mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

शुक्रवार १ मे  २०२६

गडहिंग्लज- हलकर्णी- चंदगड रस्ता प्रकरणी बैठकीची मागणी


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

गेले वर्षभर गडहिंग्लज- हलकर्णी- इब्राहिमपूर- गवसे या रस्त्याचे काम सुरू आहे. या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे. त्याचबरोबर बऱ्याच ठिकाणी वळणे काढणे गरजेचे होते ती वळणे काढलेली नाहीत. ज्या ठिकाणी रस्ता करायचाय त्या जुन्या रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत आहेत. सध्या यात्रा, लग्न समारंभ सुरू असल्याने वाहतूक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. पाऊस सुरू होण्याआधी रस्त्याची डागडुजी होणे गरजेचे आहे. कांही ठिकाणी मोऱ्या बांधण्यासाठी उखडून ठेवले आहे, ते काम अद्यापही पूर्ण झालेले नाही अशा अनेक विषयावर चर्चा करण्यासाठी उपविभागीय अधिकारी आजरा- भुदरगड यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार दालनात तात्काळ बैठक लावावी अशी मागणी शिवसेना उबाठाच्या वतीने आजरा तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

तसे लेखी निवेदन देण्यात आले असून निवेदनावर जिल्हाप्रमुख संभाजी पाटील तालुकाप्रमुख युवराज पोवार, तालुकाप्रमुख संजय येसादे, अमित गुरव, सुयश पाटील, रोहन गिरी अरुण कांबळे, महादेव गुरव, हरीश्चंद्र व्हरकटे आदींच्या सह्या आहेत.

” माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियान कार्यशाळेसह व टी.बी.मुक्त ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण 

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

आरोग्य विभाग, पंचायत समिती आजरा यांचे मार्फत काल गुरुवार दि.३० रोजी तहसिलदार कार्यालय आजरा येथील सभागृह येथे ” माझं गाव आरोग्य संपन्न गाव ” अभियान कार्यशाळा व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम अंतर्गत टी.बी. मुक्त भारत अभियान अंतर्गत टी.बी. मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सौ. जयश्री गाडे सभापती पं.स. आजरा ह्या होत्या.

सदर कार्यक्रमांस सौ. यशोदा पोवार, उपसभापती पं.स. आजरा, श्री.सुधीर देसाई जि.प. सदस्य, श्री.शिरीष देसाई जि.प.सदस्य, श्री.विकास चोथे पं.स. सदस्य, श्री.समीर पारधे पं.स.सदस्य, श्री. समीर माने तहसिलदार आजरा, श्री. सुभाष सावंत गट विकास अधिकारी, डॉ.श्री. रविंद्र गुरव तालुका आरोग्य अधिकारी पं.स. आजरा, प्राथमिक आरोग्य केंद्राकडील वैद्यकिय अधिकारी, तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागाकडील अधिकारी, कर्मचारी, आशा गट प्रवर्तक उपस्थित होते.

सदर कार्यक्रमामध्ये महाराष्ट्र शासना मार्फत राबविणेत येत असलेल्या ” माझं गाव आरोग्य संपन्न गाव ” या अभियानाची माहिती, अभियानाचे ध्येय, आरोग्य विषयक बाबी, कुटूंब नियोजन साधनांचा वापर, वैशिष्टे, निकष, बक्षिसे, मेळावे, कालावधी, अभियानाचे स्तर / टप्पे इ. विषयक माहिती देवून मार्गदर्शन करणेत आले. तसेच सदर अभियानाची जनजागृती करणेत आली. सदरचे अभियान दि.०१/०४/२०२६ ते दि.३१/०३/२०२७ या कालावधीत राबविणेत येणार आहे. तसेच आजरा तालुक्यातील एकूण ३७ ग्रामपंचायती टी.बी.मुक्त झालेल्या आहेत. त्यामध्ये सुवर्ण-०४ (आरदाळ,चिमणे, कर्पेवाडी ,जानेवारी )ग्रा.पं., रौप्य-१५ ग्रा.पं., कास्य-१८ ग्रा.पं. अशा एकूण ३७ ग्रामपंचायतींना प्रमाणपत्र व म. गांधी यांचा पुतळा मान्यवरांच्या हस्ते वितरीत करणेत आला.

सदर कार्यक्रमांचे स्वागत श्रीमती मनिषा भांडकोळी यांनी केले. कार्यशाळेची माहिती डॉ.श्री. रविंद्र गुरव, तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली. आभार श्री. कौस्तुभ पाटील आरोग्य सेवक यांनी मानले.

