mrityunjaymahanews
कोल्हापूरठळक बातम्या

गव्याच्या हल्ल्यात बुरुडे येथील दोघे जखमी… अंगणवाडी सेविकांविरोधात बदनामीकारक संदेश व्हायरल…आज-यात तीव्र संताप

गव्याच्या हल्ल्यात बुरूडे येथील दोघे जखमी

कामानिमित्त उचंगी धरणाच्या दिशेने जाणाऱ्या बुरूडे ऋषिकेश शामराव कांबळे( वय 24)व दिनकर लक्ष्मण कांबळे (वय 34) या दोघांवर गव्याने हल्ला केल्याने दोघेही जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.,

व्हॉट्सअपवर अंगणवाडी  सेविकांबाबत मानहानीकारक मजकूर  आज-यात् तीव्र संताप… 

अंगणवाडी सेविकां बाबत मानहानीकारक संदेश एका तरुणाने आज आपल्या व्हाट्सअप स्टेटस वर ठेवल्याने अंगणवाडी वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. अंगणवाडी सेविका गैर धंदे करत असल्याबाबतचा आरोप या संदेशातून करण्यात आला. याप्रकरणी अधिक माहिती हवी असल्यास आपल्याशी संपर्क साधावा असे आपल्या फोन नंबरसह आवाहन संबंधित  व्यक्तीने केले आहे.

याबाबत अंगणवाडी सेविका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून संताप व्यक्त केला गेला आहे. या प्रकरणाविरोधात योग्य ती कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शनिवारी दिवसभर मात्र या प्रकरणाची जोरदार चर्चा आजरा शहरांमध्ये सुरू होती.अंगणवाडी सेविकांकडून या प्रकाराचा निषेध केला जात आहे.

 हुडे येथे गव्याचा  मृत्यू

 

हुडे(ता.आजरा)येथे मृतावस्थेतील गवा आढळून आला.सदर गव्याचा लाळ खुरकतणे मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.वणविभाग व पशुधन विभागाकडून सदर मृत गव्याविषयी अधिक माहिती घेतली जात आहे.

शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा निषेध
कोणत्याही प्रकारच्या हिंसेला  विरोधच…
श्रमिक मुक्ती दलाची भूमिका

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. कोणत्याही प्रकारच्या हिंसेला आमचा विरोध असून हिंसेतूनच शोषण होते. आपले अधिकार आणि हक्क सनदशीर मार्गाने मागण्याचा अधिकार या देशातील प्रत्येक नागरिकाला घटनेने दिला आहे. एस टी कर्मचा-यांना शांततामय मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार आहे तो त्यांनी आवश्य वापरावा. पण चुकीच्या दिशेने जाऊ नये. ही घटना महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय जीवनाला धक्का देणारी आहे. कोणत्याही पक्षसंघटनेच्या नेतृत्वाच्या अथवा कार्यकर्त्यांच्या घरावर जमावाने जाऊन दगडफेक करणे हे निषेधार्ह आहे. श्रमिक मुक्ती दल या घटनेचा तीव्र निषेध करीत आहे असे स्पष्ट केले आहे.

यावेळी डॉ. भारत पाटणकर कॉ. संपत देसाई
चैतन्य दळवी ,युवा आधाडी अध्यक्ष
श्रमिक मुक्ती दल हे उपस्थित होते.

आजरा येथील सुवर्ण महोत्सवी वर्षात स्वामी विवेकानंद पतसंस्थेला २ कोटी ९३ लाखाचाढोबळ नफा

चेअरमन श्री. जनार्दन टोपले यांची माहीती

आजरा येथिल स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था या संस्थेने सन २०२१-२२ सालात २८२ कोटी व्यवसाय केला असून संस्थेला २ कोटी ९३ लाखांचा ढोबळ नफा झाला असल्याची माहिती चेअरमन श्री. जनार्दन टोपले यांनी दिली.

संस्था ग्राहकाभिमुख पारदर्शी कारभार ग्रामिण भागा बरोबर शहरी भागातही दमदार पाऊल टाकत सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे करत आहे.

