बुधवार
दि.७ ऑक्टोबर २०२६


पेरणोली येथे जुन्या वादातून तरुणाला काठीने मारहाण
आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील पेरणोली येथील शिवाजीनगर वझरे फाटा येथे जुन्या भांडणाच्या रागातून हरपवडे येथील विठ्ठल कोंडीबा झोरे या सतरा वर्षीय युवकाला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विठ्ठल हा हरपवडे येथील धनगरवाडा येथील रहिवासी असून संशयित विलास अर्जुन जाधव हा तरुण पेरणोली गावचा आहे. दोन महिन्यांपूर्वी फिर्यादी यांची जनावरे आरोपी यांच्या शेतातील गवतात गेली होती, त्याचा राग मनात धरून आरोपीने फिर्यादी हे शिवाजीनगर फाट्यावर थांबले असताना जवळ येऊन काहीही न विचारता काठीने हातावर आणि मानेवर मारहाण केली. या मारहाणीत विठ्ठल जखमी झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी विठ्ठल झोरे यांने दिलेल्या फिर्यादीवरून आजरा पोलीस ठाण्यातज्ञ विलास जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास हवालदार पांडुरंग येलकर करत आहेत.
दुष्काळ…
२,६३२ हेक्टर जमीन… ८६३७ शेतकऱ्यांना फटका

आजरा : प्रतिनिधी
आजरा तालुक्यातील ९९ गावामधे दुष्काळी पंचनामे सुरु झाले आहेत. आज अखेर झालेल्या पहाणीत २ हजार ६३२ हेक्टर क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसला आहे. ८६३७ इतकी बाधीत शेतकऱ्यांची संख्या आहे. आणखीन दोन दिवस पंचनामे होणार असल्याचे प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले.
तालुक्यात २१०० हजार हेक्टर इतके खरीपाचे क्षेत्र आहे. भात, नागली, ऊस, सोयाबीन, भुईमुग ही प्रमुख पिक घेतली जातात. सर्वात जास्त ९८०० हेक्टर क्षेत्रावर भाताचे पिक घेतले जाते. ऊसाचे पिक ७००० हेक्टर इतके आहे. यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा निमा पाऊस झाला आहे. दोन हजार मिलीमीटर सरासरी इतका पाऊस पडतो. एक हजार मिलीमिटर पर्यंत कसातरी पाऊस पोहचला आहे. जून महीना कोरडा गेल्यावर ज्लै व आगस्टमधे पाऊस पडला. आगस्टमधे पिक परिस्थिती चांगली होती. पण सप्टेबर महीना कोरडा गेल्याने तालुक्यात दुष्काळी परिस्थिती तयार झाली आहे. शासनाने आजरा हा दुष्काळी तालूका म्हणून घोषीत केला. माळरानावर पाणी नसल्याने पिके उन्हामुळे करपून गेली आहेत. जमिन कोरडी ठणठणीत पडली असून जमिनीला भेगाही पडल्या आहेत. याचा परिणाम पिक वाढीवर झाल्याने उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. भाताबरोबर नागली, सोयाबीन, भुईमूग पिकांना फटका बसला आहे. शेतकऱ्यांना यंदा चांगलेच आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. गेले सहा सात दिवसापासून गावोगावी पिकांचे पंचनामे सुरु आहेत. आज अखेर २६३२ हे क्षेत्राला दुष्काळाचा फटका बसला असून ८६३७ इतकी बाधीत शेतकऱ्यांची संख्या आहे. पंचनामे करण्यासाठी दोन दिवस वाढविल्यामुळे क्षेत्र व शेतकऱ्यांची संख्या वाढू शकते.

