mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

सातच्या बातम्या

आज मतमोजणी…
आजरा साखर कारखाना निवडणूक


                  आजरा : प्रतिनिधी

       आजरा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला आज मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून पंचायत समिती सभागृहात (पहीला मजला) सुरुवात होणार आहे. एकूण ४६ टेबलवर सदर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. क्रमाने पहिल्या ४६ केंद्रावरील मतपेट्यांमधील मतांची मोजणी पहिल्या टप्प्यात तर उर्वरित मतपेट्यांमधील मतांची मोजणी त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार आहे. या मतमोजणीमध्ये ब वर्गाचीही मतमोजणी टप्प्याटप्प्याने होणार आहे.

     दुपारी बारा वाजल्यानंतर निवडणुक निकाल कल स्पष्ट होत जातील.

पराभव स्पष्ट झाल्याने विरोधकांचे आरोप:सुधीर देसाई

                    आजरा:प्रतिनिधी

       आजरा साखर कारखाना निवडणुकीसमोर दिसणारा पराभव व विरोधकांचा कमी झालेला जनाधार यामुळे मडिलगे येथे झालेल्या प्रकाराचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जात आहे. या प्रकरणाशी राष्ट्रवादीचा काडीचाही संबंध नाही. विरोधक करीत असलेले आरोप बेछूट असून स्वतः बोगस मतदानाची यंत्रणा वापरणाऱ्यांना विरोधकांचे हे आरोप ‘ चोरांच्या उलट्या बोंबा आहेत’ असे रवळनाथ विकास आघाडी प्रमुख सुधीर देसाई यांनी सांगीतले.

       येथील तालुका संघाच्या कार्यालयात पत्रकार बैठक झाली. विरोधकांनी केलेले आरोप पहाता त्यांच्या बुध्दीची कीव करावीशी वाटते. गडहिंग्लज येथील दोन कॉलेजवर  बोगस आधारकार्ड तयार करण्यामागे कोण होते ? पोळगाव (ता. आजरा) येथील झालेले बोगस मतदान कोणाचे होते ? याचे आत्मपरिक्षण केल्यानंतर या प्रश्नांची उत्तरे निश्चितच विरोधकांना मिळतील.

       या निवडणुकीत दीड हजार ते दोन हजार मतांनी रवळनाथ आघाडीचा विजय निश्चित असल्याचा त्यांनी दावा केला. या वेळी त्यांनी ब वर्ग सभासद मतदानाच्या अधिकाराबाबत आमच्या आघाडीला काहीही कल्पना नव्हती. विरोधक मात्र या मतदानाच्या अधिकाराबाबत दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत. असेही त्यांनी सांगीतले.

     या वेळी वसंतराव धुरे, दीपक देसाई, उदयराज पवार, अबूताहेर तकिलदार, रशिद पठाण, शिरीष देसाई, गोविंद पाटील, एम. के. देसाई, रणजित देसाई, मारुती घोरपडे, दिगंबर देसाई, राजू मुरकुटे, राजू होलम,सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई आदी उपस्थित होते.

मडिलगे ते आजरा एमआयडीसी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा…

अन्याय निवारण संघाची मागणी


                  आजरा: प्रतिनिधी

         संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्गाचे काम प्रगतीपथावर चालू आहे. या महिनाअखेर होणारा ख्रिसमस सण व वर्षाअखेर असल्याने या मार्गावरून गोव्याकडे होणारी वाहनांची वाहतूक त्याचबरोबर साखर कारखान्याची ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या जास्त आहे. ह्याचा त्रास व होणारे अपघात हे आजरेकरवासियांना त्रासदायक आहेत. या समस्या लक्षात घेऊन मडीलगे ते आजरा MIDC पर्यंत रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ती आपण तातडीने दुरुस्त करून घेण्याविषयी  संबंधीत विभागांना लवकरात लवकर सूचना द्याव्यात. अशी मागणी आजरा रहिवाशी अन्याय निवारण संघाने आजरा तहसीलदारांकडे केली आहे. याबाबतचे लेखी निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे.

       साळगाव रस्ता क्रॉस ते MIDC आजरा च्या दरम्यान उभी असणारी (पार्कींग) असणारी वहाने काढणे संदर्भात आपल्या स्तरावर योग्य ते नियोजन व्हावे म्हणजे होणारे अपघात व वाहतुकीची समस्या याचे निवारण होईल असेही या निवेदनात म्हटले आहे.

      या निवेदनाची तहसीलदार समीर माने यांनी तातडीने दखल घेत बुधवार दिनांक २० रोजी तहसील कार्यालयात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, पोलीस प्रशासन, आजरा नगरपंचायत व महामार्गाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.

     यावेळी परशुराम बामणे,विजय थोरवत, प्रभाकर कोरवी, नाथा देसाई, गौरव देशपांडे, महेश दळवी, दिनकर जाधव, रवी तळेवाडीकर, राजेश विभुते, अतुल पाटील, यांच्यासह शहरवासिय उपस्थित होते.


संबंधित पोस्ट

उचंगी संदर्भात पालकमंत्र्यांची बैठक… रामतीर्थ यात्रा होणार.. आजऱ्यातील नाट्यस्पर्धेत ‘स्टार’ची बाजी

mrityunjay mahanews

येणाऱ्या सर्व निवडणुकीत शिंपी-चराटी युतीचा वारू कोणी अडवू शकणार नाही : अशोक चराटी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लव्हरला फोन …? आजऱ्यात मारामारीत दोघे जखमी… तिघांविरोधात पोलिसात गुन्हा नोंद….देवर्डे येथून तरूण बेपत्ता..

mrityunjay mahanews

आज-यात ३३ वर्षीय तरुणाची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!