बुधवार दि.१९ फेब्रुवारी २०२५



मडीलगे येथून तरुणी बेपत्ता

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मडिलगे तालुका आजरा येथून १९ वर्षीय महाविद्यालयीन तरुणी १७ फेब्रुवारी पासून बेपत्ता आहे.
१७ फेब्रुवारी रोजी दुपारी राहत्या घरातून निघून गेली ती अद्याप परतली नसल्याची वर्दी संबंधित मुलींच्या पालकांनी आजरा पोलिसात दिली आहे.
पोलीस नाईक पांडुरंग येलकर पुढील तपास करीत आहेत.


तालुक्यातील दोघांचा आकस्मिक मृत्यू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
तालुक्यातील होनेवाडी व कोवाडे येथील दोघांचा आकस्मिक मृत्यू झाला आहे . होनेवाडी तालुका आजरा येथील रवींद्र धोंडीबा पाटील (वय ४९ वर्षे ) यांचा मंगळवारी दुपारी आकस्मिक मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, वडील असा परिवार आहे.

तर कोवाडे येथील महादेव आप्पा जकाते या ६६ वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, मुलगी, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे.
जकाते यांच्या मृत्यूची नोंद आजरा पोलिसात झाली आहे.


बेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एका विरोधात गुन्हा नोंद

उत्तूर : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर ता. आजरा येथील मिलिंद नगर येथे बेकायदेशीररित्या देशी दारू विक्री करण्याच्या उद्देशाने दारू जवळ बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी परशुराम तुकाराम कांबळे यांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
त्यांच्याजवळून देशी दारूच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या आहेत. याबाबतची फिर्याद दीपक मल्लाप्पा मन्यागोळ यांनी पोलिसात दिली असून पोलीस हवालदार बाजीराव कांबळे पुढील तपास करीत आहेत.


शहरात नगरपंचायतीचे डिजिटल माहिती फलक अखेर झळकले...

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरांमध्ये गेल्या कित्येक दिवसापासून नगरपंचायतीच्या वतीने ठिकठिकाणी लावले गेलेले डिजिटल माहिती फलक अखेर सुरू करण्यात आले आहेत.
या डिजिटल फलकामुळे नगरपंचायतीशी संबंधित उपक्रम,सूचना, आवाहन आदींची माहिती शहरवासीयांना मिळण्यास सोपे जाणार आहे.
मोक्याच्या ठिकाणी लावलेले हे डिजिटल फलक सुरू करण्यात आल्याने शहरवासियातून समाधान व्यक्त होत आहे.

इन्स्पायर कॅम्प २०२५ साठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे आजरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
संत राऊळ महाराज कॉलेज, कुडाळ व विद्यानिकेतन कॉन्व्हेंट स्कूल कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने अकरावी विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी डी एस टी डॅश इन्स्पायर कॅम्प संत राहुल कॉलेज कुडाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील दोनशे विद्यार्थी सहभागी झाले होते या शिबिरात आजरा महाविद्यालयातील कुमारी राखी राजीव नवार कुमारी आहाना फिरोज मुराद कुमारी भक्ती पराग परुळेकर यांची निवड झाली होती
सदर इन्स्पायर कॅम्पमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मधील कुमारी राखी नवार हिने या शिबिरात घेण्यात आलेल्या देशभरातील आघाडीच्या संस्था मधील नामवंत शास्त्रज्ञ शिक्षण तज्ञ संशोधक यांची संवादात्मक सत्रे, तसेच विविध विषयावर चर्चा व प्रश्नमंजुषा यांचे आयोजन करण्यात आले होते असे सांगितले.
कुमारी फिरोज मुराद हीने सदर शिबिरात हँडसम ऍक्टिव्हिटी व प्रयोगामध्ये तसेच व्यवहारिक अनुभव व वैज्ञानिक संकल्पनांची सखोल माहिती दिली .या शिबिरात वैज्ञानिक क्षेत्रातील तज्ञांशी विद्यार्थी यांचा संवाद घडवून आणण्यात आला विद्यार्थ्यांना अनेक संशोधन क्षेत्रे आणि सर्वोच्च भारतीय वैज्ञानिक संस्थांमध्ये उपलब्ध संशोधन सुविधांबद्दल माहिती देण्यात आली त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना झाला असे मनोगतातून सांगितले
कु. भक्ती पराग परुळेकर हिने मनोगत व्यक्त करताना इन्स्पायर कॅम्प मध्ये आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ भटनागर पुरस्कार विजेते राष्ट्रीय तसेच केंद्रीय राज्य विद्यापीठे यासारख्या आंतरराष्ट्रीय संस्था मधील १५ तज्ञांचे त्यांच्या वैज्ञानिक अनुभवासह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळाले असल्याचे स्पष्ट केले.
आजरा महाविद्यालयातून सदर कॅम्प साठी कु. राखी राजू नवार कु. आहाना फिरोज मुराद कु. भक्ती परुळेकर निवड झालेल्या विद्यार्थिनींनी इन्स्पायर कॅम्प मध्ये घेतलेल्या प्रशिक्षण व अनुभव महाविद्यालयातील विज्ञान शाखेत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रयोगाद्वारे सादरीकरण केले.सदर कार्यक्रमाचे आयोजन ज्युनिअर विज्ञान विभाग व विज्ञान आणि पर्यावरण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. श्रद्धा कुलकर्णी यांनी, स्वागत प्रा. मल्लिकार्जुन शिंत्रे यांनी तर आभार प्रा. शुभांगी सावंत यांनी मानले. सूत्रसंचालन सागर फगरे यांनी केले.
सदर कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए एन सादळे प्रमुख उपस्थिती म्हणून उपप्राचार्य प्रा. दिलीप संकपाळ कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, प्रा रागिणी राजमाने , प्रा. ज्योती कुंभार तसेच विज्ञान विभागाचे विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


देवर्डे शाळेत आनंददायी शनिवार साजरा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
देवर्डे (ता. आजरा) येथील विद्यामंदिरामध्ये आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. येथे फूड स्टॉल मांडले होते.
मुख्याध्यापक विनायक आमनगी, प्रभारी मुख्याध्यापक श्री. घुरे यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या उपक्रमातून मुलांना खरेदी विक्रीचा आनंद मिळाला. विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ बनवले होते. फूड स्टॉल मध्ये पाणीपुरी भेळ, मठ्ठा, आप्पे, सरबत अंडा पाव, समोसे, कलिंगड, भडंग, मोमोज, पराठे, वडापाव भाजीपाव इत्यादी पदार्थ तयार केले होते.
सरोजिनी कुंभार, रेश्मा बोलके, महादेव तेजम, सुनील पाटील, श्रीकांत पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
देवर्डे हायस्कूलचे मुख्याध्यापक सुभाष सावंत चंद्रकांत घुरे, राजेंद्र पाटील, देवेंद्र शिखरे, महेश नावलगी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थित होते

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

निधन वार्ता
बाळ मराठे

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
महाजन गल्ली, आजरा येथील श्रीपाद पुरुषोत्तम उर्फ बाळ मराठे (वय ९० वर्षे) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले.
आजरा येथील पहिले इलेक्ट्रिक/ लाईटचे दुकान मराठे यांनी उघडले होते.त्यांनी मिरज येथील वैद्यकीय महाविद्यालयास देहदान केले.
त्यांच्या पश्चात दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भारतीय विमा निगमचे अधिकारी प्रदिप अभ्यंकर यांचे ते सासरे होत.

आज शहरात…
हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणाऱ्या हजरत दावल मलिकसो यांच्या उरुसानिमित्त
संदल व गंधरात्र मिरवणूक…


