mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


आजऱ्यात आज शोभायात्रा…
शहर नटले


                    आजरा: प्रतिनिधी

       श्रीराम जन्मभूमी मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आजरा शहर विद्युत रोषणाई ,भगवे झेंडे, पताका यामुळे शहर नटले असून आज विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

      श्रीराम मंदिर आजरा येथून सकाळी आठ वाजता भव्य शोभायात्रा करण्यात येणार आहे.

       दुपारी बारा वाजून वीस मिनिटांनी श्रीराम मंदिर, आजरा येथे अक्षता रोपण आरती व प्रसादाचा कार्यक्रम होईल. दुपारी १.३० वाजल्यापासून महिलांसाठी हळदी-कुंकू, तर सायंकाळी सहा ते सात या कालावधी शहरातील सर्व मंदिरांमध्ये आरती व रात्री आठ वाजता श्रीराम मंदिर आजरा येथे महाआरतीच्या आयोजन करण्यात आले आहे. रात्री वाजता भव्य आतषबाजीचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.


बैलगाडी व घोडा गाडी शर्यत प्रकरणी २५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद


                   आजरा : प्रतिनिधी

        उत्तूर-वझरे रस्त्यावर बेकायदेशीररित्या बैलगाडी व घोडा गाडी शर्यत भरवल्या प्रकरणी आजरा पोलिसात २५ जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद बाजीराव धोंडीबा कांबळे यांनी दिली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी…

      अभिजीत आनंदा आरेकर, प्रवीण अरुण लोकरे, अतिषकुमार बडेराव देसाई, धैर्यशिल/ सागर मधुकर येसाद,स्वप्निल पाटील, कमलेशा मारुती येसादे,दिपक धोंडीराम आमनगी, शिवाजी फाळके, धनाजी दत्तु उत्तूर कर, अनिकेत कुड़ताज, प्रणय गोपाळ आरेकर (सर्व रा. उत्तुर ता आजरा) अवधुत पेजरे रा. हालेवाडी, ता. आजरा, दत्तात्रय तुकाराम चव्हाण, रा. चिमणे ता.आजरा, समर्थ सचिन गुरव, रा. उत्तुर, ता. आजरा, बाबासाहेच चौगले, रा. सुळे, ता. आजरा, महेश रेडेकर महागाव, ता. गडहिंग्लज, मनोज सुरंगे, रा. महागाव, ता. गडहिंग्लज, साताप्पा आरडे, रा. वाघापुर, ता. भुदरगड ,प्रकाश रणवरे, रा कहगाव, ता. गहहिग्लज, दयानंद किल्लेदार, रा. गंगापुर, ता. भुदरगड, ओमकार यमाटे, पेद्रेवाडी, ता. आजरा,अनिल कदम, रा. दारवाड, ता. भुदरगड, विलास पाटील, मुंगुरवाडी, ता. गडहिंग्लज, सचिन कोंडे चांदेकर वाडी तालुका राधानगरी, प्रदीप अरुण लोकरे, उत्तुर ता.आजरा यांनी घोडा गाडी व बैलगाडी शर्यत बेकायदेशीर भरवून जमाव जमा करुन पाळीव प्राण्यांना निर्दयी व क्रूर वागणूक दिली.

     पाळीव प्राणी प्रतिबंधक अधिनियमानुसार सदर गुन्हा नोंद केल्याचे सांगण्यात आले. आजरा पोलीस पुढील तपास करीत आहेत.


आजरा तालुक्यातील कुणबी मराठा नोंदी संकेतस्थळावर उपलब्ध : तहसीलदार माने


                   आजरा: प्रतिनिधी

        माहे डिसेंबर २०२३ पासून ते माहे जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये आजरा तालुक्यामध्ये संबंधित तलाठी प्रशासनाकडून मराठा- कुणबी, कुणबी- मराठीच्या नोंदणीची गावनिहाय शोध मोहीम घेतली असून अभिलेख तपासणी करताना मराठा- कुणबी, कुणबी-मराठी च्या एकूण ११६८० नोंदी आढळून आल्या आहेत. तसेच सापडलेल्या नोंदणीची यादी ग्रामस्तरावर ग्रामपंचायत/ तलाठी सज्जा येते प्रदर्शित करण्याची कार्यवाही केली असल्याची माहिती आजरा तहसीलदार समीर माने यांनी दिली.

