mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

मावा विक्रेत्याविरोधात गुन्हा नोंद

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     सुरक्षिततेबाबत कोणताही वैधानिक इशारा न लिहीता माव्याची राजरोजपणे विक्री करणाऱ्या अकीब काकतीकर या पानपट्टी चालकाविरोधात आजरा पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

      या पानपट्टीमध्ये सुगंधी सुपारी सह विविध पदार्थ घालून मावा तयार केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीनुसार पोलिसांनी माव्याच्या पुड्यांसह अकीब याला रंगेहात ताब्यात घेऊन त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

     याबाबतची फिर्याद समीर संभाजी कांबळे यांनी आजरा पोलिसात दिली आहे.

हंगामामध्ये खाजगी ट्रॅव्हल्स चालकांना हंगामात ५० टक्के भाडेवाडीस हिरवा कंदील 

           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      आजरा ते मुंबई पुणे वाहतूक करणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स चे दर सणासुदीच्या काळामध्ये अनियंत्रित पद्धतीने वाढवले जातात, या विषयाच्या अनुषंगाने आजऱ्यामध्ये बैठक आयोजित करण्यात आलेली होती. यावेळी नायब तहसीलदार, परिवहन महामंडळाचे अधिकारी, पोलीस अधिकारी, ट्रॅव्हल्स मालक आणि बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. बैठकीमध्ये हंगामा वेळी पन्नास टक्के इतकीच भाडे वाढ करावी यावर एक मत झाले.

      या बैठकीमध्ये बहुजन मुक्ती पार्टीचे कार्यकर्ते व आजरा येथील जागृत नागरिकांनी त्यांची बाजू मांडली. त्यानंतर ट्रॅव्हल्स मालकांनीही त्यांची बाजू मांडली.
दोन्ही बाजूंनी सकारात्मक चर्चा झाली.
काही वर्षांपूर्वी विषयासंबंधी कोर्टामध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. यावेळी एक सरकारी कमिटी बनवून त्यावर दर नियंत्रणाचे काही निकष लावण्यात आले‌ होते. शासन निर्णयानुसार ट्रॅव्हल्स धारकांना अगदीच सीजन ला एस टी बस भाड्याच्या जास्तीत जास्त ५०% वाढ करण्याची मुभा दिलेली आहे.

      असे असले तरीही सध्या सणासुदींच्या काळामध्ये ट्रॅव्हल्स धारक जितक्या प्रमाणावर दरवाढ करतात तितकी दरवाढ सरकारी नियमानुसार निश्चितच होऊ शकत नाही. यापेक्षा जास्त जर ट्रॅव्हल्स मालक भाडे आकारणी करायला लागले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचीही तरतूद त्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली आहे असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

      त्यावेळेस मालकांनी याबाबत १८ तारखेपुर्वी चर्चा करून निर्णय घेऊ असे आश्वासन दिले.

आवंडी वसाहत मध्ये दुर्गामाता दौड उत्साहात

          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       आवंडी वसाहत मध्ये प्रथमच नवरात्र मध्ये दुर्गामाता दौड उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.

     कृष्णा बांदेकर, किरण निकम, दिनेश कालेकर, सुशांत बांदेकर, अभि चौगुले, रघुनाथ ठिकार, विलास अस्वले, चंद्रकांत निकम, हरी चौगुले, तातोब दारुटे , मुले व महिला मंडळी यांनी सहभाग दर्शविला.महिलांसाठी दररोज नवराञ नऊ दिवस नऊ पैठणीचा संगीत कार्यक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

       सुभाष निकम ( युवा उद्योजक) यांचे या कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभत आहे.

आजऱ्यात कुंकूमार्चन सोहळा


           आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

खंडोबा तालीम मंडळ आजरा आयोजित
आणि श्री रवळनाथ नवरात्र उत्सव मंडळ यांच्या वतीने कुंकुमार्चन सोहळा संपन्न झाला.
सदर सोहळ्याला सुमारे २०० महिला उपस्थिती होत्या.

     महादेव भीमराव कबीर आणि त्यांच्या सुविध्य पत्नी सौ. मनीषा महादेव कबीर यांच्या हस्ते पूजेला सुरुवात करण्यात आली.

      कुंकुमार्चन पूजेसाठी मुंबई चा लालबाग राजा गणपतीचे मानाचे श्रीफळ देण्यात आले. कुंकुमार्चन पूजा झाल्या नंतर महाआरती झाली

      सदर कार्यक्रमास मंडळाचे अध्यक्ष संतोष परीट, सदस्य महांतेश गुंजाटी, श्रीधन कुलकर्णी, नागराज रायकर, शेखर शेट्टी, अभिषेक रोडगी,भूषण गुंजाटी, शिवकुमार गुंजाटी, ऋषिकेश महाळंक, निलेश निप्पाणी, अवधूत माळगी, आकाश देसाई, रवी गुरव, ओमकार तेरणी, मृत्युंजय स्वामी, विशाल बांदेकर, अभिजित मतवाडकर, नितीन बाबर, शुभम खतकर, मनोज दोरुगडे, कार्यकर्ते उपस्थित होते.

‘माझी शाळा’मध्ये हाळोली शाळा तिसरी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा 

       मुख्यमंत्री-माझी शाळा सुंदर शाळा अभियानामध्ये गणेश विद्यामंदिर हाळोली शाळेने तालुकास्तरावर तिसरा क्रमांक पटकावला आहे. या शाळेला एक लाखाचे बक्षीस मिळाले आहे.

      कला, क्रीडा, संस्कृती, स्पर्धा परीक्षा, डिजिटल स्मार्ट क्लास रूम, साहित्य, ग्रंथालय चळवळ, एक तास वाचनाचा, मोबाईल प्रतिबंधक प्रतिज्ञा, संगीतमय पाढे, कृतियुक्त शिक्षण, शिक्षण सप्ताह, वृक्षसंवर्धन, जंगल भ्रमंती, हाळोली टॅलेंट सर्च परीक्षा, मॉर्निंग वॉक उपक्रम, इको क्लब, बिनभिंतीची शाळा, असे विविध उपक्रम आहेत.यामुळे शाळेला मुख्यमंत्री-माझी शाळामध्ये तिसरा क्रमांक मिळाल्याचे मुख्याध्यापक सुरेखा नाईक, शिक्षक डॉ. मारुती डेळेकर यांनी सांगितले.

    ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, तरुण मंडळे, विविध संस्थांकडून आर्थिक मदत व सहकार्य मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.

 दुर्गामाता दर्शन


                          (Advt.)

लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..

     तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…

       ✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
        ✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
        ✅ इतर अनेक सुविधा

                  🏡साईटचा पत्ता :

       समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा

                     ☎️ संपर्क –

            +91 9527 97 3969


 

 

संबंधित पोस्ट

झुलपेवाडी येथील एकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू …

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!