


आजरा अर्बन शेड्युल्ड बँकेच्या टप्प्यावर : अध्यक्ष रमेश कुरुणकर

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा अर्बन बँकेकडून सभासदांच्या हिताच्या अनेक योजना राबवल्या जात आहे बँकेचा एक हजार कोटी रुपयांच्या ठेवीच्या टप्पा वर्षभरात पूर्ण होत असून ३५ पैकी २७ शाखा या स्व मालकीच्या इमारतीत सुरू आहेत. शेड्युल्ड बँकेकरता पूर्ण करावे लागणारे निकष पूर्ण करण्याचे काम सुरू असून लवकरच बँकेची ओळख ‘शेडयुल्ड बँक’ अशी होईल असे प्रतिपादन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरूणकर यांनी केले.
आजरा अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड आजरा (मल्टीस्टेट) या बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष रमेश कुरुणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी ते बोलत होते.
सभेच्या सुरुवातीस दीप प्रज्वलनानंतर अहवाल कालावधीतील विविध क्षेत्रातील मृत पावलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी बोलताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोकअण्णा चराटी यांनी अनेकांच्या योगदानातून बँकेचा एक हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा पूर्ण होत असल्याने समाधान वाटत असल्याचे सांगितले. देशातील प्रमुख १०० बँकांमध्ये आजरा बँकेचा समावेश होण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट केले.
सभेमध्ये वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांसह विविध क्षेत्रांमध्ये विशेष कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
सभासदांच्या वतीने आर. डी. पाटील यांनी नोकर भरतीसह पोटनियम दुरुस्ती बाबत विचारलेल्या प्रश्नांना मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत गंभीर व अशोकअण्णा चराटी यांनी उत्तरे दिली.
सभेस उपाध्यक्ष सुनिल मगदूम, अरुण काकडे, संचालक सुरेश डांग,विलास नाईक,
डॉ. दीपक सातोसकर,डॉ. अनिल देशपांडे, किशोर भुसारी,बसवराज महाळंक, आनंदा फडके,सौ. प्रणिता केसरकर,श्रीमती शैला टोपले ,सौ. अस्मिता सबनीस, सुर्यकांत भोईटे, किरण पाटील,संजय चव्हाण, जयवंत खराडे, दशरथ अमृते, सौम्या तिरोडकर, मीनल होळणकर,मंगल कुरुणकर,मनीषा कुरुणकर, विजयकुमार पाटील, अनिता नाईक विनय सबनीस, सुनील देशपांडे,राजू पोतनीस, निलांबरी कामत, सिद्धेश नाईक यांच्यासह सभासद व अधिकारी वर्ग उपस्थित होता.
संचालक विलास नाईक यांनी आभार मानले.

‘मित्रपरिवार ‘ची दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर मंडळाने फोडली…

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
आजरा येथील मित्रपरिवार यांची दहीहंडी गडहिंग्लज येथील नेताजी पालकर मंडळाने फोडली. या ग्रुपने सात मानवी मनोरे रचले. यावेळी तालुक्यातील लोकांनी दहीहंडी पाहण्यासाठी जोरदार गर्दी केली होती. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. दहीहंडी चे पूजन मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. गडहिंग्लज येथील नेताजी पालकर तालीम मंडळाने सलामी देऊन सात मनोरे रचून दहीहंडी फोडली.
या कार्यक्रमासाठी संजय भाऊ सावंत, सुभाष कांबळे,आजरा अन्याय निवारण कमिटीचे परशुराम बामणे, संजय पाटील गडहिंग्लज, आप्पा शिवणे गडहिंग्लज, सुभाष कांबळे,प्रभाकर कोरवी,अनिकेत चराटी, रवी हुक्केरी, नितीन यादव, शिवसेना नेते राजू रेडेकर, सचिन कांबळे, सचिन बिरजे, धनाजी पारपोलकर, सतीश बामणे ,रोहित कोरवी, प्रदीप कांबळे इत्यादी नागरिक उपस्थित होते.
आभार वामन सामंत यांनी मानले.


योगासन स्पर्धेत अवनीचे यश

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
इचलकरंजी येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय शासकीय योगासन स्पर्धेत उत्तूर विद्यालय, उत्तूरची योगकन्या कु.अवनी अभिजीत देसाई, इयत्ता सहावी, हीने १४ वर्षांखालील मुलींच्या योगासन स्पर्धेत रिदमिक प्रकारामध्ये प्रथम क्रमांक व वैयक्तिक प्रकारामध्ये द्वितीय क्रमांक मिळविला व तिची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या विभागीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली.
तिला क्रीडा शिक्षक संभाजी तिबिले व योगशिक्षक संदिप कुंभार यांचे मार्गदर्शन व मुख्याध्यापक आर. डी. महापुरे व पालक अभिजीत देसाई यांचे प्रोत्साहन मिळाले.