संस्थेचे वसुल भाग भांडवल ३ कोटी ४० लाख इतके असून, संस्था ठेवीदारांच्या विश्वास पात्र ठरल्याने आर्थिक वर्षात संस्थेच्या ठेवी सुमारे रु. २९,३९,१४,२१९/- इतक्या वाढ होऊन एकूण ठेवी रु. १५८,३३,५६,०४०/- इतक्या झाल्या आहेत वाढीचे शेकडा प्रमाण २२.७९ टक्के इतके आहे.

संस्थेचे कर्ज वाटप चालु वर्षी रु.२६,६४,२१,४७४/- इतके वाढून एकूण कर्ज वाटप रु.१२४,२५,७०,७२१ /- इतके झाले आहे. कर्ज वाढीचे शेकडा प्रमाण २७.२९ टक्के इतके आहे. संस्थेची गुंतवणूक ५० कोटी ७२ लाख इतकी असून गुंतवणूक वाढीचे शेकडा प्रमाण १७.१८ टक्के इतके आहे. संस्थेचा एकूण व्यवसाय २८२ कोटीपेक्षा अधिक आहे.

संस्थचे मुख्य कार्यालय आजरा येथे असून संस्थेची मेन रोड आजरा येथे दोन मजली भव्य स्वमालकची इमारत असून मुख्यकार्यालयासह शाखा भादवण, पेरणोली, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ला व कोल्हापूर शहरामध्ये आझाद चौक व कसबा गेट, महाद्वार रोड कोल्हापूर आणि राज्याची राजधानी मुंबई डिलाईल् रोड येथे शाखा असून सर्व ठिकाणी संस्थेच्या स्वमालकीच्या इमारती आहे. असे संस्थेचे चेअरमन श्री. जनार्दन टोपले यांनी सांगितले आहे.

संस्थेने मुख्यकार्यालय व नऊ शाखेच्या माध्यमातून सभासदांना छोटे मोठे व्यवसाय व व्यवसायवाढी करीता कर्ज पुरवठा केला आहे. त्याचबरोबर महिलांना रोजगार उपलब्ध व स्वावलंबी होणेकरीता बचत गट तयार करुन कर्ज वितरण केले आहे. त्याचबरोबर काजु व्यावसायिक व उद्योगांना व सर्व प्रकारचे व्यापारी यांना त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत केली आहे.

त्याच बरोबर संस्थेने सामाजिक बांधिलकी म्हणून विविध प्रकारची आर्थिक मदत केली आहे संस्थेकडे सर्व शाखांकडे ऑनलाईन वीजबील, फोन बील, मोबाईल बील, डिटीएच चार्ज सर्व प्रकारची विमा पॉलिसी उतरविणेची सोय भारतातील प्रमुख शहरावर डि. डि. काढण्याची सुविधा संस्थेच्या सर्व शाखामधुन सोनेतारण कर्जाची सोय, सर्व शाखामधुन मनीट्रान्सपर करणेची सोय सभासदांचा विमा उतरविण्याची सोय एनईएफटी, आरटीजीएस क्यु-आर कोड, आयएमपीएस, बीबीपीएस, एसएमएस इ. अनेक सुविधा सभासदांकरीता उपलब्ध करणेत आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणीकृत आहेत

संस्थेला अनेक राज्यपातळी वरील पुरस्कार प्राप्त झाले असून विशेषतः सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये शाखा बांदा, सावंतवाडी वेंगुर्ला या शाखांचे माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये सहकार रुजविण्याचे काम संस्थेने केले आहे. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात अग्रगण्य अशी पतसंस्था म्हणून स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्थेची ख्याती प्राप्त असून दिपस्तंभासारखे कार्य व प्रगती चढत्या क्रमाने प्रगती करत आहे. संस्था २०२२ – २०२३ साल हे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरु असून संस्था सभासद, ठेवीदार, कर्जदार, ग्राहक, हितचिंतक यांचे सहकार्याने मोठ्या प्रमाणात सुवर्णमहोत्सव कार्यक्रम साजरे करीत आहे. त्यामध्ये सांस्कृतिक सामाजीक उपक्रम वर्षभर राबविणेत येत आहेत. अशी माहीती संस्थेचे चेअरमन जनार्दन टोपले यांनी सांगितले

