रविवार
दि.१८ ऑक्टोबर २०२६


समान काम, समान वेतनासाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचे आंदोलन

आजरा : प्रतिनिधी
समान काम, समान वेतनाच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या नेतृत्वाखाली न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आंदोलन तीव्र केले आहे. शुक्रवार आणि शनिवार, १६ व १७ ऑक्टोबर रोजी राज्यातील न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदवला.
महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना उच्च न्यायालयीन कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन आणि सेवा लाभ मिळावेत, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. मुंबई उच्च न्यायालयाने वेतनवाढीचा प्रस्ताव मंजूर करून जानेवारी २०२५ मध्ये शासनाकडे पाठविला आहे. मात्र, शासनाकडून निर्णय घेण्यास विलंब होत असल्याने राज्यातील सुमारे ३४ हजार ५०० न्यायालयीन कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
आंदोलनात सहायक अधीक्षक रवींद्र आर. घायतडक, वरिष्ठ लिपिक भारत पी. सारंग आणि प्रवीण ए. येणचवंडकर, लघुलेखक योगिता एस. चव्हाण, कनिष्ठ लिपिक शुभांगी एस. स्वामी, चेतन प्र. गवळी, बसणगोंड के. कतगार, हर्षद ए. कुमठेकर, मदन एस. करपे, परवेज ए. इनामदार आणि मोहन जी. बुरुड यांच्यासह विविध संवर्गांतील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
तसेच प्रमुख बेलिफ धनंजय एस. पाटील, बेलिफ विनायक व्ही. माजगांवकर आणि प्रकाश बी. गोंधळी, अर्धवेळ सफाईगार एन. एन. दोरगुडे, शिपाई विनायक व्ही. पाटील, आर. एस. भारमल आणि बी. के. वाडकर यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनीही काळ्या फिती लावून निषेध नोंदविला.
समान काम, समान वेतनाच्या मागणीवर शासनाने तातडीने निर्णय घेऊन वेतनातील तफावत दूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले.

बिबट्याच्या सलग दर्शनाने देवर्डे येथे पशुपालकात घबराट

देवर्डे : प्रतिनिधी
देवर्डे येथील निसर्गरम्य पायनस परिसरात बिबट्याच्या सलग दर्शनामुळे पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे. सर्व घटना सायंकाळी पाच नंतर घडल्या आहेत.
प्रथम बिबट्याने विष्णू डुकरे यांच्या म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी आरडाओरडा करून बिबट्याला हुसकावून लावले. त्यानंतर थोड्याच अंतरावर संजय मळेकर यांना बिबट्याचे दर्शन झाले.
त्यानंतर दिनकर गुंडू तानवडे हे बैलगाडी घेऊन येत असताना बिबट्याने बैलगाडीच्या पाठीमागे असलेल्या त्यांच्या कुत्र्यावर झडप घातली आणि कुत्र्याला घेऊन पायनसच्या दिशेने पलायन केले. सलग घडलेल्या या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आजरा शहर व परिसरात पावसाची हजेरी
आजरा : प्रतिनिधी
आजरा शहर व परिसरात बऱ्याच दिवसानंतर पावसाने हजेरी लावली. दिवसभर आभाळ भरून आले होते आणि दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली.
पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला. मात्र अनेक ठिकाणी सुरू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रमांवर पावसामुळे मर्यादा आल्या.
दरम्यान, या पावसामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पुढील काही दिवस असेच ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

‘ कृष्णा व्हॅली’ च्या ६४ खेळाडूंची जिल्हास्तरासाठी निवड

उत्तूर : प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व आजरा तालुका क्रीडा विभाग यांचे संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या शासकीय शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या. यामध्ये नवकृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनियर कॉलेज उत्तुर च्या तब्बल ६४ खेळाडूंची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. १४, १७ व १९ वर्षाखालील गटातून बुद्धिबळ, कराटे, भालाफेक, थाळीफेक, गोळा फेक, हातोडा फेक, धावणे, चालणे, लांब उडी, उंच उडी, कॅरम इत्यादी स्पर्धांमध्ये नव कृष्णा व्हॅली स्कूल व ज्युनिअर कॉलेज उत्तुर च्या खेळाडूंनी विशेष प्राविण्य प्राप्त करीत आजरा तालुक्यात वर्चस्व प्रस्थापित ठेवले.
याशिवाय १९ वर्षाखालील क्रिकेट व १४ वर्षाखालील फुटबॉल संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण लुंकड, सेक्रेटरी श्रीशैल मोतगी, क्रीडा प्रमुख विनायक जोशी, प्राचार्य रामकृष्ण मगदूम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सौ श्वेता सन्ने, विजय सावेकर यांचे मार्गदर्शनाखाली क्रीडाशिक्षक श्री विशाल वडवळे, कराटे प्रशिक्षक सुखदेव चव्हाण, बुद्धिबळ प्रशिक्षक शंकर सावंत यांनी विशेष परिश्रम घेतले. परिसरात सर्वत्र खेळाडूंचे कौतुक होत आहे.

