mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शनिवार १४ फेब्रुवारी २०२६

कोल्हा पिसाळला…
हल्ल्यात तिघे जखमी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यातील चितळे, शृंगारवाडी व वाटंगी येथे पिसाळलेल्या कोल्ह्याने धुमाकूळ घातला आहे. दोन दिवसांत पिसाळलेल्या कोल्ह्याने तिघांवर हल्ला करून जखमी केले आहे. चितळे येथील तन्मय दिगंबर सरदेसाई (वय ११ वर्षे) याच्यावर स्थानिक शाळेनजिक, शृंगारवाडी येथील रामू खवरे (वय ७५ वर्षे ) व वाटंगी येथील पार्वतीबाई शंकर नांदवडेकर (वय ६५ वर्षे) यांच्यावर शेतात हल्ला करून कोल्ह्याने चावा घेतला आहे. आजरा ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, पिसाळलेल्या कोल्ह्यामुळे या परिसरात शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने या कोल्ह्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे..

सरपंच पदाच्या दोन व सदस्य पदाच्या सहा जागांसाठी मार्चमध्ये पोटनिवडणूक…?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कोरीवडे, पेरणोली सरपंच पदासह तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सहा सदस्य पदांच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. निवडणूक कार्यक्रमाचे स्वरूप पाहता मार्च महिन्यात या निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये देऊळवाडी येथील सदस्य पदाची एक, मडिलगे येथील सदस्य पदाच्या दोन, बहिरेवाडी, हरपवडे, धामणे येथील सदस्य पदाची  एक व कोरीवडे, पेरणोली सरपंच पदाच्या रिक्त जागांचा समावेश आहे.

या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १६ फेब्रुवारी रोजी प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.या यादीवर हरकती व सूचना दाखल करण्याचा कालावधी १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी हा रहाणार असून प्रभाग निहाय अंतिम मतदार यादी शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी सुधीर देसाई

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुधीर राजाराम देसाई यांची निवड झाली आहे.

जिल्हा बँक व आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष राजारामबापू देसाई यांचे ते चिरंजीव असून आजरा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पद व तालुका संघाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे ते कट्टर समर्थक आहेत. पेरणोली जिल्हा परिषद मतदार संघातून अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपाचे जयवंतराव सुतार व शिवसेना शिंदे गटाचे विष्णुपंत केसरकर यांचा पराभव करत ते निवडून आले आहेत. सध्या ते आजरा साखर कारखान्यावर जिल्हा बँकेचे प्रतिनिधित्व करत आहेत.

उत्तूर जि.प. मतदार संघाकरीता झालेले गाववार उमेदवार निहाय मतदान

उमेदवार निहाय गाववार पडलेली मते

अनुक्रमे…

विठ्ठल उत्तुरकर/शिरीष देसाई/उमेश आपटे

उत्तुर- १५५६/ १३८६/ २१०९

पेंढारवाडी-  ९२/ १४७/ १३१

मुम्मेवाडी- १७५/ ५०४/ ३१८

महागोंड- २३०/ ३४७/ २७०

धामणे- ३०७/ ४५७/ ४६९

आरदाळ- ४३७/ ३४२/ १७०

बहिरेवाडी- ३५५/ ७५२/ १०३८

वडकशिवाले- १०४/ ३१०/ १३९

बेलेवाडी हु.- ४१५/  २२१/ ३०९

चव्हाणवाडी- ४२/ ३१०/ २०७

हालेवाडी- २४१/ ३६६/ १२७

होन्याळी- ३००/ ४९६/ २४२

झुलपेवाडी- ९६/ ३९१/ ३१२

कर्पेवाडी- ६५/ ३३७/ १०३

चिमणे- ३०३/ ३०४/ १५७

भादवण- ४०१/ ७१३/ ७५१

पेद्रेवाडी- १७३/ २८४/ १४६

मडीलगे- ३७९/ ८७७/ ५०९

मासेवाडी- २६०/ १९८/ १८३

चांदेवाडी- ९६/ १०१/ ८३

जाधेवाडी- ७३/ १७३/ ५१

वझरे- ५०९/ १६३/ १४०

भादवणवाडी- १९३/ २६४/ १३७

हाजगोळी बु.- १३२/ १५५/ १६५

हाजगोळी खु.- ७६/ १३८/ ६९

सरोळी- १८४/ ४५२/ २७९

सुलगाव- १५३/ १७०/ ९८

सोहाळे- ३४२/ २४५/ १३८

निंगुडगे-२३५/ ३९३/ ३००

खेडे- २०९/ २७५/ १७५

मुंगूसवाडी- १२२/ ८७/ ४०

खोराटवाडी- १७/ २३४/३९

कानोली- १६२/१८२/१५४

हारुर- १३९/१४०/७२

कोवाडे- ४६६/३५७/२७९

गजरगाव- ३४७/४२३/३६६


विठ्ठल उत्तुरकर ९३८६

शिरीष देसाई १२६९४

उमेश आपटे १०२५४


विजयी उमेदवार शिरीष देसाई/ राष्ट्रवादी काँग्रेस


(सूचना : आकडेवारी छपाईत एखादी चूक असू शकते.)