देव तारी त्याला कोण मारी…?
भिंतीच्या ढिगाऱ्यात महिला सापडली,मात्र सुदैवाने बचावली

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
हंदेवाडी ता.आजरा येथील अनुसया तुकाराम कदम (वय ६८ वर्षे ) यांच्या घराची भिंत पावसामुळे तळातून भिजली होती.सदर भिंत त्यांच्या अंगावर काल रात्री साडे आठ च्या दरम्यान पूर्ण कोसळली. व भिंतीच्या मातीच्या ढिगाऱ्याखाली सदर महिला पूर्णपणे अडकून बसली.फक्त तोंड तेवढे ढिगाऱ्याबाहेर दिसत होते.सदर महिला ओरडत असताना त्यांच्या घराशेजारी पांडुरंग जाधव यांचा गोठा आहे. म्हैशींना चारा घालण्यासाठी जाधव यांच्या पत्नी सौ. मंगल सुदैवाने याच वेळी आल्या होत्या. त्यांना सदर महिलेचा ओरडण्याचा आवाज आला.सौ. मंगल यांनी तात्काळ रोहन भालेकर यांना बोलवले व रोहन याने रवींद्र पटेकर ,महादेव सरोलकर यांना बोलावून घेतले.
हा गोंधळ पाहून गिरीश रेडेकर, पोपा पुंडलिक फडके,गणेश शिवूडकर हे पण आले या सर्वांनी सदर महिलेला ढिगाऱ्यातून बाहेर काढले.सौ. मंगल जाधव यांनी या महिलेला पाहिल्याने सुदैवाने ही महिला बचावली.

सव्वा लाखाची बॅग केली परत…
‘गोकुळ ‘च्या माजी कर्मचाऱ्याचा प्रामाणिकपणा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
उत्तुर ता.आजरा येथील गोकुळ चे सेवा निवृत्त कर्मचारी शिवाजी पाटील मंगळवारी सकाळी ते येथील श्री भावेश्वरी मंदिरात दर्शनासाठी गेले असताना त्यांना तेथे एक हँड बॅग सापडली. बॅग मध्ये मोठी रक्कम व आय डी दिसली. आय डी वरून ती बॅग येथिल एका तरुण उद्योजकाची असल्याचे त्यांना समजले.
ताबडतोब त्यांनी त्या उद्योजकाच्या दुकानात जाऊन ती बॅग परत केली.पाटील यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणासाठी येथील भावेश्वरी भक्त मंडळामार्फत त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.शिवाजी पाटील यांनी दाखविलेल्या या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे.

विठ्ठल रुक्माई दूध संस्थेला ३ लाख ८७ हजाराचा नफा

आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा
कोळिंद्रे ता.आजरा येथील विठ्ठल रुक्माई दूध संस्थेला तीन लाख ८७ हजार नफा झाल्याचे चेअरमन नागोजी बोर यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत सांगितले.
स्वागत व प्रास्ताविक नारायण कांबळे यांनी केले. अहवाल वाचन सचिव उत्तम गाईंगडे यांनी केले. संस्थेकडून सभासद दूध उत्पादकाची म्हैस दगावल्यास तात्काळ पाच हजार रुपये मदतनिधी म्हणून देण्याचे ठरवण्यात आले. दूध संस्थेला जास्तीत जास्त दूध पुरवठा करणारे सुनील गाईंगडे, निंगाप्पा करडे तानाजी जाधव यांचा रोख रक्कम बक्षीस स्वरूपात देऊन सत्कार करण्यात आला.
त्याचबरोबर गाईचे दूध पुरवठा करणारे रत्ना बाळासाहेब चौगुले व नंदा जाधव यांनाही रोख रक्कम पंधराशे व एक हजार रुपये देऊन सत्कार करण्यात आला.
सभेस आप्पा गोंधळी, संभाजी सावंत ,सागर सरोळकर महादेव भोगले ,नारायण कांबळे ,अश्विनी संकपाळ, रेणुका जाधव, संदीप पोवार यांच्यासह दूध उत्पादक व सभासद उपस्थित होते.
आभार उत्तम गाईंगडे यांनी मानले.