व्यंकटराव प्राथमिक विद्यामंदिर आजरा येथे पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात संपन्न

आजरा : प्रतिनिधी
व्यंकटराव प्राथमिक मध्ये पोषण आहार सप्ताह मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आजरा महाल शिक्षण मंडळाच्या संचालिका सौ.अलकाताई शिंपी होत्या.
सकस व संतुलित आहारामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य कशा पद्धतीने सुधारते याची माहिती त्यांनी आपल्या भाषणात दिली.या कार्यक्रमात उत्फूर्त भाग घेतला होता वेगवेगळ्या पदार्थांचे मेजवानी अक्षरशः मुलांना आज भेटली.तसेच महिलांसाठी संगीत खुर्ची कार्यक्रम पार पाडला यामध्ये वर्षा संग्रामसिंह खापरे या पैठणीच्या मानकरी ठरल्या.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ.आर. एच. गजरकर यांनी केले तर व्यंकटराव हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षक सौ . पुंडपळ यांनी आपल्या भाषणात पोषक आहार आणि पालेभाज्यांचे महत्व पटवून सांगितले.संस्थेच्या संचालिका, व आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.अलका शिंपी यांनी पोषण आहाराविषयी सर्वांना मार्गदर्शन केले.
यावेळी रोशनी रमेश गावडे, डॉ. वेरोनिका माने, सौ.सोनाली शिंपी, .सौ.वंदना गोजारे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला आजरा नगरपंचायत उपनगराध्यक्षा पुजा डोंगरे,पंचायत समिती उपसभापती यशोदा पोवार,
, व्यंकटराव हायस्कूल ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य एस एन पाटील ,पर्यवेक्षिका सौ. व्हि.जे.शेलार , व्यंकटराव प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री.आर. व्ही. देसाई,उपस्थित होते सूत्रसंचालन.सौ.एल.पी.कुंभार यांनी केले तर आभार सौ.एन.सी. हरेर यांनी मानले

शासकीय जिल्हास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये आजरा महाविद्यालयाचे यश

आजरा : प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे झालेल्या शासकीय जिल्हास्तर मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये आजरा महाविद्यालयातील ज्युनिअर विभागातील खेळाडूंनी ४x१०० व ४x४०० रिले स्पर्धेमध्ये मुलींच्या संघाने अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविला यामध्ये प्रांजली पाटील,स्नेहल इलगे, विजयालक्ष्मी पाटील, गायत्री पाटील, आर्या जाधव, भक्ती सुतार, नंदिनी शिवनगेकर व श्रुती गुरव या खेळाडूंचा समावेश होता.
तसेच मुलांच्या ४x१०० मीटर रिले संघाने तृतीय क्रमांक मिळवला यामध्ये सिद्धेश कांबळे, मोहम्मद जुनेद मुल्ला, महंमद सिद्दिकी महागोंडे,आयान शेख, व हुजेफा दरवाजकर, या खेळाडूंचा समावेश होता. या सर्व खेळाडूना जनता शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोकअण्णा चराटी, उपाध्यक्ष श्री. विलास नाईक सर्व संचालक मंडळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. जी. पोतदार, उपप्राचार्य प्रा. डी.पी. संकपाळ, पर्यवेक्षक प्रा. एम. एस. पाटील, कार्यालयीन अधीक्षक श्री. वाय. आय. पाटील, यांचे प्रोत्साहन लाभले तर क्रीडाशिक्षक प्रा. ए. एस. फर्नांडिस व डॉ. डी. जे. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

दुर्गा माता दर्शन
क्रांतिकारी तरुण मंडळ चाफे गल्ली आजरा

रवळनाथ मंदिर नवरात्र उत्सव कमिटी आजरा

लायन्स किंग नवरात्र उत्सव कमिटी आजरा

शारदीय नवरात्र उत्सव धर्मवीर संभाजीनगर पेरणोली


आजचे पंचांग
दिनांक : १८ ऑक्टोबर २०२६
वार : रविवार
माह (अमावस्यांत) : आश्विन
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : सप्तमी तिथी (सकाळी ०८.२७ पर्यंत) त्यानंतर अष्टमी तिथी
नक्षत्र : पूर्वाषाढा नक्षत्र (दुपारी १२.४८ पर्यंत) त्यानंतर उत्तराषाढा नक्षत्र
योग : सुकर्मा योग (रात्री ११.५५ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : वाणीजा करण (सकाळी ०८.२७ पर्यंत) त्यानंतर विस्ती भद्रा करण
चंद्र राशी : धनु राशी (रात्री ०७.३२ पर्यंत) त्यानंतर मकर राशी
सूर्य राशी : तूळ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सायंकाळी ०४.४५ ते सायंकाळी ०६.१२ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०० ते दुपारी १२.४७
सूर्योदय : सकाळी ०६.३५
सूर्यास्त : सायंकाळी ०६.१३
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

