गुरुवार दि. ११ डिसेंबर २०२५

हजारो भाविकांच्या उपस्थितीत सरोळीत पादुका दर्शन सोहळा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सरोळी ता.आजरा येथे नाणीज धामचे जगदगूरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी याच्या पादूका दर्शन सोहळा कार्यक्रम अंतर्गत पादूका आगमन मिरवणूका भक्तीमय वातावरणात पार पडल्या. त्यानंतर व्यासपीठावर पादूका स्थानापन्न करून गुरूपूजन सोहळा,उपासक दिक्षा, आरती, प्रवचन, व पादूका दर्शन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कोल्हापूर जिल्हातील दरवर्षी एका तालुक्यात पादूका दर्शन सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी आजरा तालुक्याला हा बहूमान मिळाला असून तालूका अध्यक्ष व सरोळीचे माजी सरपंच आकाराम देसाई याच्या सहकार्याने सरोळी येथे पाच हजार भक्ताच्या उपस्थिती प्रवचनाचा लाभ देण्यात आला. प. पू. कानिफनाथ महाराज यांनी कांँन्फरस द्वारे भक्ताशी संवाद साधताना भक्ती आणी सेवा याचा मिलाफ जिवनात सर्वांनी अंगीकार करावा असे आव्हान त्यांनी केले. यावेळी दूर्बल घटकांतील गरजू पंद्रा महिलांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. जिल्हा षरीषद माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपसभापती शिरीष देसाई, सुधीर देसाई,प्रा. अर्जून आबिटकर, जिल्हा अध्यक्ष कृष्णा माळी, मधूकर बाबर, अंजनाताई रेडेकर, सुनिता रेडेकर, आनंदराव कुलकर्णी, वर्षा बागडी, जनार्दन निऊंगरे, सुभाष गावडे, एम.के. देसाई, सुषमा पाटील,प्रज्ञा पाटील, अपर्णा पाटील, प्रणाली पाटील, दिलीप खरूडे, यांच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकभक्त उपस्थित होते.
आभार अमित लाड यांनी मानले.
गावागावातून शास्त्रज्ञ तयार व्हावेत : जयवंतराव शिंपी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
गावागावातून शास्त्रज्ञ व्हावेत हेच विज्ञान प्रदर्शनाचे उद्दिष्ट असून यासाठी पंचायत समिती व शिरसंगी गावातील ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचे प्रतिपादन आजरा महाल शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी फुरसुंगी येथे आयोजित तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी केले.
सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या स्वागत गीताने कार्यक्रमाचे सुरुवात करण्यात आली. प्रस्ताविकात मुख्याध्यापक संजयकुमार पाटील यांनी आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील कसबा सांगाव चे सुपुत्र अनुशास्त्रज्ञ डॉ शिवराम भोजे यांचे नाव आदर्श हायस्कूलच्या पटांगणाला दिले असल्याचे जाहीर केले . सूत्रसंचालन संतराम केसरकर यांनी केले.
यावेळी नुतन उपजिल्हा शिक्षणाधिकारी प्रदिप महादेव तुप्पट व भारतीय वायुदलात निवड झालेल्या ओमकार गणपती बुडके यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी मराठी विज्ञान परिषद गडहिंग्लजचे प्रा. डॉ. एस. के. नेर्ले यांनी विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर भारत याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. नेर्ले यांनी भारत हा बुवा बाजी अंधश्रद्धा यांच्यामुळे विकसित झाला नसून तो विज्ञान व तंत्रज्ञानामुळे विकसित होत चालला आहे. अजूनही गावोगावी मंदिरे मश्जिद चर्च उभारण्याकडे लोकांचा कल आहे पण गावातील शाळा ओस पडल्याचे खंतही प्रा. नेर्ले यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मुलांना पंढरपूर,तुळजापूरला न नेता नेहरू विज्ञान केंद्राला न्या. मुलांचे वैज्ञानिक बुद्धी वाढेल, असा सल्लाही दिला.या विज्ञान प्रदर्शनामध्ये आजरा तालुक्यातील प्राथमिक शाळा व आदर्श स्कूल शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये सौरऊर्जेवर चालणारी यंत्रे त्याचबरोबर प्रदूषण टाळण्यासाठीची उपकरणे विद्यार्थ्यांनी बनवली होती.
यावेळी आजरा कारखान्याची व्हा. चेअरमन सुभाषराव देसाई, माजी सभापती विष्णुपंत केसरकर, गटशिक्षणाधिकारी बसवराज गुरव, आजरा कारखाना संचालक दिगंबर देसाई, मधूकर येलगार, शिवाजी होडगे, दत्तात्रय येलगार , अमृत देसाई , अनिल देसाई , शिवाजी बोलके, युवराज देसाई, आनंदा गुरव, अनिल मुळिक, अशोक चौगुले, प्रकाश कानडे, निलेश सुतार यांच्यासह तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.
आभार मदन देसाई यांनी मानले.

