सोमवार १६ जून २०२५




दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा साखर कारखान्याचे कर्मचारी सुहास शंकर बुगडे वय ५२ वर्षे यांचा शिरसंगी – यमेकोंड दरम्यान रामलिंग देवस्थान नजीक अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने मृत्यू झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोळींद्रे ता.आजरा या मूळ गावाहून ते आजरा साखर कारखान्याकडे दुचाकीवरून चालले असताना अज्ञात वाहनाची त्यांच्या दुचाकीला धडक बसली. यामध्ये ते रस्त्यावर फेकले जाऊन गंभीर जखमी झाले व त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते.
बुगडे हे आजरा साखर कारखान्यातील इंजिनिअरिंग/टर्बाइन विभागात कर्मचारी होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई व वडील असा परिवार आहे. पोलीस पुढील माहिती घेत आहेत.





