mrityunjaymahanews
अन्य

सोमवार – सातच्या बातम्या

सोमवार  १५

जून २०२६

चिमणे येथे विवाहितेची आत्महत्या


उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

आजरा तालुक्यातील चिमणे गावात विवाहित महिलेने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिमणे येथील कल्पना दिनेश चव्हाण (वय ४०) यांनी आपल्या राहत्या घराजवळील गोठ्यात गळफास घेऊन जीवन संपविले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर गर्भाशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतर त्या मानसिक तणावाखाली असल्याचे नातेवाईकांकडून सांगण्यात आले.

या प्रकरणी त्यांचे पती दिनेश गणपती चव्हाण यांनी उत्तूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला असून हेड कॉन्स्टेबल जमीर मकानदार अधिक तपास करीत आहेत.

घाटकरवाडी येथे हत्तीचा धुमाकूळ सुरूच

जयवंत डेळेकर यांची बैलगाडी केली पलटी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा तालुक्यामध्ये पश्चिम भागात डोंगरवाडी घाटकरवाडी परिसरात गेल्या पंधरा दिवसापासून सुरू असलेला हत्तीच्या उपद्रव सुरूच आहे.

डोंगराशेजारील शेतकरी वर्गाला त्याचा प्रचंड त्रास होत आहे. संभाजी शंकर पाटील यांचे ऊस, मका व इतर पिकाचे मोठे नुकसान हत्तीने केले आहे. याचबरोबर जयवंत डेळेकर, साईनाथ तांबेकर यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्याही शेती पिकाचे मोठे नुकसान केले आहे. डेळेकर यांची शेतात उभा केलेली बैलगाडी हत्तीने उलटवून टाकली.

हत्तीचा बंदोबस्त करण्याची मागणी आजही कायम आहे.

शेतीसाठी धरणातील पाणी नाही…

अल निनोच्या पार्श्वभूमीवर निर्णय 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

अल निनोच्या पार्श्वभूमीवर ३१ ऑगस्ट पर्यंत पिण्याच्या पाण्याच्या निश्चिततेसाठी तालुक्यातील विविध धरणांमधून शेतीच्या पाण्यासाठी/सिंचनासाठी आवर्तने तात्काळ बंद करण्यात आली आहेत. यापुढे आवर्तने केवळ पिण्याच्या पाण्याची गरज भागवण्यासाठी केली जाणार आहेत.

सद्यस्थितीस तालुक्यातील प्रकल्पातील पाणीसाठा पुढील प्रमाणे आहे.

चित्री- २८%
आंबेओहोळ- ६१%
सर्फनाला- ५२ %
उचंगी- ३५%
खानापूर- १८%
धनगरवाडी- २०%
एरंडोल- ४१%

यावर्षी अल निनो मुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे शासनाने धरणातील पाणीसाठा फक्त पिण्यासाठी आरक्षित केला असून पावसाने वेळेत हजेरी न लावल्यास सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

मेडीकल असोसिएशन ऑफ आजरा तर्फे प्रणित मोरे व सेजल मोरे यांचा निषेध…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

प्रणित मोरे याच्या स्टँड अप कॉमेडी शो मध्ये मेडिकल कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेली विद्यार्थिनी सेजल पवार हिने अँनाटोमी लॅब मध्ये असलेल्या मृतदेहांच्या अवयवास अनुसरून अतिशय आक्षेपार्ह अशी विधाने केली . या विधानांचा मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा तीव्र निषेध करण्यात आला आहे .

मेडिकल कॉलेज च्या अँनाटोमी ( शरीर रचना शास्त्र ) विभागात मृतदेहांचे शरीर विच्छेदन करून विद्यार्थ्यांना शरीरशास्त्र आणि आरोग्यशास्त्राचे शिक्षण दिले जाते. ह्या पृथ्वीतलावर अनेक निष्णात डॉक्टर्स तयार व्हावेत ह्या सद्भावनेने अनेक व्यक्तींनी आपले देहदान केलेले असते त्यामुळे मेडिकल चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांना मानवी शरीराच्या सर्व अवयवांचा सखोल अभ्यास करता येतो . पण प्रणित मोरे याच्या कॉमेडी शो मध्ये डॉ. सेजल पवार हिने मृतदेहांच्या अवयवांबाबत आक्षेपार्ह विधाने केल्यामुळे भविष्यात देहदान करू इच्छित असलेल्या अनेक नागरिकांसमोर आपण देहदान करावे की करू नये असा प्रश्न पडू शकतो .

