mrityunjaymahanews
अन्य

सर्पदंशाने महिलेचा मृत्यू


सर्पदंशाने भादवण येथील महिलेचा मृत्यू

         आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

       भादवण ता.आजरा येथील सौ.ज्योती संभाजी देवरकर वय ४५ (रा. भादवण) यांचा सर्पदंशाने मृत्यू झाला.

      देवकर या दोन दिवसापूर्वी खत टाकण्याकरता शेतामध्ये गेल्या असता त्यांना सर्पदंश झाला होता. उपचारासाठी त्यांना गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालय व त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

     दरम्यान त्यांचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला आहे. त्यांच्या पश्चात पती सासू दोन मुली मुलगा असा परिवार आहे त्यांच्या निधनाने बांधवांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारणार कधी?

     गडहिंग्लज येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये झालेल्या उपचारातील दिरंगाईमुळे देवरकर यांना खाजगी रुग्णालयात ठेवण्याची वेळ आली. उपजिल्हा रुग्णालयात वेळीच उपचार झाले असते तर कदाचित देवरकर यांचा जीव वाचला असता. उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारणार तरी कधी ? असा संतप्त सवाल शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी सौ.देवरकर यांच्या निधनानंतर उपस्थित केला आहे.


 

संबंधित पोस्ट

विसर्जनाचा पहिला मान सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

तरुणीची आत्महत्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!