षक दिनाचे आयोजन एन. एस. एस. आणि भूगोल विभागाच्यावतीने करण्यात आले.

या कार्यक्रमाचे व्याख्याते प्रा. राम मधाळे हे होते. या प्रसंगी बोलताना त्यांनी विद्यार्थी व शिक्षक याचे नाते दृढ व्हावे असे मत व्यक्त केले. त्यांनी प्राचिन कालखंडापासून आजतागात विद्यार्थी आणि शिक्षक यांचे नाते व काळानुसार त्यामध्ये काय बदल झाले याचा सविस्तर आढावा घेतला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. . ए. एन. सादळे यांनी औपचारिक व अनौपचारिक शिक्षणाचा आढावा घेतला व नविन शैक्षणिक धोरणातील बदलाची माहिती दिली. बदलत्या कालावधी ‘नुसार शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी आपल्यामध्ये काय बदल केले पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातीन विद्यार्थी, शिक्षक सहभागी होते कु. श्वेताली तावडे व कोमल कुंभार या विद्यार्थीनीने आपले मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे आयोजन व सुत्रसंचलन डॉ. रणजित पवार यांनी प्रास्ताविक डॉ. धनंजय पाटील व आभार प्रा. अनुराधा गोटखिंडे यांनी मानले.

बारामतीवर झेंडा फडकवण्याची भाजपची तयारी,

शरद पवारांच्या ‘दिल्ली ’काबीज करण्यासाठी हालचाली

– नवी दिल्ली –-

भाजपसोबत काडीमोड घेऊन बिहारमध्ये मोठा भूकंप घडवलेले नितीश कुमार आता भाजपला राष्ट्रीय राजकारणामध्ये धक्का देण्याच्या तयारीत आहेत. नितीश कुमार यांच्या याच योजनेचा भाग म्हणून त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे पहिले जात आहे. कुमार यांनी गेल्या दोन – तीन दिवसांमध्ये राहुल गांधी, अरविंद केजरीवाल, सीताराम येच्युरी या बड्या नेत्यांची भेट घेतली आहे. नितीश कुमार यांच्या या भेटीगाठींची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये सुरु असतानाच आज ते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीला पोहोचले आहेत.*

तत्पूर्वी, नितीश कुमार यांनी बिहारमध्ये युतीतून बाहेर पडत जेडीयू – भाजप सरकार पाडले. यानंतर त्यांनी लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलासोबत आघाडी करत पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. भाजपसोबत सरकारमध्ये असताना नितीश कुमार यांची घुसमट होत असल्याचं पाहायला मिळत होते.

त्यातच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनेला भगदाड पडल्याच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये जेडीयूसोबतही असाच प्रकार सुरु असल्याची चर्चा पक्षात सुरु होती. नितीश कुमार यांनी संभाव्य धोका लक्षात घेता भाजपसोबत काडीमोड घेतल्याच राजकीय जाणकार सांगतात. भाजपसोबत काडीमोड घेण्यामागे त्यांची पंतप्रधानपदाची महत्वकांक्षा होती असेही सांगितले जात आहे.

भाजपसोबत काडीमोड घेतल्यानंतर नितीश कुमार राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय. आज शरद पवार यांच्याशी झालेल्या भेटीनंतर कुमार यांनी राष्ट्रीय पातळीवर विरोधकांची मोट बांधण्याबाबत चर्चा झाल्याचे माध्यम प्रतिनिधींना सांगितले. शरद पवार हे देखील राष्ट्रीय पातळीवर विरोधकांना एकत्र आणून भाजपला पर्याय देण्याच्या प्रयत्नात आहेत.

केद्रीय यंत्रणांचा ससेमिरा

देशात विरोधी पक्षाच्या नेत्यांवर केंद्रीय यंत्रणा मोदी सरकारच्या इशाऱ्यावर कारवाई करत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. नितीश कुमार हाच धागा पकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांना भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी एकत्र आणण्याच्या प्रयत्नात आहेत. नितीश कुमार यांना २०२४ लोकसभा निवडणुकांमधील विरोधकांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पाहिलं जातंय. या स्पर्धेमध्ये आम आदमी पक्षाचे अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व काँग्रेस नेते राहुल गांधी हे देखील असल्याचं मानलं जातंय. असं असलं तरी नितीश कुमार यांनी, आपण ना तर पंतप्रधानपदाचा चेहरा आहोत ना आपल्याला या पदाची महत्वकांक्षा आहे असं स्पष्ट केलंय.

भाजपचे मिशन बारामती

दरम्यान, बारामती हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपरिक गड मानला जातो. हा गड काबीज करण्यासाठी भाजपने जोरदार हालचाली सुरु केल्या आहेत. भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकताच बारामती दौरा केला. यावेळी त्यांनी पवार यांचा हा गड भाजप २०२४ मध्ये खालसा करेल असा विश्वासही व्यक्त केला. बारामतीमध्ये खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी सभा घेतील असं सांगत बावनकुळे यांनी आपले इरादे स्पष्ट केले.

राष्ट्रीय पातळीवर महाविकास आघाडी

२०१९ विधानसभा निवडणुकांनंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीची स्थापना करत सत्तेचा घास भाजपच्या तोंडून हिरावला होता. याहूनही महत्वाचे म्हणजे शिवसेना या हिंदुत्ववादी विचासरणीच्या पक्षाला त्यांनी सोबत घेऊन सरकार चालवले. सेनेमध्ये झालेल्या अंतर्गत बंडागळीमुळे सरकारला पायउतार व्हावे लागले आहे. मात्र २०२४ लोकसभा निवडणुकांपूर्वी महाविकास आघाडी सारखा प्रयोग राष्ट्रीय पातळीवर करून भाजपला सत्तेतून दूर ठेवण्याची चाल शरद पवार खेळत असल्याचे समजते.((source: Online news network)

 

  आजरा गणेश दर्शन

 

सुभाष चौक मंडळ

 

 

शिवसेना

 

 

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

लिंगायत गल्ली  मंडळ

भाजी मंडई 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रणधुमाळी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!