यावेळी संस्थचे व्हा. चेअरमन श्री. दयानंद भुसारी, संचालक श्री. नारायण सावंत, श्री. मलिककुमार बुरुड, श्री. रविंद्र दामले, श्री. रामचंद्र पाटील, श्री. महेश नार्वेकर, श्री. सुधीर कुंभार, श्री. सुरेश कुंभार, श्री. संजय घंटे, श्री. राजेंद्र चंदनवाले, संचालिका सौ. प्रेमा सुतार, सौ. माधवी कारेकर, संस्थेचे जनरल मॅनेजर श्री. अर्जुन कुंभार, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

जनता गृहतारण संस्थेची १४० कोटी ची उलाढाल…

माणस उभी करणारी म्हणून नावारुपाला आलेली संस्था

स्वतःच घरकुल असाव हे प्रत्येक माणसाचं स्वप्नं असतं. ते प्रत्यक्षात साकारण्यासाठी जनता सह. गृहतारण संस्था वामपणे सभासदांच्या पाठिशी उभी आहे. सभासद, कर्जदार व ठेवीदारांशी विश्वासाथ नातं आहे. म्हणूनच संस्थेने आर्थिक वर्षात १४० कोटींचा व्यवसाय केला असल्याची माहिती चेअरमन श्री. मारुती मोरे यांनी दिली.

चालु आर्थिक वर्षात संस्थेकडे ६१ कोटी ७४ लाख ९२ हजार १११ रुपयांच्या ठेवी आहेत. तसेच ३५ कोटी २४ लाख ७३ हजार २४६ रुपयांची कर्जे वाटप केली आहेत. संस्थेने २६ कोटी ६८ लाख ४८ हजार ०८७ रुपयांची गुंतवणूक केली असून संस्थेला २१ लाख ४५ हजार ३७२ रुपये इतका निव्वळ नफा झाला असल्याची माहिती श्री. मोरे यांनी दिली. गडहिंग्लज व कोल्हापूर या ठिकाणी स्वमालकीच्या इमारतीत संस्थेची कार्यालये आहेत. ही संस्थेची जमेची बाजू असून संस्थेच्या सर्व शाखांमधील व्यवहार हे संगणीकृत आहेत. कार्यक्षम व घरपोच सेवा देणारी संस्था म्हणून ओळख असलेल्या या संस्थेच्या आजरा, गडहिंग्लज, गारगोटी, कोल्हापूर व इचलकरंजी येथे शाखा आहेत. लवकरच संस्थेच्या शाखा सातारा, कराड व सांगली येथे नवीन शाखा सुरु केल्या जात आहेत. घर किंवा फ्लॅट खरेदी, घरबांधणी, वाढीव बांधकाम व सोनेतारण कर्ज या सारख्या विविध गोष्टीसाठी संस्था कर्ज पुरवठा करत आहे.

या कामी मुख्य कार्यालय व्हा. चेअरमन श्री. गणपतराव आरळगुंडकर, संचाळक प्रा. डॉ. अशोक बाचूळकर, प्रा. डॉ. अशोक सादळे, प्रा. विनायक चव्हाण, प्रा. बळवंत कडवाले, प्रा. मनोज देसाई, अॅड. सुभाष डोंगरे, प्रा. डॉ. तानाजी कावळे, डॉ. अंजनी देशपांडे प्रा. सौ. लता शेटे, प्रा. नेहा पेडणेकर शाखांचे चेअरमन्, संचालक मंडळ, मैनेजर श्री. मधुकर खबरे, प्रशासन अधिकारी श्री. मारुती कुंभार, शाखाधिकारी व कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सोळा लाखावर किंमतीचे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात… आजरा पोलिसांची कारवाई… आजरा उपनगराध्यक्ष निवड उद्या… कै.रेडेकर संस्था समूहातर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

रविवार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!