mrityunjaymahanews
कोल्हापूरगुन्हाठळक बातम्या

सोळा लाखावर किंमतीचे गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात… आजरा पोलिसांची कारवाई… आजरा उपनगराध्यक्ष निवड उद्या… कै.रेडेकर संस्था समूहातर्फे मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

 

१६ लाखांवर किमतीच्या पानमसाल्यासह गुटखा जप्त : आजरा पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र शासनाचा प्रतिबंध असताना तंबाखूजन्य व नशीले पदार्थ जवळ बाळगणे, वाहतूक करणे असा गुन्हा केल्याप्रकरणी पोलिसांनी बांदा येथील शीतल जनार्दन पाटील या ४८ वर्षीय व्यक्तीला वेळवट्टी फाट्यानजीक विविध कंपनीचा गुटखा, पान मसाला अशा सुमारे सोळा लाख ३४ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा नोंद केला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पोलीस खब-यांनी पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार पाटील हा विमल पान मसाला, केशरयुक्त गोवा गुटखा, तंबाखूची पाकिटे असा मुद्देमाल मालवाहतूक गाडीतून घेऊन गोव्याच्या दिशेने चालला होता. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारुगडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सापळा रचून वाहतूक करत असलेली चार चाकी अशोक लेलँड कंपनीची गाडी आजरा- आंबोली मार्गावर वेळवट्टी फाट्यानजीक अडवून झडती घेतली असता त्यामध्ये सदर मुद्देमाल आढळून आला. याबाबतची फिर्याद पांडुरंग गोविंद गुरव यांनी पोलिसात दिली असून पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे करीत आहेत.

आजरा नगरपंचायतिची उपनगराध्यक्ष निवड उद्या..सौ.संजीवनी सावंत दावेदार

आजरा नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अनिरुद्ध उर्फ बाळ केसरकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर सदर रिक्त पदाची निवड उद्या होणार असून आजरा ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच व विद्यमान नगरसेविका सौ. संजीवनी संजयभाऊ सावंत यांची या पदावर निवड निश्चित मानली जाते. उद्या अधिकृतरित्या यावर शिक्कामोर्तब केले जाईल. सत्ताधारी आघाडीच्या पूर्व नियोजनानुसार केसरकर यांनी आपल्या पदाची मुदत पूर्ण होताच राजीनामा सादर केला.

कै केदारी रेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त मोफत नेत्र शस्त्रक्रिया शिबीर

कै.केदारी रेडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय गडहिंग्लज यांच्यावतीने आजरा,गडहिंग्लज,चंदगड भागातील निराधार ५० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.तरी गरजू व निराधार रुणांची नोंदणी रुग्णालयाचे सल्लागार मंडळ यांच्याकडे करावी.
नोंदणीसाठी संबंधीत रुग्णांनी अजित बंदी( भडगाव),सुधीर पाटील (कानोली),विजय पवार (मोरेवाडी),विजय बंदी (भडगाव),भाऊसो किल्लेदार (सरंबळवाडी)दयानंद भोईटे( दिंडेवाडी)
प्रविण देसाई (हिरलगे),कृष्णा पाटील (होनेवाडी)यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन कै.केदारी रेडेकर संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनिरुद्ध केदारी रेडेकर यांनी केले आहे.

 

संबंधित पोस्ट

पोलिसांना मारहाण पडली महागात: तिघांविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद.

mrityunjay mahanews

सर्फनाला प्रकल्पाचे काम प्रकल्पग्रस्तानी बंद पाडले…. आजऱ्यात विविध संघटनांच्या वतीने विजयी रॅली

mrityunjay mahanews

अंतिम टप्प्यात जिल्हा बँकेकरिता आजऱ्यात धुमशान… कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेल्फेअर असोसिएशनचा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार ज्योतिप्रसाद सावंत यांना

mrityunjay mahanews

रेंदाळ येथील पर्यटकांकडून आज- यात गोळीबार…?

mrityunjay mahanews

आजऱ्यातील गणेश बनणार करोडपती???…चाळोबावाडी येथील वर्ग खोल्यांचा प्रश्न ऐरणीवर … खाजगी व्यक्तीने वर्गखोलीचा ताबा घेतल्याने विद्यार्थी वाऱ्यावर…

mrityunjay mahanews

आजरा येथील वाहनचालकाचा पाटणे फाट्यानजीक ट्रक पलटी होऊन मृत्यू … वाघराळी येथील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू यासह अन्य पोलीस वृत्त

mrityunjay mahanews
error: Content is protected !!