


नगरपंचायतीच्या कामांची एकत्रित निविदा नोटीस काढावी…
अन्याय निवारण समितीची मुख्याधिका-यांकडे मागणी

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील रस्ते, गटारी व इतर कामांसाठी शासनाकडून निधी प्राप्त झालेला आहे. या निधी मधून होणारी कामे ही महाराष्ट्र शासन नोंदणीकृत ठेकेदारामार्फत होणे अपेक्षित आहे. त्यासाठी कामाचे तुकडे न पाडता मंजूर अंदाजपत्रकाचे एकत्रितकरण करुन निविदा नोटीस काढावी अशी मागणी अन्याय निवारण समितीच्या वतीने निवेदनाद्वारे आजरा नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
पुर्वी झालेली कामे राजकीय लोकांचे दबावाखाली कामाचे तुकडे पाडून ज्याना त्या कामाचा अनुभव नाही अशांना दिल्याने कामे निकृष्ट दर्जाची झालेली आहेत. कामे अर्धवट सोडून नंतर करतो म्हणून सर्व रक्कम उचललेली आहे. या बाबत नगरपंचायतीकडे बर्याच तक्रारी आलेल्या आहेत. रस्ता अतिक्रमण लक्षातच न घेता संगनमताने गटारी चुकीच्या पद्धतीने बांधून बट्ट्याबोळ केलेला आहे.काम चालु असलेल्या ठिकाणी ठेकेदार अथवा त्यांच्या मुकादमाकडे रस्ता अथवा गटर याचा cross section असणे आवश्यक आहे.
वरील सर्व गोष्टींचा विचार करून कामे उत्कृष्ट कशी होतील या याकडे लक्ष द्यावे असेही या निवेदनात म्हटले आहे.यावेळी अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, पांडुरंग सावरतकर,गौरव देशपांडे,वाय. बी. चव्हाण, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, जावेद पठाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मनोहर बुगडे यांचे निधन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
मलिग्रे ग्रामसेवा मंडळ, सोहोराब चाळ, मुंबईचे सचिव व मौजे मलिग्रे/ खडकवाडी (बुगडे वसाहत) मधील मनोहर धोंडिबा बुगडे(वय ५५ वर्षे) यांचे काल शुक्रवारी मुंबई येथे आकस्मिक निधन झाले .
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,मुलगी, जावई असा परिवार आहे. अंत्यविधी आज दिनांक ५ रोजी सकाळी ठीक ८ वाजता मलिग्रे (बुगडे वसाहत) येथे करण्यात येणार आहेत.

माझी शाळा सुंदर शाळांमध्ये रायवाडा विद्यामंदिर द्वितीय

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानांतर्गत रायवाडा शाळेने आजरा तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. त्यानिमित्त शाळेने व ग्रामस्थानी आपले वेगळेपण जपत वृक्षारोपण केले.
शाळेचे शिक्षक प्रकाश बडे यांनी शैक्षणिक वर्षांमध्ये ‘स्मार्ट टू ग्लोबल स्कूल’ बनवण्याचा निर्धार व्यक्त केला.
ग्रामसेवक विशाल दुंडगेकर, सरपंच सौ. कल्पना डोंगरे व उपसरपंच आनंदा राणे यांनी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे संपूर्ण सहकार्य शाळेत राहील अशी ग्वाही दिली.
यावेळी नारायण राणे, अमृत कुरळे, संपदा राणे, रवींद्र कालेकर, विश्वास जाधव, राजू राणे, धनाजी डोंगरे, मुख्याध्यापक रावसाहेब पाटील उपस्थित होते.
वाहनाच्या धडकेने कोल्हयाचा मृत्यू….?

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा – गडहिंग्लज मार्गावर जिजाबाई आरोग्यधाम समोरील रस्त्याशेजारी गेले दोन दिवस कोल्हा मृतावस्थेत पडून आहे. एखाद्या वाहनाची धडक बसून सदर कोल्हा मृत पावल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

