mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

सोमवार १८ मे  २०२६

आजरा परिसरात पावसाची हजेरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा शहरासह तालुक्यात ठीक- ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली.

सायंकाळी सात वाजता सुरू झालेला पाऊस रात्री उशिरापर्यंत सुरूच होता. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. बळीराजा खरिपाच्या तयारीला लागला आहे.

काल रविवारी अनेक ठिकाणी विवाह सोहळ्यांचे स्वागत समारंभ, देवपण, जत्रा यात्रांची शिल्लक जेवणे आयोजित केलेल्या मंडळींची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. 

हाजगोळी बंधाऱ्याच्या डागडूजीचे काम सुरू


आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

हिरण्यकेशी नदीवरील महत्त्वाचा बंधारा समजल्या जाणाऱ्या हाजगोळी बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने या मार्गावरील वहातूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

बंधाऱ्यावरील स्लॅब उखडल्याने सदर बंधारा धोकादायक बनला होता. हाजगोळी,पेद्रेवाडी, कोवाडे निंगुडगे या मार्गावरील वाहतूक बंधाऱ्यावरून होते. पावसात बऱ्याच वेळा बंधारा धोकादायक बनल्याने वाहतूक बंद ठेवावी लागते. या पार्श्वभूमीवर सदर बंधाऱ्याची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे.

वाहनधारकातून याबाबत समाधान व्यक्त होत आहे.

खरिपाच्या तयारीत बळीराजा व्यस्त


आजरा : मृत्यूंजय महान्यूज वृत्तसेवा

पावसाळा तोंडावर आला आहे. यात्रा- जत्राबरोबर लग्नसराईत गुंतलेला शेतकरी खरीपाच्या तयारीला लागला नाहे. शेतकऱ्यांकडून जमीन तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. बियाण्याच्या दुकानातही गर्दी वाढली आहे. खरीपाची कृषी विभागाकडून जय्यत तयारी सूरू असून यंदा २१ हजार ९०० हेक्टरवर खरीप पिकांची लागवड होणार आहे.

एप्रिल महीन्यापासून खरीप हंगामची तयारी सुरु होते. गतवर्षी वळवाचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला.मे महीन्यात पावसाने दिलेली सलामी पावसाळ्या अखेर कायम राहीली. पावसामुळे शेतकऱ्यांना घात साधता आली नाही.

यामुळे खरीप हंगामाची पुरेशी तयारी शेतकरी करू शकला नाही. तालुक्यात लागवडी अभावी जमिन तशीच पड राहीली. यंदा
मात्र शेतकऱ्याला खरीपाची तयारी करण्यासाठी पावसाची तेवढी अडचण दिसत नाही. शेतकऱ्यांनी जमिन तयार करण्याची कामे सुरु केली आहेत. पूर्व भागातील शेतकरी, महीला जमिन नांगरणी, सड वेचणीची कामे करीत आहेत. यंदाचा खरीप हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी व कृषी विभाग धडपडत आहे. शेतकरी रोहिणीचा पेरा साधण्यासाठी. जमिन लवकर तयार करीत आहे. बियाण्यांच्या दूकानात शेतकरी बि-बियाणे खरेदीसाटी गर्दी केली आहे. संकरीत, सुधारीत, संशोधीत जातीची बियाणे खरेदी करीत आहेत. त्याचबरोबर घनसाळ, चंपाकळी, सोरटी या भाताच्या विविध देशी वाणांचीही लागवड यंदा मोठ्या प्रमाणात होणार आहे.

पिकनिहाय होणारी लागवड हेक्टर मध्ये

भात – ९ हजार ७००

नागली- ३ हजार

भुईमुग – १० हजार ४००

सोयाबीन- ७००

ज्वारी- २५

ऊस- ७ हजार

फ्रान्सिस कुतिन्हो यांचे निधन


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आजरा येथील फ्रान्सिस संतान कुतिन्हो ( वय वर्ष ६६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व दोन विवाहित मुली असा परिवार आहे. जिल्हा बँकेतून ते शाखाधिकारी म्हणून सेवानिवृत्त झाले होते.

आज शहरात 

♦ आज सोमवार दिनांक १८ मे रोजी प्रशासकीय इमारत तहसील कार्यालय आजरा येथे सकाळी ११ वाजता लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे .

 

♦ शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आजरा तहसीलवर मोर्चा काढण्यात येणार आहे.

परीसर…

शेती कामासाठी मजुरीला जाणाऱ्या सरिता तानाजी पाटील या चाळीस वर्षीय हरळी खुर्द/ गडहिंग्लज येथील महिलेला दुचाकीची धडक बसल्याने तिचा मृत्यू झाला.

आयपीएल न्यूज

काल रविवारी झालेल्या बंगळुरू विरुद्ध पंजाब सामन्यात बंगळुरूने पंजाबचा २३ धावांनी पराभव करत प्ले ऑफ मध्ये प्रवेश मिळवला आहे. ४० चेंडूत ७३ धावा काढणाऱ्या व्यंकटेश अय्यर याला सामनावीर घोषित करण्यात आले.

दरम्यान राजस्थानला दिल्लीकडून पराभवाला सामोरे जावे लागले असून दिल्लीने राजस्थानचा सात गाड्यांनी पराभव केला. चार बळी घेणारा गोलंदाज मिचेल स्टार्क सामनावीर ठरला.

आजचा सामना

चेन्नई विरुद्ध हैदराबाद

वेळ : सायंकाळी ७.३० वाजता

गुण तक्ता

बंगळुरू.   १८

गुजरात      १६

हैदराबाद.    १४

पंजाब          १३.   

राजस्थान.     १२

चेन्नई             १२

दिल्ली            १२

कोलकाता       ११

मुंबई.                ८

लखनौ               ८

आजचे पंचांग

दिनांक : १८ मे २०२६
वार : सोमवार
माह (अमावस्यांत) : अधिक ज्येष्ठ
माह (पूर्णिमांत) : अधिक ज्येष्ठ
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : द्वितीया (सायंकाळी ०५.५३ पर्यंत) त्यानंतर तृतीया तिथी
नक्षत्र : रोहिणी नक्षत्र (सकाळी ११.३१ पर्यंत) त्यानंतर मृगशीर्ष नक्षत्र
योग : सुकर्मा योग (रात्री 0?०९.४७ पर्यंत) त्यानंतर धृति योग
करण : बलवा करण (सकाळी ०७.४६ पर्यंत) त्यानंतर कौलव करण
चंद्र राशी : वृषभ राशी (रात्री १०.०४ पर्यंत) त्यानंतर मिथुन राशी
सूर्य राशी : वृषभ राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी ०७.४२ ते सकाळी ०९.२० पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.०९ ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.०४
सूर्यास्त : सायंकाळी ०७.०६
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातला बातमी… एक वाजता स्टॅन्ड चकाचक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

जयवंत येळेकर/कुंभार यांचे निधन…

mrityunjay mahanews

आजरा नगरपंचायतीला पाच वर्षे पूर्ण : विविध कार्यक्रमांचे आयोजन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!