       सदर नोंदीची पीडीएफ स्वरूपातील फाईल गावनिहाय जिल्ह्याच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली असून ती नागरिकांना https://kolhapur.gov.in या संकेतस्थळावर पाहता येणार आहे. तसेच सदरची स्वाक्षंकित नक्कल पीडीएफ स्वरूपात डाउनलोड देखील करण्यात करता येणार आहे. यापूर्वी मागील दोन महिन्यांमध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालय भुदरगड आजरा या कार्यालयाकडून आजरा तालुक्यातील एकूण ५५ मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे दाखले वितरित करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित-डॉ.पोतदार


                    आजरा: प्रतिनिधी

       नवीन शैक्षणिक धोरण विद्यार्थी केंद्रित असून विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास या धोरणातून अपेक्षित आहे, असे प्रतिपादन प्रा.डॉ.किरण पोतदार यांनी केले. ते आजरा महाविद्यालयात आयोजित केलेल्या स्कूल कनेक्ट अभियान कार्यक्रमात बोलत होते. शिवाजी विद्यापीठ व आजरा महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जनता एज्युकेशन सोसायटीचे सचिव रमेश कुरुणकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे होते.

डॉ. पोतदार म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण जून २०२४ पासून राज्यातील सर्व वरिष्ठ महाविद्यालयात लागू होणार आहे. यामध्ये विद्यार्थ्याला विविध विषय निवडीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी विविध कौशल्ये आत्मसात करावीत, यासाठी अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आले आहेत. विद्यार्थी रोजगारक्षम व्हावा यासाठी विशेष प्रशिक्षणाची सुविधा देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना भारतातील परंपरेने आलेल्या ज्ञानाचाही अभ्यास करता येणार आहे. वरिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना तीन व चार वर्षांची पदवी मिळवता येईल. शिवाजी विद्यापीठाच्या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. डॉ. पोतदार यांनी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

          सुरुवातीला प्रा. संजय सावंत यांनी प्रास्ताविक केले. रमेश कुरुणकर यांनी नवीन शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, उपप्राचार्य दिलीप संकपाळ, गुणवत्ता हमी कक्षाचे सदस्य डॉ. बाबासाहेब मोहिते, प्रा. बी. एस. कडवाळे, डॉ. राजीव कर्पे व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार मानले.


पतसंस्था सेवकांसाठी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न

                    आजरा: प्रतिनिधी

       महाराष्ट्र राज्य सहकारी संघ मर्यादित पुणे कोल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड लिमिटेड कोल्हापूर व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आजरा आजरा तालुका पतसंस्था फेडरेशन यांचे संयुक्त सहकार्याने आजरा तालुक्यातील नागरी पगारदार पतसंस्थांच्या पदाधिकारी संचालक व सेवकांच्या करता प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला.

       गुरुवार दिनांक कार्यक्रमाचे उद्घाटन सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, आजरा सुजय कुमार येजरे यांच्या हस्ते करण्यात आला. उद्घाटनपर भाषणात त्यांनी सहकारी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी विशद केल्या.

      त्यानंतर तात्यासाहेब मोहिते सहकार प्रशिक्षण केंद्राचे प्रा. एस. टी. जाधव यांनी एस एल आर सी आर आर ही नवीन संकल्पना विशद केली. आजरा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे आयटी विभाग प्रमुख माननीय मिलिंद पुजारी यांनी सायबर सिक्युरिटी अॅक्ट या विषयावर मार्गदर्शन केले.

      पतसंस्था कर्ज वसुली करतेवेळी घ्यावयाची काळजी व सहकारी कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी या विषयावर पी.डी. यादव वसुली अधिकारी,कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर आजरा अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर यांनी मानसिक ताणतणाव व त्याचे करावयाचे व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.

      समारोप समारंभात जे. पी. नाईक ग्रामीण बिगर पतसंस्थेचे चेअरमन डॉ .शिवशंकर उपासे यांनी सहकारी संस्थांना प्रबोधनाची गरज आहे, त्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे असे स्पष्ट केले.

      त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय श्री आनंदा कुंभार अध्यक्ष आजरा तालुका पतसंस्था फेडरेशन यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सहकारी संस्थांना अद्यावत ज्ञानाची गरज आहे त्यासाठी अशा प्रशिक्षणातून सर्व सहकारी संस्थांच्या संचालक सेवकांनी प्रशिक्षित होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले. श्री. देसाई, सहकार शिक्षणाधिकारी कोऊल्हापूर जिल्हा सहकारी बोर्ड यांनी उपस्थित मान्यवरांचे व उपस्थितांचे आभार मानले.


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!