व्यंकटरावमध्ये दसऱ्यानिमित्त पारंपारिक वेशभूषा दिन उत्साहात

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर येथील शाही दसऱ्याचे औचित्य साधून दसरा महोत्सवानिमित्त महाराष्ट्रीयन संस्कृती दर्शविणारे पारंपारिक वेशभूषा परिधान करण्याचा कार्यक्रम व्यंकटराव प्रशालेमध्ये संपन्न झाला.
या ‘ट्रॅडिशनल डे’ चे औचित्य साधून आजरा तहसील कार्यालयातील तहसीलदार श्री.समीर माने ,नायब तहसीलदार श्री. म्हाळसाकांत देसाई, निवासी नायब तहसीलदार श्री.विकास कोलते व सर्व महसूल विभागातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग , दुय्यम निबंधक कार्यालयातील अधिकारी या कार्यक्रमासाठी पारंपारिक वेशभूषा परिधान करून व्यंकटराव प्रशालेत उपस्थित होते .
सर्व मान्यवरांचे स्वागत प्रशालेचे प्राचार्य श्री. आर. जी. कुंभार यांनी केले. प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता पाचवी ते दहावी या वर्गातील विद्यार्थी विद्यार्थी पारंपारिक वेशभूषा परिधान करून शाळेत हजर होते.
श्री. पी. एस. गुरव यांनी महाराष्ट्रीयन सण समारंभ हे खेड्यापासून ते शहरापर्यंत रुढी परंपरेनुसार कसे साजरे केले जातात त्याच बरोबर समारंभामध्ये आपण परिधान करणाऱ्या पेहराव्यालाही अनन्यसाधारण महत्त्व आहे असे सांगून कोल्हापुरातील शाही दसरा हा खरोखरच उल्लेखनीय असल्याचे स्पष्ट केले.
प्रास्ताविक श्री. पी. व्ही. पाटील यांनी केले. आभार श्री. व्ही.एच. गवारी यांनी मानले.

आवंडी वसाहत येथे नवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रम…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सालाबादप्रमाणे व परंपरागत गावदेवी आवंडी वसाहत येथे श्री. भावेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव साजरा होत आहे. या वर्षी थोड्या वेगळ्या यज्ञ पद्धतीने साजरी होत आहे. या वर्षी शिवजन्मोत्सव व श्री भावेश्वरी नवरात्र उत्सव आवंडी वसाहत यांच्या कडून प्रत्येक दिवशी खेळ पैठणीचा हा संगीत कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
प्रत्येक दिवशी विजेत्यांना पैठणी दिली जाते. खंडेनवमी दिवशी काकडा आरती व हळदीकुंकू कार्यक्रम व विजेत्यांना पैठणी वाटप करण्यात येणार आहे. यासाठी युवा उद्योजक श्री. सुभाष निकम ,युवा उद्योजक इनोव्हेटिव्ह फायनान्स सोल्युशन् मुंबई यांनी अर्थसाहाय्य केले आहे असे कमिटी मेंबर कृष्णा बांदेकर, किरण निकम, संतोष चौगुले, विलास अस्वले, रघुनाथ ठिकार इ. मान्यवरांनी सांगितले.

दुर्गामाता दर्शन




आजऱ्यात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा संचालित ‘मृत्युंजय’कार शिवाजी सावंत सांस्कृतिक मंचतर्फे आजरा तालुका मर्यादित शालेय वक्तृत्व स्पर्धांचे मंगळवार, दिनांक ८ ऑक्टोबर, २०२४ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
कै. लक्ष्मण धोंडिबा पाटील शालेय वक्तृत्व स्पर्धा (प्राथमिक गट)इयत्ता ५ वी ते ७ वी
विषय-१) हरवलेलं आजोळ
२) झाडे लावा झाडे जगवा
३) माझा आवडता संत
४) महाराष्ट्र माझा
५) ‘रिल्स’ च वेड
कै. रमेश वामन टोपले शालेय वक्तृत्व स्पर्धा (माध्यमिक गट)इयत्ता ८ वी ते १० वी
विषय-१) बदललेले ऋतुमान
२) गडकोट संवर्धन
३) थोर साहित्यिक शिवाजी सावंत
४) हरवत चाललेलं माणूसपण
५) सेंद्रिय शेती काळाची गरज
पारितोषिके- प्रथम क्रमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १५०१/- रू.व्दितीय कमांक: स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १२०१/- रू. तृतीय कमांक स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र व रोख १००/-रू.
स्पर्धेमध्ये भाग घेऊन इच्छिणाऱ्यांनी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिराचे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

फोटो क्लिक…


(Advt.)
लवकरच आपल्या सेवेत… आजच ॲडव्हान्स बुकिंग करा..
तुमच्या स्वप्नातील घर, तुमच्या बजेटमध्ये…”आपलं घर* ” शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सर्व सोयीनीयुक्त…
✅ शाळा, कॉलेज, बॅंका , स्टँड, हॉस्पिटल, होटेल्स, भाजी मार्केट, पेट्रोल पंप, मेन मार्केट फक्त 2 मिनिटांवर
✅ 1 आणि 2 BHK फ्लॅट्स
✅ इतर अनेक सुविधा
🏡साईटचा पत्ता :
समर्थ कृपा रेसिडेन्सी , भगवा रक्षक चौक, सोमवार पेठ, दत्त मंदिरा समोर, आजरा
☎️ संपर्क –
+91 9527 97 3969