भारतात अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरी असले तरी शरीर रचनेच्या अभ्यासा करिता देहदानाच्या पवित्र मार्गाने मेडिकल कॉलेज मध्ये आलेल्या मृतदेहांबाबत अशी विडंबनात्मक विधाने करणे नक्कीच आक्षेपार्ह आहे असे स्पष्ट करत मेडिकल असोसिएशन ऑफ आजरा मार्फत प्रवीण मोरे आणि डॉ. सेजल पवार यांचा जाहीर निषेध केला .

दोन्ही व्यक्तींवर नियमांनुसार कायदेशीर कारवाई व्हावी जेणेकरून भविष्यात अशी विधाने कोणीही करणार नाहीत अशी मागणीही करण्यात आली आहे.

मलिग्रे येथे खरीप भुईमूग बियाणे वाटप कार्यक्रम संपन्न.

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

मलिग्रे ता. आजरा येथील मल्लिकार्जुन मंदिर मध्ये राष्ट्रीय खाद्यतेल अभियान – तेलबिया सन २०२६-२७ अंतर्गत खरीप भुईमूग बियाणे कार्यक्रम संपन्न झाला. तृप्ती पाटील यांनी स्वागत करून शासनाच्या योजनांची माहिती दिली.

सहाय्यक कृषी अधिकारी योगेश जगताप यांनी भुईमूग पिकाची लागवड तंत्रज्ञान याबाबत सविस्तर मार्गदर्शन करून शेतकर्याच्या शंकाचे निर्सन केले व मान्यवराचे हस्ते भुईमूग बियाणाचे वाटप करण्यात आले.

यावेळी पंचायत समिती सदस्य समिर पारदे, मंडल कृषी अधिकारी प्रमोद मोने, सतीष कुंभार, मल्लिकार्जुन वि. का. स. सेवा सोसायटी चेअरमन अशोक शिंदे. सरपंच शारदा गुरव, उपसरपंच चाळू केंगार, आनंदा बुगडे, वसंत पोवार, मारूती जाधव याच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

थोडक्यात  …

♦ देवदर्शन करून पंढरपूरकडे जाणारे पिकप वाहन रस्त्याशेजारी विहिरीत पडल्याने त्यातील आठ जणांचा बुडून मृत्यू झाला तर सहा जखमी झाले आहेत. म्हसवड- पंढरपूर महामार्गावर सिद्धनाथ चे दर्शन घेऊन परतत असताना तांदूळवाडी ता. माळशिरस येथे सदर अपघात घडला.

♦ महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रविवारी घेण्यात आलेल्या गट ब राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षेत १५ हजार ७३५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला तर ३२५० विद्यार्थी अनुपस्थितीत होते.

♦ आंबोली घाटामध्ये मुख्य धबधब्याचे ठिकाणी जाळी/ रेलिंग तोडून अचानकपणे दोन महाकाय दगड रस्त्यावर घेऊन पडले. यादरम्यान कोणतीही गाडी गेली नसल्याने सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही.

♦ चिमणे विषबाधा प्रकरणातील रुग्णांपैकी अध्यात ही १२ रुग्णांवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर रुग्णांना घरी पाठवण्यात येत आहे. सद्यस्थितीत परिस्थिती नियंत्रणात आहे.

छायावृत्त

जनता सहकारी गृहतारण संस्थेमार्फत डॉ. किरण पोतदार यांची प्रभारी प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा संस्थेचे अध्यक्ष मारुती मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी व्हाइस चेअरमन अशोक बाचुळकर
डॉ. तानाजी कावळे, डॉ. संजीवनी पाटील, प्रा. क्रांती शिवणे, प्रा. नेहा पेडणेकर, दिनकर पोटे, कृष्णा डेळेकर, मॅनेजर मधुकर खवरे, प्रशासकीय अधिकारी मारुती कुंभार, शाखाधिकारी अरविंद कुंभार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

आजचे पंचांग 

दिनांक : १५ जून २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : कृष्ण पक्ष
तिथी : अमावस्या (सकाळी 08:23 पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : मृगशीर्ष नक्षत्र (सायंकाळी ०७.०८पर्यंत) त्यानंतर आर्द्रा नक्षत्र
योग : शूल योग (सकाळी ०८.५५ पर्यंत) त्यानंतर गण्ड योग
करण : नागवा करण (सकाळी ०८.२३ पर्यंत) त्यानंतर किंस्तुघना करण
चंद्र राशी : वृषभ राशी (सकाळी ०८.४० पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : वृषभ राशी (दुपारी १२.५२ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४१ ते सकाळी ०९.२१ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१३ ते दुपारी ०१.०५
सूर्योदय : सकाळी ०६.०२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.१६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत : १९४८ शक संवत

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

एरंडोळ येथे महिलेची आत्महत्या…

mrityunjay mahanews

सुळे येथे महिलेचा संशयास्पद मृत्यू…?

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

Ajr

error: Content is protected !!