

व्हिक्टोरिया पुलाने घेतली विश्रांती…?
नवीन पुलाचा वापर सुरू

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
सुमारे १३८ वर्षांपूर्वी हिरण्यकेशी नदी काठावर बांधण्यात आलेल्या विक्टरिया पुलाला विश्रांती देण्याच्या हालचाली सुरू असून काल रविवारपासून चाचणी तत्वावर राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून बांधण्यात आलेल्या नव्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आल्याने आता विक्टोरिया ज्युबीली पूल कायमची विश्रांती घेण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट होत आहे.
राजर्षी शाहू महाराजांच्या कालावधीत सदर पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. तब्बल १०० वर्षे कोकणला जोडणाऱ्या या एकमेव पुलावरून वाहतूक सुरू होती. कालांतराने वाहतुकीचे पर्यायी मार्ग तयार झाल्यानंतर इतर मार्गानी वाहतूक सुरू झाली.
हहहहअलीकडे एक दोन वेळा अति पावसामुळे या पुलावरून काही कालावधीकरता वाहतूक बंद ठेवण्याची वेळ आली होती. मुळातच या ब्रिटिशकालीन पुलाचे आयुर्मान संपल्याने नवीन पुलाची मागणी होत होती. योगायोगाने राष्ट्रीय महामार्ग उभारणीच्या निमित्ताने गेल्या वर्षभरात नवीन पुलाची उभारणी या पुलाला पर्याय म्हणून करण्यात आली आहे. काल रविवारी या पुलाची चाचणी घेण्यात आली लवकरच कायमस्वरूपी वाहतूक या नवीन पुलावरून होण्याची शक्यता आहे.
जुन्या पुलाची जपणूक आवश्यक
आजरा तालुकावासीय व या पुलाचे भावनिक नाते आहे. या पुलावरून अनेकांनी अनेकदा पावसाळ्यात दुथडी भरून वाहणाऱ्या हिरण्यकेशी नदीचे सौंदर्य अनुभवले आहे.या पुलाची जपणूक करण्यात यावी अशी मागणी तालुकावासीय करीत आहेत.
देवर्डेच्या जत खेळियाने ‘आजरा ‘ शहरात होळीचे वेगळेपण

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा शहरासह तालूक्यात ‘जय जयता हरगडी रे जयजयता ‘या पारंपारीक देवर्डे ता आजरा येथील ग्रामस्थांनी आजरा शहरातील गल्ली बोळात सादर केलेल्या जत खेळियाने आजरा शहर सध्या दुमदुमत आहे.
यावर्षी होळीचा सण ऊत्साहात साजरा झाला. पारंपारीक पद्धतीने होळी पेटवण्यात आली होती. होळी सणानंतर आजरा शहरात जत खेळिया सादर करण्याची परंपरा आहे. ती परंपरा देवर्डे येथील ग्रामस्थांनी जोपासली आहे.
शेतकरी वर्गात ही परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. शेतकरी कुटुंबातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी ही सांस्कृतिक ठेवण जोपासली आहे.परंतु तरुण वर्गाने ही परंपरा जोपासण्याची गरज आहे.खेळीयाची कला सादर करण्यासाठी सध्या व्यासपीठ उपलब्ध आहे.परंतु कला सादर करणाऱ्यांची संख्या रोडावत आहे. त्यामुळे तरूणांनी ही कला अवगत करणे आवश्यक आहे.
देवर्डे, पारपोली, जेऊर,चितळे ,मसोली,भावेवाडी ,पारपोली,खेडगे,इटे ,माद्याळ आदी गावात ही परंपरा मोठ्या प्रमाणात आहे.होळीत खेळियाची कला सादर करण्याची परंपरा आहे. ती होळीनंतर आजरा शहरातही सादर केली जाते. आजरा शहरभर सर्व ही कला सादर केली जाते.सर्वाकडूनच अर्थिक मदत अथवा नारळ दिला जातो.
सांस्कृतिक वसा जोपासण्याची गरज
शहरात डफ व गीतांच्या आवाजाने गल्ली बोळ दणाणून सोडला.आधुनिक डिजिटल युगात ही परंपरा जेष्ठ नागरिकांनी जिवंत ठेवली आहे. ही परंपरा कायम चालू ठेऊन सांस्कृतिक वसा जोपासना करणे गरजेचे आहे.होळीनिमित्य काढल्या जाणाऱ्या सोंगांची परंपरा मात्र हळूहळू कालबाहय झाली आहे.

सूटलो बाबा एकदाचे…
३१ मार्चच्या दणक्यातून चाकरमानी बाहेर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आर्थिक वर्षाखेर संपल्याने गेले महिनाभर आर्थिक संस्थांसह सरकारी कर्मचाऱ्यांची सुरू असणारी धावपळ थांबली असून या सर्व मंडळींनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
३१ मार्च म्हणजे आर्थिक वर्षाखेर. सहकारी बँकांसह विविध बँका, पतसंस्था, विकास सेवा संस्था, सहकारी इतर संस्था, विविध कंपन्यां या सर्वांबरोबरच शासकीय कर्मचाऱ्यांना या कालावधीतील वर्षभराची कामे पूर्ण करून घेणे आवश्यक असते. विशेषत: आर्थिक संस्थांची वसुलीसह विविध उद्दिष्टे गाठताना बरीच धावपळ करावी लागते. गेले महिनाभर चाकरमान्यांची ही धावपळ सुरू होती. लवकरच ३१ मार्च अखेरची आर्थिक स्थिती स्पष्ट होईल.
तूर्तास मात्र ३१ मार्चच्या दडपणातून चाकरमानी मात्र बाहेर पडला आहे हे निश्चित.

छत्रपती शाहू महाराज यांच्या जनसंपर्क दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बैठका…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांच्या जनसंपर्क दौरा नियोजन करणेसाठी महाविकास आघाडी व मित्रपक्ष, इंडिया आघाडी, व छत्रपती शाहू महाराज प्रेमी प्रमुख कार्यकर्ते यांच्या गावावर भेटीचे नियोजन करण्यात आले आहे.इंडिया आघाडी व महाविकास आघाडी आजरा तालुका च्या वतीने सदर माहिती देण्यात आली आहे.
सोमवार दि. १ रोजीचे नियोजन….
पेरणोली-सकाळी ८-००
हरपवडे -सकाळी ९-००. कोरीवडे- सकाळी १०.००
देवकांडगगाव -सकाळी ११.००. विनायकवाडी-दुपारी १२-००
गावठाण-दुपारी १-००. पारपोली- सायं. ५.००
खेडगे- सायं. ६.००
शेळप-सायं. ६-३०
दाभिलवाडी-सायं. ७-००
दाभिल- रात्री ८-००
मेंढेवाडी -रात्री ९.००

निधन वार्ता…
भागोजी मुळीक

सिरसंगी गावचे ज्येष्ठ नागरिक ह. भ. प. लक्ष्मण नागोजी मुळीक (वय ८० वर्षे)यांचे अल्पश: आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले,२ मुली असा परिवार आहे.