आंतरराष्ट्रीय…

महागाईचा भडका उडणार…
रुपयाची निचांकी घसरण


जगावर युद्धाचे ढग कायम असून याचा मोठा फटका भारतीय रुपयाला बसत आहे. गुरुवारी रुपया ३२ पैशाने कोसळत ९५.३४ या नीचांकी स्तरावर पोहोचला आहे. रुपयाचे हे अवमूल्यन असेच चालू राहणार असल्याचे अर्थतज्ञांकडून सांगितले जात आहे. रुपयाच्या या दयनीय अवस्थेमुळे देशात महागाईचा भडका मोठ्या प्रमाणावर उडणार आहे.

भारत आयात करत असलेल्या कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल १२६ डॉलरपर्यंत वाढले आहेत. याचबरोबर भारतीय शेअर बाजारातून दोन महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी २० अब्ज डॉलर इतकी रक्कम काढून घेतली आहे. याचा सर्वात मोठा परिणाम भारतामध्ये इंधन दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वर्तवली जात आहे. इंधन दरवाढ होताच देशामध्ये महागाईचा आगडोंब उसळणार आहे.

मलिग्रे येथे भावेश्वरी मंदिर वास्तूशांती कार्यक्रम ७ मे पासून

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मलिग्रे येथील भावेश्वरी मंदिराचे बांधकाम पुर्ण झाले असून गुरूवार ७ मे रोजी पासून मंदीर वास्तुशांती व कलशारोहण सोहळा,धार्मिक विधी आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

७ मे रोजी मुहूर्तमेढ स्थापना व धार्मिक विधी होत असून ८ मे रोजी सर्व मुर्तींची व कलश मिरवणूक सकाळी ८ वाजता सुरुवात होत आहे. ९ मे रोजी प्रधान देवता व मुर्तीची स्थापना व धार्मिक विधी तर रविवारी १० मे रोजी महाआरती व महाप्रसादाचे वाटप होणार आहे .

सलग चार दिवस गावात पाळक असून भावेश्वरी मंदिर जिर्णोध्दार समितीने भावीक भक्तांना व देणगीदार याना या सोहळ्यात उपस्थित रहाणेचे आवाहन केले आहे.

शासकीय ध्वजारोहण…

महाराष्ट्र दिनाच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त आजरा तहसील कार्यालय प्रांगणात सकाळी ८ .०० वाजता तहसीलदार समीर माने यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा शासकीय समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

निधन वार्ता

शंकर इळके

इळकेवाडी/धामणे ता. आजरा येथील शंकर राऊ इळके ( वय ८४ वर्षे ) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चातत पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे.

विशाल मगदूम

धामणे ता. आजरा येथील विशाल पांडुरंग (वय ३० वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई व एक विवाहित बहीण असा परिवार आहे.

आजचे पंचांग 

दिनांक : १ मे २०२६
वार : शुक्रवार
माह (अमावस्यांत) : वैशाख
माह (पूर्णिमांत) : वैशाख
ऋतु : ग्रीष्म
आयन : उत्तरायण
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथी : पौर्णिमा (रात्री १०.५२ पर्यंत) त्यानंतर प्रथम तिथी
नक्षत्र : स्वाती नक्षत्र (२ मे पहाटे ०४.३४ पर्यंत) त्यानंतर विशाखा नक्षत्र
योग : सिद्धि योग (रात्री ०९.१२ पर्यंत) त्यानंतर व्यातीपात योग
करण : विस्ती भद्रा करण (सकाळी १०.०० पर्यंत) त्यानंतर भाव करण
चंद्र राशी : तूळ राशी
सूर्य राशी : मेष राशी
अशुभ मुहूर्त:
राहु काळ : सकाळी १०.५९ ते दुपारी १२.३६ पर्यंत
शुभ मुहूर्त:
अभिजित : दुपारी १२.१० ते दुपारी ०१.०१
सूर्योदय : सकाळी ०६.१२
सूर्यास्त : सायंकाळी ०७.००
संवत्सर : पराभव
संवत्सर(उत्तर) : रौद्र
विक्रम संवत: २०८३ विक्रम संवत
शक संवत: १९४८ शक संवत

आयपीएल न्यूज

गुरुवारी झालेल्या बंगळूर विरुद्ध गुजरात सामन्यांमध्ये गुजरातने बंगला चार गड्यांनी पराभूत केले बंगळुरूचा १५५ धावा डाव संपुष्टात आल्यानंतर गुजरातने १६ षटकातच हे उद्दिष्ट गाठले. जसन होल्डर याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.

आजचा सामना

दिल्ली विरुद्ध राजस्थान
वेळ : सायंकाळी ७.३० पासून

गुण तक्ता- पहिले चार संघ

१. पंजाब – १३ गूण
२. बंगळुरू – १२ गुण
३. हैदराबाद – १२ गुण
४. राजस्थान- १२ गुण

 

संबंधित पोस्ट

लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मारकासाठी दोन कोटींची तरतूद करणार :नामदार मुश्रीफ…… यासह आजरा स्थानिक ताज्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सुळे येथील तिघांचा बुडून मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!