
रशीद पठाण म्हणजे ‘ स्वच्छ कारभाराचा ब्रँड ‘

राजकारणात एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व व स्वच्छ कारभाराचा ब्रँड म्हणून रशिद पठाण ओळखले जातात .आहे. सर्वधर्मीयांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची हातोटी निश्चितच वाखाणण्याजोगी आहे.
१९९४ पासून समाजकारण ते राजकारणात हा त्यांचा प्रवास कौतुकास्पद राहिला आहे. आजरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य व आजरा साखर कारखान्याचे संचालक आहेत. त्यांच्या पत्नी पंचायत समिती सदस्या होत्या यावरुनच त्यांची ओळख होईल.
राजकारणापेक्षा समाजकारण करणे हेच त्यांचे ध्येय आहे.राजकारणातून अनेक वरीष्ठ नेत्यांची, अधिकाऱ्यांची ओळख आहे.याचा उपयोग करुन घेत अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. ग्रामपंचायती मध्ये त्यांनी आपला अनुभव पणाला लावत प्रभागाबरोरच विकास कामे केली.त्यांचा सल्ला प्रशासनाला उपयोगी पडत असे. त्यांच्या पत्नी आजरा पंचायत समितीच्या सदस्या होत्या या माध्यमातून त्यांनी आपल्या आजरा मतदार संघातील प्रत्येक गावाची, वैयक्तिक कामे करुन दिली. यामध्ये रशिद पठाण यांचे मोठे योगदान होते.

समाजकार्य करणे ही त्यांची आवड आहे. अनेक गरजूंना त्यांनी मदत केली आहे. रात्री अपरात्री मदतीसाठी त्यांचे दार उघडले असते. प्रसंगी एखाद्या रुग्णाला स्वतःच्या गाडीतून नेवून उपचार करुन देणे हे नेहमी त्यांचे सुरु असते. शासनाच्या अनेक वैयक्तिक योजना त्यांनी गरजूंना मिळवून दिल्या आहेत.यामध्ये पेन्शन, रेशनकार्ड यासारख्या कामांचा समावेश आहे. रोज त्यांच्या घरी लोकांची रेलचेल असते. प्रत्येकाचे समाधान करताना दिसतात. शासकीय काम असेल तर योग्य सल्ला देत प्रसंगी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करुन आलेल्याला न्याय मिळवून देतात.
तालुक्यातील राजकारणात नेहमी सक्रिय असतात. त्यांच्या अभ्यासूपणामुळे अनेकजण त्यांचा सल्ला घेत असतात. यामुळे आजरा साखर कारखान्यासारख्या शिखर संस्थेवर त्यांची वर्णी लागली आहे. नगरपंचायतीच्या नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे. मागील निवडणुकीतही ते होते.पद नसतानाही त्यांनी गरजूंची कामे करुन दिली आहेत.अनेक समस्या या प्रभागातील लोकांच्या सत्ता नसताना सोडविल्या आहेत.प्रभागातील प्रत्येक बाबींचा त्यांना अभ्यास आहे प्रभागातील समस्या सोडवण्यासाठी ते पुन्हा रिंगणात उतरले आहेत.प्रभागातील रस्ते,गटारी याशिवाय सर्व मुलभूत सुविधा ते नक्की मिळवून देतील याची खात्री मतदारांना असल्याने त्यांना प्रभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे.ते निश्चितच विजयी होतील याबद्दल खात्री आहे.अशा काम करणाऱ्या व्यक्तीला नगरपंचायत मध्ये नगरसेवक म्हणून पाठवणे योग्यच आहे.त्यांच्या अनुभवाचा निश्चितच प्रगतीत हातभार लागेल.
आपल्या हक्काच्या माणसाला नगरसेवक म्हणून नगरपंचायतीमध्ये पाठवणे आपले कर्तव्य आहे.