वाटंगी पंचायत समिती करीता झालेले उमेदवार निहाय गाववार मतदान

अनुक्रम…

समीर पारदे / सतीश फडके / राजाराम होलम

वाटंगी-  ३५६/ ११३/ ५२२

मोरेवाडी-  १२५/१०/१९३

मलिग्रे-  ९२३/१०९/२२९

मेंढोली-   ३९४/१५५/३६७

चाफवडे-  २०८/४५/२९५

लाकूडवाडी-  १३३/५०/२६७

शिरसंगी-  ५०७/८६/४६२

यमेकोंड-  ८९/७७)१७६

चितळे-   २३८/११२/३४८

किणे-   ५२०/३७४/१४५

बुरुडे-   १६८/१३७/३६८

मुरुडे-   ३०६/६१/२९३

हात्तीवडे-   २५६/९५/२५०

होनेवाडी-   २२३/६१/१६३

सरंबळवाडी-   २३३/२३१/२०३

सुळे-   १४३/४३३/१९८

शृंगारवाडी-    २०८/३७/१३०

उचंगी-    ४९/१६/१९७

कोळींद्रे-    ७५३/२४२/३०६

हांदेवाडी-    ७७/७२/१२२

समीर पारदे – ‌६२२६
सतीश फडके – २५७२
राजू होलम – ५२६३

समीर पारदे/भाजपा विजयी..

जोएल आशिष डिसोझा याचा महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत डंका

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

कु. जोएल आशिष डिसोझा याची महाराष्ट्र सेवा लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेमधून कृषी अधिकारी पदी निवड झाली आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. जोएल डिसोझा याचे प्राथमिक शिक्षण रोझरी इंग्लिश हायस्कूल, आजरा येथे तर उच्च माध्यमिक शिक्षण आजरा महाविद्यालय आजरा येथे झाले. त्यानंतर त्याने कडेगाव सांगली येथील कॉलेज ऑफ ॲग्रीकल्चर येथून पदवीचे शिक्षण घेतले व स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला. त्यातून त्यांनी हे यश संपादन केले. जोएल हा आशिष डिसोझा के डी सी सी बँक आजरा, चे माजी व्यवस्थापक यांचा चिरंजीव आहे.

श्रीक्षेत्र चाळोबा देव येथे आज महाप्रसाद

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा – आंबोली मार्गावरील हाळोली, दर्डेवाडी परिसरात असणाऱ्या श्री क्षेत्र चाळोबादेव येथे मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वर्धापन समारंभ व सत्यनारायण महापूजे निमित्त आज शनिवार दिनांक १४ फेब्रुवारी रोजी तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती चाळोबा देव कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष गोविंद केरकर, उपाध्यक्ष बंडोपंत पोवार व सचिव रमेश पवार यांनी दिली आहे.

सकाळी नऊ वाजता धार्मिक विधी व महापूजा होणार असून सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

छाया वृत्त

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव सुगम गायन स्पर्धेत प्राथमिक गटातून कु. रश्मी उदय गवस (गडहिंग्लज) हिने प्रथम क्रमांक मिळविला, कु. आर्या पिलाजी गावडे (लाटगाव, ता. आजरा) हिने व्दितीय तर कु. सार्थक भिमराव मनगुते (गडहिंग्लज) याने तृतीय क्रमांक मिळवीला. माध्यमिक गटातून कु. कौस्तुभ संतोष सुतार (वेगवडे ता. भुदरगड) याने प्रथम क्रमांक मिळविला, कु. हर्षदा महादेव पाटील (विटे, ता. आजरा) हिने व्दितीय तर कु. रिया रत्नाकर धुरे (उत्तूर) हिने तृतीय क्रमांक मिळवला. मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.

तयारी रामतीर्थ यात्रेची

महाशिवरात्रीनिमित्त रामतीर्थ आजरा या ठिकाणी भरणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर नगरपंचायतीने तयारी सुरू केली असून. परिसरातील मंदिरांची रंगरंगोटी, स्वच्छता करण्यात येत आहे. रविवार दिनांक १५ रोजी महाशिवरात्री असून रविवार व सोमवार रोजी येथील रामतीर्थ यात्रा आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गॅस सिलेंडरच्या आगीतील जखमीचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

Admin

देवकांडगाव येथील तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू…बहिरेवाडी येथे मारामारी… चार जखमी

mrityunjay mahanews
error: Content is protected !!