mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

मोटरसायकल अपघातात जेऊरचा युवक ठार

 

यमेकोंड- शिरसंगी दरम्यान झालेल्या अपघातात जेऊर येथील  एक जण ठार

मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आजरा- बेळगाव मार्गावर यमेकोंड ते शिरसंगी दरम्यान मोटरसायकल चारचाकीला धडकून झालेल्या अपघातात जेऊर (ता.आजरा)येथील विनायक बाळू पोवार  हे जागीच ठार झाले.

याबाबतची मिळालेली अधिक माहिती अशी की, पोवार हे यमेेकोडं येथे असणाऱ्या वन विभागाच्या लाकुड   जमा करण्याच्या डेपोमध्ये कामावर होते. मंगळवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास रामलिंग देवस्थान नजीक अज्ञात वाहनाला त्यांच्या दुचाकीची धडक बसल्याने ते गाडीवरून कोसळून गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

याबाबतची फिर्याद मारुती महादेव चव्हाण यांनी आजरा पोलिसात दिली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करीत आहे. पवार यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, मुलगा असा परिवार आहे.

….

मयत कर्मचा-यांच्या वारसास आजरा साखर कारखान्याकडून आर्थिक मदतीचा हात

आजरा साखर कारखान्यात कामावर असतांना कोणताही कर्मचारी मयत झालेस त्यांच्या वारसास कर्मचा-यांच्या पगारातून १ टक्का पगाराची रक्कम व तेवढीच रक्कम व्यवस्थापनाकडून देणेची प्रथा कारखान्याने आजअखेर सुरू ठेवली आहे. कारखान्याकडील ८ कर्मचारी कारखाना पटावर असतांना मयत झाले. मयत झालेल्या वारसांना प्रत्येकी रू.२,११,६३६ इतक्या रक्कमेचे चेक मयत कर्मचा-यांच्या वारसास वाटप करण्यात आले. यातुन कर्मचारी व व्यवस्थापन यांचेमधुन कर्मचा-यांचे वारसांचे भवितव्य जोपासण्यात येत आहे. कारखान्याचे चेअरमन, श्री. सुनिल शिंत्रे, व्हा.चेअरमन, श्री. आनंदा कुलकर्णी, संचालक या प्रसंगी श्री.दिगंबर देसाई, श्री. सुधीर देसाई, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.सुनिता रेडेकर, संचालक श्री. मुकुंददादा देसाई, श्री.एम. के. देसाई, श्री. दशरथ अमृते, श्री. अनिल फडके, श्री. जनार्दन टोपले, श्री. राजेंद्र सावंत, संचालिका सौ. विजयालक्ष्मी देसाई, संचालक श्री. आनंदा कांबळे, श्री.तानाजी देसाई तसेच कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ.श्री.टी.ए.भोसले, जनरल मॅनेजर (टेक्नी) श्री.वसंत गुजर, प्रोडक्शन मॅनेंजर श्री.एस.बी.मल्हारी, सेक्रेटरी श्री. व्ही.के.ज्योती, इन. लेबर ऑफीसर श्री.एस.पी.भादवणकर कामगार संघटना अध्यक्ष श्री. प्रकाश देसाई व सदस्य तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

पेंढारवाडीत दोन जनावरांना ‘लंपी’ ची लागण ? गडहिंग्लज उपविभाग हादरला….

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

उत्तूर येथे जुगार अड्ड्यावर छापा… पावणे नऊ लाखांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती.. अकरा जणांविरोधात गुन्हा नोंद

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!