mrityunjaymahanews
अन्य

उत्तूर येथील दुचाकी अपघातात नवविवाहीत तरुणाचा मृत्यू

उत्तूर नजिक अपघातात नवविवाहीत युवक ठार

 

शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उत्तूर गडहिंग्लज मार्गावर झालेल्या अपघातात किरण जोतिबा इंगळे ( वय 27 ,रा. बारवे ता.भुदरगड) या नवविवाहीत तरुणाचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाला.

 

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, भुदरगड तालुक्यातील बारवे येथील तरुण किरण हा गडहिंग्लज येथील ट्रॅक्टर शोरूम मध्ये कामाला होता.नेहमीप्रमाणे तो   दुचाकीवरून गडहिंग्लजच्या दिशेने   शुक्रवारी सकाळी चालला असता उत्तूरनजीक एका अज्ञात वाहनाने त्याला  ठोकरल्याने यामध्ये त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. सकाळी नऊच्या सुमारास वांजोळेवाडी वसाहतीनजीक हा अपघात घडला.

 ठोकर दिलेल्या वाहनधारकाने वाहनासह पळ काढला. वाहनाने ठोकरल्याने  किरण  रस्त्याकडेला रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.

 

शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या किरण याने आटो मोबाईल मध्ये पदवी संपादन केली होती. त्याचे आठ महिन्यांपूर्वी लग्न झाले आहे. एकुलता एक असणाऱ्या मुलाचा अशा पद्धतीने अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्यानं त्याच्या आई-वडिलांसह बारवे गावावर शोककळा पसरली आहे.

महादेव इंगळे यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांत या घटनेची नोंद झाली असून अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे

@

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गवसेजवळ १० कोटी ७४ लाखांची व्हेल माशाची उलटी जप्त

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!