mrityunjaymahanews
अन्य

तरुणाची आत्महत्या…

 


 

कासार कांडगाव येथील तरुणाची आत्महत्या…?

      आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

     कासार कांडगाव ता. आजरा येथील दीपक वासुदेव पारके या ३२ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केली.

      काल शुक्रवारी सायंकाळी त्याने विषारी द्रवाचे प्राशन केले .दरम्यान उपचारासाठी त्याला गडहिंग्लज येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते .उपचार सुरू असतानाच आज सकाळी त्याचा मृत्यू झाला.

त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले,आई, वडील असा परिवार आहे. तो मुरुडे ग्रामपंचायत येथे शिपाई म्हणून कामाला होता. या प्रकाराचे नेमके कारण समजू शकले नाही.

दुसरा प्रयत्न आणि मृत्यू

     अधिक चौकशी करता दीपक याने सात ते आठ महिन्यापूर्वी असाच एक प्रयत्न केला होता परंतु वेळीच उपचार झाल्याने त्यातून तो बचावला होता. पुन्हा त्याने काल केलेल्या प्रयत्नांत मात्र त्याला मृत्यूला सामोरे जावे लागले.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

मेंढोली येथे शेतकऱ्याचा मृत्यू…

mrityunjay mahanews

कुणी म्हणते बाल हनुमान, तर कुणी मारते दगड…

mrityunjay mahanews

Breaking news..

mrityunjay mahanews
error: Content is protected !!