श्रृंगारवाडी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
शृंगारवाडी,ता. आजरा येथे आमदार शिवाजीराव पाटील यांच्या विकास निधीमधून ₹ १० लाख मंजूर असलेल्या सामाजिक सभागृहाच्या कामाचा शुभारंभ अशोक अण्णा चराटी यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच जयवंतराव सुतार यांनी मंजूर करून आणलेल्या पाणंद रस्त्याच्या कामाची सुरुवात भाजप तालुका सुरुवात अनिकेत चराटी यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी जयवंतराव सुतार, संभाजीराव सरदेसाई, सी आर देसाई, उदय कुमार सरदेसाई, अमोल सुतार, संतोष चौगुले, सरपंच समीर देसाई,माजी सरपंच शामराव हरेर,दशरथ जोशिलकर, मारुती सावंत,बाळासाहेब पाटील,चंद्रू तारळेकर, सुरेश चौगले,माजी सरपंच नारायण सुतार,राजाराम चौगले, आंबुताई सुतार,विमल पाटील, जयश्री कळेकर,अंकुश तारळेकर,अमृत सुतार,इंजि.मंदार सुतार,राजेश देसाई,संभाजी देसाई,संजय कांबळे,शंकर सावंत,विनायक जोशिलकर . शिवाजी दळवी,महादेव पाटील, महादेव मांगले,अशोक हरेर, शंकर शिंत्रे, चंद्रकांत साईल,रामचंद्र सावंत,नारायण सावंत, महादेव चौगले, सचिन खवरे,पांडूरंग सावंत,बाळू चौगले,आनंदा दळवी,महादेव जाधव,कृष्णा येरम,सूरज सावंत,संतोष पाटील तानाजी इलगे, राजाराम जोशिलकर,दशरथ सावंत, नामदेव तारळेकर , बचाराम जोशिलकर,गोविंद गिलबिले, कंत्राटदार विनोद जाधव, उदय चव्हाण आदी ग्रामस्थ बंधु व भगिनी उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक- बळवंत शिंत्रे यांनी केले तर आभार – चाळू खवरे यांनी मानले.

आज-यात डॉ बाबा आढाव यांना अभिवादन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
जेष्ठ समाजसेवक, कष्टकरी, कामगार नेते,लेखक डॉ.बाबा आढाव यांना जनता बँकेच्या सभागृहात विविध सामाजिक संस्थांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, प्रा. डॉ नवनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी काँ. संपत देसाई यांनी बाबा आढाव अनेक चळवळीचे प्रेरणास्त्रोत असल्याचे सांगितले. यावेळी तानाजी देसाई,काँ.संजय तर्डेकर, काँ. शिवाजी गुरव,काँ.शांताराम पाटील,निवृत्ती कांबळे, दशरथ घुरे, रणजित कालेकर, प्रा.मिना शिरगुप्पे, जयवंतराव शिंपी, डॉ. नवनाथ शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी जोतीराम केसरकर, राजू होलम, पुष्पलता घोळसे, जोतिबा चाळके, विक्रम देसाई, रविंद्र भाटले, नारायण भडांगे आदी उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांच्या अखंडाने सांगता करण्यात आली.

निधन वार्ता
सुनिल सावंत

मलिग्रे ता. आजरा येथील सुनिल बाबू सावंत ( वय ४८ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले
त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ-बहीण, पत्नी, मुलगी, मुलगा असा मोठा परिवार आहे.
ते संतोष सावंत यांचे मोठे भाऊ होत.

आज तालुक्यात
दुपारी ठिक १: ०० वा “Welead” अंतर्गत कोकण विकास सोसायटी, पणजी व सामाजिक संवेदना संस्था, आजरा यांच्या संयुक्त विद्यमाने, “कुरकुंदेश्वर अकादमी” वेळवटी येथे आजरा तालुक्यातील युवा-युवतींसाठी पंचायतराज प्रशिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.



