mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

रविवार दि.२ फेब्रुवारी २०२५

शहरासह तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     आजरा शहरासह तालुक्यामध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून तालुकावासियांना चांगलेच जेरीस आणले आहे. शुक्रवारी रात्री एकता कॉलनी व शहरात तीन ते चार ठिकाणी बंद घरे फोडण्यात आली. तर शनिवारी रात्री मसोली येथील शिवाजी आप्पा गुरव , संभाजी गुरव व तानाजी चंद्रु पोवार यांच्या घरांची कुलपे तोडून चोरट्यांनी फोडली आहेत. तानाजी यांच्या आई शेजारील घरात असल्याने त्यांना चोरट्यांची चाहूल लागल्यानंतर त्यांनी प्रसंगावधान राखत धाडसाने घातलेल्या गोंधळामुळे इतर ठिकाणच्या घरफोडी रोखण्यात यश आले.

    गुरव  व  पोवार कुटुंबीय हे कामानिमित्त बाहेरगावी गेल्याने नेमके काय चोरीला गेले याबाबतच्या तपशील मिळू शकला नाही. तालुकाभर चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. बंद घरे टार्गेट करून मिळेल ते पदरात पाडून घेण्याचे उद्योग चोरट्यांकडून सुरू आहेत.

     गेले वर्षभर अशा चोऱ्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे पोलीस दलावरही चोरट्यांवर नियंत्रण ठेवताना मर्यादा येत आहेत.

दोन अपघात… दोघे जखमी

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा – गारगोटी मार्गावर पांगिरे गावा नजिक झालेल्या अपघातात ग्रामसेवक सम्राट लक्ष्मण देसाई (रा.पेरणोली ता.आजरा) हे जखमी झाले आहेत. तर आजरा – गडहिंग्लज मार्गावर खेडे – सोहाळे दरम्यान अज्ञात वाहनाच्या धडकेत संभाजी तुकाराम खाडे ( रा.होन्याळी ता.आजरा) यांना गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी दोघांनाही गडहिंग्लज येथील शासकीय व खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे.

महिलांची सुगम गायन स्पर्धा उत्साहात

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर आजरा तर्फे कै. उर्मिला श्रीपाद मायदेव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ महिलांची सुगम गायन स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेची सुरवात कै. उर्मिला मायदेव यांच्या प्रतीमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. सौ. विनया मायदेव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.

      वाचनालयाचे अध्यक्ष श्री. वामन सामंत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. उपाध्यक्षा सौ. विद्या हरेर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

      महिलांच्या सुगम गायन स्पर्धेत कु. सुकन्या संजय शेणवी (विटे) यांनी प्रथम क्रमांक मिळविला, सौ. निता चेतन हरेर (कासार कांडगाव) यांनी व्दितीय तर सौ. कृष्णा देवेंद्र पाचवडेकर (आजरा) यांनी तृतीय क्रमांक मिळवीला विजेत्यांना सौ. विनया मायदेव, वामन सामंत व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन गौरविण्यात आले. सुगम गायन स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून सौ रूपा कडवाले व सौ. श्रध्दा वाटवे यांनी तर संगीत संयोजन डॉ. कृष्णा होरांबळे, सुरेंद्र हिरेमठ व दत्ता सावंत यांनी केले.

      यावेळी वाचनालयाचे कार्यवाह कुंडलिक नावलकर, सहकार्यवाह रविंद्र हुक्केरी, संचालक बंडोपंत चव्हाण, सुभाष विभुते, महंमदअली मुजावर, डॉ. अंजनी देशपांडे, ज्योत्स्ना चराटी, अस्मिता जाधव, अनिता नाईक, डॉ गौरी भोसले, पूनम आजगेकर, विणा जोशी, सुरेखा भालेराव, शर्मिला सातोसकर, ग्रंथपाल चंद्रकांत कोंडुसकर,  संदीप देसाई, निखिल कळेकर, बी. एम. कामत, यांसह संगीतप्रेमी नागरिक उपस्थित होते. संचालिका गिता पोतदार यांनी सुत्रसंचालन केले तर सौ. सुचेता गड्डी यांनी आभार मानले.

व्यंकटराव हायस्कूलचे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत यश


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       डिसेंबर – २०२४ मध्ये कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व विज्ञान विषय समितीमार्फत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रज्ञाशोध परीक्षेत व्यंकटराव हायस्कूल, आजरा शाळेच्या विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादन केले आहे.

प्रज्ञापात्र,प्रशस्तीपत्रधारक विद्यार्थी – प्रणव भगवान पाटील

                 उत्तीर्ण विद्यार्थी –
शलाका ओमकार गिरी,प्रेम रमेश येसणे ,
भूषण दिग्विजय पाटील,यश बाळकृष्ण नातळेकर , श्लोक काडय्या हिरेमठ ,जुवेरिया समीर शेख,अनुष्का अजित हरेर ,अंशुमन हिम्मत भोसले, शार्दुल गजानन आरेकर,आर्या उदय हेब्बाळकर, माधवी जीवन आजगेकर, ऋतुजा दयानंद गिलबिले,संभाजी पांडुरंग पाटील,अवधूत अमित सावंत

      वरील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशांत गुरव व सौ.व्ही.ए.वडवळेकर यांचे मार्गदर्शन लाभले.

साईट : दत्त मंदिर समोर सोमवार पेठ आजरा संपर्क : ९५२७९७३९६९

मलिग्रे येथे कुष्ठरोग जनजागृती अभियान सुरू


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मलीग्रे हायस्कूल, मलीग्रे येथे कुष्ठरोग जनजागृती अभियानांतर्गत ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी पर्यंत करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांचे नियोजन व समाजामध्ये कुष्ठ रोगाविषयी जनजागृती करून हा कार्यक्रम शाळेपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांनी घरापर्यंत कसा पोहोचवावा , याविषयी माहिती देण्यात आली.

      प्रत्येक विद्यार्थ्यांकडून कुष्ठरोगाविषयीची शपथ प्रत्येक दिवशी १३ तारखेपर्यंत प्रार्थनेच्या वेळी घेण्यात यावी अशा सूचना करत तसेच कुष्ठ रुग्णांची सेवा हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अपूर्ण राहिलेले स्वप्न याविषयी माहिती प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. के. के. काझी यांनी दिली.

      १३ फेब्रुवारी पर्यंत रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, कुष्ठरोग जनजागृती विषयी नाटिका व इतर कार्यक्रम घेण्यात यावेत अक्षय देखील मलीग्रे अंतर्गत आठ उपकेंद्रांना सुचवण्यात आलेले आहे.

      संशयित रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रास तपासणीसाठी पाठवावे असे आवाहन डॉ. के. के.काझी यांनी केले. आरोग्य सहाय्यक जे. एस.बोकडे कोणते कार्य कार्यक्रम घ्यायचे याविषयी मार्गदर्शन केले.

      मिलिंद सावंत यांनी आभार मानले.

 

संबंधित पोस्ट

आजरा नगरपंचायतीची बदनामी थांबवा… अमरीन मुल्लाचे यश… शृंगारवाडी ग्रामपंचायतीची पुरस्कारासाठी तपासणी

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!