सप्टेंबर पासूनच बंधाऱ्यांमध्ये पाणी अडवण्यास सुरुवात

आजरा : प्रतिनिधी
दरवर्षी नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोल्हापुरी बंधाऱ्यात पाणी अडवण्यासाठी पाटबंधारे विभागाची लगबग सुरु असे. हिरण्यकेशी, आंबेओहोळ, चित्रीसह तार ओ हळमधील एकूण ३५ बंधाऱ्यात पाणी साठा केला जातो यंदा मात्र आजरा तालुक्यात दीड महीना आधीच बंधाऱ्यात पाणी अडवले जात आहे. पाणी टंचाईचे संकट समोर दिसत असल्याने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच कोल्हापुरी बंधाऱ्यात बरगे टाकून पाणी अडवले जात आहे. ३५० दश लक्ष घनफूट पाणीसाठा केला जाणार आहे.
आजरा तालुक्यात पाऊसमान अधिक आहे. सरासरी सुमारे २००० मिलीमीटर म्हणजे ८० इंच पाऊस पडतो. पावसाचे चार महीने जरी असले तरी आक्टोंबर पर्यंत पाऊस असतो. त्यामुळे नदी, आवेढे व नाले यांचे प्रवाह वहात असतात. सुगीच्या काळात देखील आढे व नाल्यांना पाणी असते. पण यंदा जूलै व ऑगस्ट महिन्यातील पावसाचे काही दिवस वगळता पाऊस झालेला नाही. सप्टेंबर महिना कोरडा गेला आहे. पिक करपली आहेत. दुष्काळाचे संकट समोर आहे. आढे व नाले कोरडे पडल्याचे दिसत आहेत. हिरण्यकेशी, चित्रा नदीच्या पात्रातील दगड दिसत आहेत. यापुढे पाऊस लागेल याचे कोणतंही चिन्ह दिसत नसल्याने पाटबंधारे विभागाने गत आठवड्यापासून बंधाऱ्यात पाणी अडवण्यास सुरवात केली आहे. हिरण्यकेशी, आंबेआ हळ, चित्रीसह तारओहोळमधील एकूण ३५ बंधारे आहेत. या बंधाऱ्यात सुमारे ३५० दसलक्ष घनफुट पाणीसाठा केला जाणार आहे. एनापुर व भादवण बंधाऱ्यामधे बरगे टाकून पूर्ण झाले आहेत. हाजगोळी बंधाऱ्यात बरगे टाकण्याचे काम सुरु आहे. दरवर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापासून पाणी अडवले जात होते. यंदा मात्र दीड महीना आदीच पाणीसाठा केला जात आहे.
दृष्टीक्षेपात बंधारे-
आंबेओहोळ – ७, उचंगी – १२, हिरण्यकेशी- १०,सर्फनाला- ३,धनगरमोळा- ३
यंदा तालुक्यात सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाला आहे. चित्री, सर्फनाला, उचंगी, आंबेओहोळ हे पाटबंधारे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असले तरी भविष्यात पाणी टंचाईचे संकट उद्भभवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी कमी पाणी लागणारी पिक घ्यावीत व पाण्याचा अपव्यय टाळावा…
…अजिंक्य आबिटकर (शाखाधिकारी, पाटबंधारे आजरा)
उन्हाळी, रब्बी पिकांसाठी नियोजन…
यंदाचा खरीप हंगाम जवळपास वाया गेला आहे. तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर आहे. भाताच्या पिक उत्पादनात पन्नास टक्क्याहून अधिक घट दिसत आहे. नागली, सोयाबीन, भुईमुगासह विविध पिकांच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. उन्हाळी पिके व रब्बी हंगामासाठी पाटबंधारे विभागाने पाण्याचे नियोजन आखले आहे.

