

जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात

‘बहुजन समाजाची बँक’ अशी ओळख असणाऱ्या जनता सहकारी बँकेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दिनांक १ फेब्रुवारी पासून नामनिर्देशन पत्रे दाखल करण्याचा कालावधी सुरू होत आहे. हा कालावधी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत असेल.
गडहिंग्लजचे सहाय्यक निबंध ए. व्ही. गराडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता दाखल नामनिर्देशन पत्रांची छाननी तर माघार घेण्याचा कालावधी ९ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे मतदान प्रक्रिया ५ मार्च रोजी होणार असून सहा मार्च रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येईल.
निवडणूक प्रक्रियेचा नामनिर्देशन पत्र दाखल करणे, छाननी इत्यादी कार्यक्रम सहाय्यक निबंधक कार्यालय, आजरा येथे होणार आहे.

हत्ती व गव्यांसदर्भात शुक्रवारी बैठक
आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने शुक्रवार दि ३ रोजी वनविभाग आजरा येथे आजरा तालुक्यातील हत्ती व गवे व शेतकऱ्यांच्या विविध अडचणी संदर्भात जिल्हा प्रमुख विजय देवणे यांच्या उपस्थितीत व माननीय मुख्य वन संरक्षक, कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली आजरा तहसीलदार यांच्या उपस्थितीत दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. तरी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी उपस्थित राहून आपले प्रश्न मांडावेत असे आवाहन युवराज पोवार ,शिवसेना तालुका प्रमुख आजरा यांनी केले आहे.

सेवानिवृत्ती नंतरचे आयूष्य मनमूराद आनंदाने जगा -शिक्षण उपसंचालक महेश चोथे
सेवानिवृत्तीनंतरचे उर्वरित आयूष्य मनमुराद,आनंदाने जगावे जीवनातील राहिलेल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करुण निरोगी जीवन जगावे असे प्रतिपादन शिक्षण उपसंचालक महेश चोथे यांनी केले.
व्यंकटराव हायस्कूल व ज्यूनि. काॕलेजचे प्राचार्य सुरेशराव खोराटे सेवानिवृत्ती शुभेच्छा समारंभ व आजरा महाल शिक्षण मंडळाचे नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.यावेळी शिक्षण उपसंचालक महेश चोथे बोलत होते. कोल्हापूर विभागीय मंडळाचे सचिव डी.एस.पोवार यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला.
श्री डी.एस. पोवार म्हणाले, खोराटे यांचे अध्यापन, कार्य,सामाजिक नातेसंबध जोपासण्याचे अनुकरण प्रत्येक शिक्षकांने केले पाहिजे.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आजरा महाल शिक्षण मंडळाचे चेअरमन जयवंतराव शिंपी यांनी खोराटे परिवाराला शुभेच्छा दिल्या.व्यंकटराव परिवाराच्या वतीने सन्मानपत्र व भेटवस्तू देवून गौरव करणेत आला. संचालक सुनिल देसाई यांनी खोराटे यांच्या कार्याचा आढावा घेतला. सत्कारमूर्ती श्री खोराटे यांनी दिलखुलास शैलीत आपले सेवा काळातील अनुभव सांगितले व “सर्वांनी आपल्या नेमून दिलेल्या कामाशी प्रामाणिक रहा, शांत संयमी रहा, कला जोपासा समाजसेवा करा नक्कीच याचा फायदा होईल असा संदेश दिला. यावेळी संस्थेचे नूतन संचालक, बाल गिर्यारोहक, अन्वी घाटगे,आदर्श शिक्षक पुरस्कार शिक्षक डाॕ. मारुती डेळेकर यांचे सत्कार करणेत आले. प्रास्ताविक पर्यवेक्षक एस.एन पाटील व सुत्रसंचलन आर.पी. होरटे व पी.व्ही.पाटील यांनी केले.आभार प्रा.एस. व्ही. पारळे यांनी मानले.
यावेळी मुख्याध्यापक श्री एस एस बिद्रे , आर. जी. कुंभार,श्री.संजय सावंत,आदर्श हायस्कूल शिरसंगी,भादवण हायस्कूल,रवळनाथ हायस्कूल देवर्डेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी,व्यंकटराव प्राथमिक,हायस्कूल, ज्युनिअर कॉलेजचे सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


