मंगळवार
दि.२१ ऑक्टोबर २०२६

ना वेळेवर उमेदवारी…ना प्रचाराला वेळ…
त्यातच दगाबाजीचा फटका ?
अशोक अण्णांच्या पराभवाला जबाबदार कोण…?

….आजरा : ज्योतिप्रसाद सावंत
उमेदवारीसाठी प्रचंड प्रयत्न करूनही शेवटपर्यंत उत्कंठा वाढवत अखेरच्या क्षणी जाहीर करण्यात आलेली उमेदवारी, यामुळे प्रचार यंत्रणेवर आलेल्या मर्यादा, महायुती अंतर्गत पक्षांमधील मतभेद या सर्वाचा फटका अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी यांना बसल्याने गोकुळच्या निवडणुकीत त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. पक्षीय राजकारणाचाही त्यांना फटका बसला.
चराटी यांना आठ दिवस आधीच उमेदवारी जाहीर झाली असती तर निश्चितच आज त्यांचा विजयी उमेदवारांमध्ये समावेश झाला असता. पुरेशी प्रचार यंत्रणा असतानाही केवळ उमेदवारीला झालेला विलंब कांही ठराव धारकापर्यंत न पोहोचण्याचे कारण बनले.
चराटी यांना २४१९ इतके मतदान झाले. विजया करीता त्यांना २५७३ इतक्या मतांची गरज होती म्हणजे केवळ १५४ मतांनी त्यांचा पराभव झाला. आजरा तालुक्यात त्यांना १६९ मते मिळाली. म्हणजेच तालुक्यात अपेक्षेपेक्षा १३६ मध्ये कमी मिळाली. तालुक्यातील उमेदवार म्हणून त्यांना सर्व पक्षीय ठराव धारक मतदान करतील अशी अपेक्षा होती परंतु तसे कांही घडलेले दिसत नाही. इतर तालुक्यातील ठराव धारकांनीही आपापल्या तालुक्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अंतर्गत कुरबुरी आहेत हे सर्वश्रुत आहे. आगामी जिल्हा बँक निवडणुकीचेही पडसाद या निवडणुकीत पाहायला मिळाले. जिल्हा पातळीवर महायुतीच्या सर्वपक्षीय नेत्यांकडून केला जाणारा २५ – ० अशा विजयाचा दावाही अनेक उमेदवारांना प्रचार यंत्रणेचे गांभीर्य कमी करण्यास कारणीभूत ठरला. मंत्री, आमदार, खासदार , गोकुळचे माजी पदाधिकारी अशी मोठी मंडळी पॅनल मध्ये असल्याने स्थानिक पातळीवर विजयात काही अडचण नाही असा संदेश देण्यास व तो संदेश कार्यकर्त्यांना सुस्त बनवण्यास कारणीभूत ठरला. सर्वच नेते विजयाचा गुलाल उधळण्याची भाषा करू लागले. अगदी फेर मोजणी पर्यंत मतमोजणी प्रक्रिया येईल याची कुणाला पुसटशीही कल्पना नव्हती. गाफीलपणा नडला. कागदावरची आकडेमोड कागदावरच राहिली. आणि इकडे चराटी यांनाही पराभव तर पत्करावा लागलाच पण वरिष्ठ पातळीवर महायुतीला सत्ताही गमवावी लागली.
जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार होणार…
गोकुळच्या निकालाचे पडसाद जिल्हा बँक निवडणुकीत निश्चितच उमटणार असून जिल्हा बँकेची निवडणूक रंगतदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे.
नाविद मुश्रीफ यांचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी…
मंत्री मुश्रीफ यांचे चिरंजीव व विद्यमान अध्यक्ष नावीद मुश्रीफ यांचा पराभव राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. या पराभवाचा वचपा भविष्यात कसा काढायचा याचेही नियोजन आता सुरू झाले आहे. म्हणजे भविष्यात पुन्हा….?

मलिग्रेत शाही दसऱ्याचा अभूतपूर्व पालखी सोहळा

आजरा : प्रतिनिधी
मलिग येथे शाही दसरा उत्साहात पार पडला. दसऱ्याचा अभूतपूर्व पालखी सोहळा पाहण्यासाठी प्रचंड जनसमुदाय मोठ्या भक्तिभावाने सामिल होतो.
साधारण दोनशे वर्षांपूर्वी पासून या शाही दसऱ्याची परंपरा लाभली असून,मलिग्रेचे ग्रामदैवत रवळनाथ आणी चाळोबा हे प्रमुख रखवालदार आहेत. नऊ दिवस मंदिरांत बसलेल्या नवरात्र कऱ्याच्या मदतीसाठी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. रोज सकाळ संध्याकाळी गावच्या मंदिरांना भेटी देण्यासाठी प्रभात फेरी काढण्यात आली.
सध्या नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. याठिकाणी आरती फिरविण्याच्या कार्यक्रमासाठी सर्व हकिमदार उपस्थित राहून गावातून मिरवणूक काढली गेली.
दसऱ्याच्या दिवशी शाही थाटात पालखी शिमोलंघन करण्यासाठी गावच्या पश्चिमेला असलेल्या चाळोबा डोंगराकडे प्रयाण झाले .हा सोहळा पाहण्यासाठी अबाल वृध्द व माहेर वासींनी मोठ्या भक्तिभावाने सामिल झाल्या होत्या.
डोंगरात सिमोल्घंन झाल्यानंतर पुजा करून सोने लुटण्यासाठी स्पर्धा लागते पालखीत पहिल्यांदा सोने टाकणाऱ्याना मानाचा फेटा बांधण्यात आला.

आजचे पंचांग
दिनांक : २१ ऑक्टोबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : दशमी तिथी (दुपारी ०२.११ पर्यंत) त्यानंतर एकादशी तिथी
नक्षत्र : धनिष्ठा नक्षत्र (सायंकाळी ०७.४७ पर्यंत) त्यानंतर शततारका नक्षत्र
योग : गण्ड योग (२२ ऑक्टोबर रात्री १२.३२ पर्यंत) त्यानंतर वृद्धि योग
करण : गराजा करण (दुपारी ०२.११ पर्यंत) त्यानंतर वाणीजा करण
चंद्र राशी : मकर राशी (सकाळी ०६.५९ पर्यंत) त्यानंतर कुंभ राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.२३ ते दुपारी ०१.५० पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३६
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१०
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

दुष्काळ दारात, अन पाणी आभाळात !

एकीकडे तालुक्यात दुष्काळी परिस्थिती असताना आजरा शहरात मुख्य जलवाहिनी फुटून हजारो लिटर पाणी असे आभाळात उधळत असल्याचा प्रकार गेल्या कित्येक महिन्यांपासून सुरू आहे. नगरपंचायतीच्या पाणीपुरवठा विभागाला याचे गांभीर्य कळणार तरी कधी…?
