mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजरा भूमी अभिलेख अधिकाऱ्यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांनी घेतली झाडाझडती…

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     नागरिकांकडून येणाऱ्या आजरा भूमी अभिलेख कार्यालयातील अनेक तक्रारीबाबत भूमी अधिक्षिका विद्या तांगडे यांना जाब विचारत शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी चांगलेच धारेवर धरले.

     यावेळी तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी फेरफार नोंद करताना पुन्हा जाब जबाबदासाठी कार्यालयात पक्षकारांना कशासाठी बोलवले जाते ? यातून तुमच्या कार्यालयाकडून आर्थिक व्यवहार घडवून आणले जातात व पक्षकारांना नाहक त्रास देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले जातात असा आरोप केला.

      आजरा शहर प्रमुख विजय थोरवत यांनी आजरा येथील एका प्रकरणाचा हवाला देत जिल्हा भूमी अभिलेख कार्यालयातून पोटहिश्यासंदर्भात नोंदी घालण्याचे आदेश झाले असून सुद्धा केवळ अधिकाऱ्यांना नोंदीसाठी पैसे खायचे असल्याने पक्षकाराच्या नोंदी अवधी संपून गेला तरी घालण्यात आल्या नाहीत व पक्षकाराला नाहक त्रास दिला जात असल्याबाबत जाब विचारला.

     आजरा तालुका कृषी समिती अध्यक्ष इंद्रजीत देसाई यांनी देवर्डे ग्रामपंचायतने गावठाण नोंदी चुकीच्या झाल्या असून त्याबाबत तक्रार निरसन करण्यासाठी जानेवारी २०२४ ला आपल्या कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता त्याचे कोणतेच उत्तर तुम्ही ग्रामपंचायतीला लेखी दिले नाही. ग्रामपंचायतीला तुम्ही जर जुमानणार नसाल तर सर्वसामान्यांना काय न्याय देणार तसेच  पक्षकारांच्या मध्ये प्रत्येक वेळी वेगळी मोजणी होत असल्याने होणाऱ्या वादास तसेच त्यांचे होणारे अर्थिक नुकसानीस कोण जबाबदार ? असे प्रश्न विचारण्यात आले.

     यावेळी एकूणच भूमी अभिलेख कार्यालयातील भोंगळ कारभाराबाबत साळगाव सरपंच धनंजय पाटील, लाटगाव उपसरपंच रणजीत सरदेसाई,संतोष भाटले, सुनील दिवेकर,दयानंद नीऊनगरे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.सदर प्रश्नांची समाधानकारक उत्तर अधीक्षकांकडून न मिळाल्यामुळे या संदर्भात आमदार आबिटकरसो यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीची मागणी करणार असल्याचे पदाधिकाऱ्यानी सांगितले.

जुळ्या भावंडांकडून वाढदिवसानिमित्त शाळेस एल.सी.डी. प्रोजेक्टर प्रदान


          आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

      मागणी न करताही नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दात्याने आपल्या जुळ्या मुलांच्या वाढदिवसानिमित्त स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेस स्क्रीनसह एल.सी.डी. प्रोजेक्टर भेट दिला आणि शिक्षकांना सुखद धक्का दिला. वैशिष्ट्य म्हणजे या शाळेशी सदर कुटुंबाचा सुतराम संबंध नाही. आठव्या इयत्तेत शिकणारी ही भावंडे या शाळेत कधीही शिकलेली नाहीत.

      विद्यामंदिरमध्ये संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रथम शाळेतील महिला शिक्षकांनी दोघा भावंडाचे औक्षण केले. मुख्याध्यापक सुनील सुतार यांनी पुस्तके भेट देऊन वाढदिवसानिमित्त दोघांनाही शुभेच्छा दिल्या. वैदेही व अनंत या भावंडांनी आपल्या शुभ हस्ते एल.सी.डी. प्रोजेक्टर मुख्याध्यापक व शिक्षक यांच्याकडे सुपूर्द केला. सुनील सुतार यांनी आपल्या मनोगतातून या कुटुंबाचे आभार व्यक्त करून वाढदिवसानिमित्त शुभेच्छांसह अभीष्टचिंतन केले.

      प्रास्ताविक प्रेमा साठे यांनी केले, तर आभार विजयालक्ष्मी देसाई यांनी मानले.

      कार्यक्रमास उत्तम नातलेकर, संयोगिता सुतार, राजाराम गाडीवड्ड, संतोषी कुंभार या शिक्षकांसह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

आज-यात आज संविधान परिषद

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     मुस्लिम समाजाच्या न्याय हक्क व अधिकारासाठी तसेच भारतीय मुस्लिम समाजाबद्दल असलेले भ्रम व वास्तव यांची ठोसपणे मांडणी करून भारतीय राज्य घटनेत असलेले अल्पसंख्यांकांचे स्थान व मूलभूत अधिकार यांची सविस्तर चर्चा करण्यासाठी श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली आज दि. ३० जून रोजी सकाळी ११ ते ४ कालावधीत श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथील मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत सभागृहात ‘ संविधान सन्मान परिषद’ आयोजित केली आहे, अशी माहिती कॉ. संग्राम सावंत यांनी दिली.

    कार्यक्रमाचे उदघाट्न रियाजभाई शमनजी चेअरमन, शमनजी ग्रुप अँड इन्स्टिट्यूट, डॉ. नवनाथ शिंदे, बाळेश नाईक, अब्दुलवाहिद सोनेखान यांच्या हस्ते होणार आहे. इंजि. फारुख गवंडी , महेश परुळेकर , आशपाक मकानदार सामाजिक कार्यकर्ते, गडहिंग्लज हे मार्गदर्शन करणार आहेत असेही स्पष्ट करण्यात आले.

     यावेळी अमित खेडेकर, रशिद पठाण,आलम नाईकवाडे,समीर खेडेकर , अबूसईद माणगांवकर, मौजुद माणगांवकर, बबलू शेख, सलीम लतीफ, अ. करिम कांडगावकर, जुबेर चांद उपस्थित होते.

छायावृत्त…


      आजरा पोलीस ठाण्याच्या वतीने नवीन साई पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या नेतृत्वाखाली नवीन कायदे जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी रॅलीमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


 

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

आजरा तालुक्यातील आजच्या ठळक घडामोडी

mrityunjay mahanews

उत्तूर – मुमेवाडी जवळ विचित्र  अपघात एक जण जागीच ठार !२५जखमी…

mrityunjay mahanews

२३ वर्षीय तरुणाचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळला… आजरा तालुक्यातील घटना

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!