आजऱ्यात गणराया ॲवार्ड स्पर्धत धामणेच्या फ्रेंडशीप मित्र मंडळाची बाजी

आजऱ्यात गणराया ॲवार्ड स्पर्धत धामणेच्या फ्रेंडशीप मित्र मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला.
शिवसेना प्रणित जयशिवराय सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लिंगायत गल्ली गणेशोत्सव मंडळ यांनी अनुक्रमे क्रमांक पटकावले. अवधूत तरुण मंडळ, उत्तूर यांना उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला.
येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमधे गणराया ॲवार्ड वितरण कार्यक्रम झाला. मान्यवरांच्या हस्ते डॉल्बी मुक्तीबाबत ६३ गांवाचा गाौरव करण्यात आला., नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, पंचायत समिती कृषी अधिकारी दिनेश शेटे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता कृष्णा कोळी प्रमुख उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब सरवदे म्हणाले, यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी शांततापूर्वक गणेशोत्सव साजरा केला. डॉल्बीला फाटा देवून प्रारंपारिक वाद्याचा वापर केला. त्याचप्रमाणे नवरात्रा त्सवही शांततापूर्वक साजरा करावा. सोशल मिडीयावर आक्षेपार्ह पोस्ट टाकून नये. प्रशासनाने दिलेल्या वेळेत मिरवणूक काढावी. विधायक व सामाजिक उपक्रम राबववून प्रशासनाला सहकार्य करावे.
नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई म्हणाले, आजरा शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा केला. याचा आदर्श ग्रामिण भागातील नवरात्रोत्सव मंडळीनी घ्यावा. गंगामाई वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, युनुस सय्यद, अमित गुरव, ॲड. सचिन इंजल यांनी परीक्षक म्हणून काम पाहीले. या वेळी पंचायत समितीच्या माजी सभापती सौ.अर्चना होलम,सौ. वर्षा बागडी, माधुरी पाचवडेकर, नगरसेवक अनिकेत चराटी, महेश पाटील, महेश कुरुणकर, सूर्यकांत केसरकर यांच्यासह सार्वजनिक मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
भादवण येथे दाखले वाटप व घरकुल लोकार्पण सोहळा संपन्न

मालवण : प्रतिनिधी
भादवण येथील पीएमश्री आदर्श विद्या मंदिर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना दिन बंधू मेहता समूह मुंबई यांच्या वतीने शालेय व क्रीडा साहित्य वाटप करण्यात आले. यासाठी आदर्श शिक्षक उत्तम कोकीतकर यांचे सहकार्य लाभले. तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले व प्रातिनिधिक स्वरूपात हिराबाई अर्जुना जोशिलकर यांच्या घरकुलाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भादवण गावच्या लोकनियुक्त सरपंच माधुरी रणजित गाडे होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा सुभाष सावंत, गटशिक्षण अधिकारी बसवराज गुरव, तालुका विस्तार अधिकारी बी. टी. कुंभार, ग्रामसेवक अल्बर्ट बार्देस्कर, धनाजी पाटील, केंद्र प्रमुख संजय भोसले, मुख्याध्यापक राजेंद्र खोराटे उपस्थित होते.
यावेळी विविध शाळेचे मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आजचे पंचांग
दिनांक : ७ ऑक्टोबर २०२६
वार : बुधवार
माह (अमावस्यांत) : भाद्रपद
माह (पूर्णिमांत) : आश्विन
ऋतु : शरद
आयन : दक्षिणायन
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : द्वादशी तिथी (रात्री ११.१६ पर्यंत) त्यानंतर त्रयोदशी तिथी
नक्षत्र : मघा नक्षत्र (रात्री ०९.३९ पर्यंत) त्यानंतर पूर्वा फाल्गुनी नक्षत्र
योग : शुभ योग (पहाटे ०२.५१ पर्यंत) त्यानंतर शुक्ल योग
करण : कौलव करण (सकाळी ११.५३ पर्यंत) त्यानंतर तैतुला करण
चंद्र राशी : सिंह राशी
सूर्य राशी : कन्या राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : दुपारी १२.२६ ते दुपारी ०१.५५ पर्यंत
सूर्योदय : सकाळी ०६.३२
सूर्यास्त : सायंकाळी ०६.२१
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत
