mrityunjaymahanews
अन्यआजरा तालुका विशेषकोल्हापूरक्रीडाठळक बातम्याराजकीयरोजगारस्थानिक

प्रभाग १४ चा आश्वासक चेहरा : सिद्धेश नाईक

सामाजिक कार्याचा वसा व विकासाची दिशा असणारा सिद्धेश विलास नाईक…

आजरा नगरपंचातीला तरुण व कार्यक्षम उमेदवाराची असणारी गरज लक्षात घेऊन सिध्देश विलास नाईक प्रभाग १४ मधून ताराराणी आणि विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात आहेत.

सामाजिक कार्यक्षेत्रातील २४ × ७ उपलब्ध असणारे धडाडीचे युवक नेतृत्व म्हणून पुढे आलेला हा तरुण म्हणजे सिद्धेश नाईक. सिव्हिल इंजिनिअर असून देखील कामाबरोबरच समाजसेवा करण्यात तत्पर असणारा हा तरुण कोणाच्याही मदतीला धावून जाणारा हा तरुण…सिद्धेशने आपल्या या समाजसेवेतून समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

राजकारणाचे बाळकडू घरातच मिळाले असताना देखील राजकारण करण्यापेक्षा सिद्धेशने समाजकारण केले आहे म्हणूनच तो आज तरुणांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.धडाडीचे नेतृत्व म्हणून तरुण त्यांच्याकडे पहात आहे.

वडिल विलास नाईक यांचा हा चिरंजीव. अण्णाभाऊ संस्था समुहात सक्रिय असणाऱ्या विलास नाईक यांची ओळख करून देण्याची गरज नाही.आजरा अर्बन बॅंकेचे माजी चेअरमन, विद्यमान संचालक,जनता शिक्षण एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष,आजरा साखर कारखान्याचे माजी संचालक असणारे सर्व परिचित विलास नाईक.अण्णा भाऊंच्या बरोबर काम केलेले.आजही ते त्यांच्या तत्वांना जपत संस्था मोठ्या केल्या आहेत.अण्णा भाऊंच्या कडून राजकारणापेक्षा समाजकारण करण्याचे धडे घेतले आहे.त्यांच्या पावला वर पाऊल ठेवत सिद्धेशही समाजकारणाकडे वळला आहे.

सिद्धेश सामाजिक कार्य, प्रत्येक धार्मिक, सांस्कृतिक कार्यात नेहमीच पुढे असणारा कार्यकर्ता आहे. कोरोना काळात, अतिवृष्टी काळात जीवाची पर्वा न करता सामान्यांच्या मदतीला धावून गेलेला, कोणाच्याही निधनाची वार्ता मिळताच कोणतीही भिड भाड न बाळगता अंत्यविधी कार्यात सदैव अग्रेसर राहणारा कार्यकर्ता आहे.

तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांना सोबत राहून तालुक्यातील विकास कामांना गती आणण्यासाठी मंत्र्यांच्या दरबारी सतत फेऱ्या मारण्यात अग्रेसर असणारा व महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा निकटवर्तीय म्हणूनही ओळख आहे.

प्रभाग १४ मधून निवडणुकीला सामोरे जात असताना प्रभागातील समस्या व त्यावरील उपाय योजना याचा सखोल अभ्यास करून निवडणुकीला सामोरे जात असून निवडून आल्यानंतर मतदारांची कदापिही निराशा होऊ देणार नाही असा विश्वास यांनी व्यक्त केला आहे.

 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या …

mrityunjay mahanews

प्रतिभाताई कांबळे यांचे निधन

mrityunjay mahanews

चंद्रकांत सांबरेकर यांचे अपघाती निधन

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा येथील अण्णाभाऊ सहकारी सूतगिरणीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

mrityunjay mahanews
error: Content is protected !!