mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या


झुलपेवाडी येथून महिला बेपत्ता…

               आजरा: प्रतिनिधी 

     झुलपेवाडी तालुका आजरा येथून सौ मनीषा भिकाजी बेळवेकर ही २१ वर्षीय विवाहित महिला दि. १९ पासून बेपत्ता आहे. सौ. मनीषा या उत्तुर येथे कामानिमित्त जाऊन येतो म्हणून घरातून निघून गेल्या असून त्या अद्याप परत आलेल्या नाहीत .

     त्यांच्या नातेवाईकांसह गावात व आजूबाजूच्या गावात शोध घेतला असता अद्याप त्या आढळल्या नाहीत. याबाबतची वर्दी मनीषा यांचे पती भिकाजी विठ्ठल बेळवेकर रा. झुलपेवाडी यांनी आजरा पोलिसात दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पुढील तपास करीत आहेत.

मराठी राजभाषा दिना निमित्त  मनसे विद्यार्थी सेना यांचे वतीने मराठी स्वाक्षरी उपक्रम 

                  आजरा; प्रतिनिधी 

         छत्रपती संभाजी महाराज चौक आजरा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी उपक्रम जिल्हा सरचिटणीस  सुधीर  सुपल, तालुका अध्यक्ष  आनंदा घंटे  व जिनहीत व विधी कक्ष प्रमुख परशुराम बामणे (भाऊजी) यांचे मार्गदर्शन खाली विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष कु. अश्विन एकनाथ राणे व. विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष कु. वैष्णव दळवी यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबवण्यात आला.

    या कार्यक्रमाला  अजरेकर व सर्व विद्यार्थ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. गेले ३ वर्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हा उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे.” माझी मातृ भाषा माझा अभिमान”, “मराठी पाट्या”, यांसारखे मायबोली विषय घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना विविध उपक्रम घेत आहे. आणि या उपक्रमाला जनतेतून खूप चांगला प्रतिसाद भेटत आहे. इथून पुढे ही मराठी भाषेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा तालुका कार्यक्रम/ उपक्रम करून आपल्या भाषेचा अभिमान आणि स्वाभिमान टिकवून ठेवणे साठी तत्पर आहे असे यावेळी बामणे यांनी सांगितले.

दाभिल येथील विसावा फांऊडेशनच्या रक्तदान शिबीरात २० बॅग रक्तसंकलन


                    आजरा:प्रतिनिधी

      दाभिल येथे रक्तदान व नेत्र तपासणी शिबीर उत्साहात पार पडले. येथील विसावा फांऊडेशन व कोल्हापूर येथील वैभवी लक्ष्मी ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. सरपंच युवराज पाटील यांच्या हस्ते रक्तदान शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात २० बॅग रक्त संकलन करण्यात आले.

     स्वागत फांऊडेशनचे संचालक अभय हासबे यांनी केले. प्रास्ताविकात फांऊडेशनचे सचिव विनायक राणे यांनी कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. गेल्या दोन वर्षामध्ये फांऊडेशनने राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. या शिबीरात २० बॅग रक्तसंकलन करण्यात आले तसेच डॉ. सुदाम हरेर यांच्या मार्गदर्शनाखाली ४० ग्रामस्थांची नेत्र तपासणी करण्यात आली.

        यावेळी फांऊडेशनचे अध्यक्ष ओमकार मुगुर्डेकर, उपाध्यक्ष संतोष पाटील, खजिनदार जयानंद पाटील यांच्यासह फांऊडेशनचे सदस्य, सभासद, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन हासबे यांनी केले तर राणे यांनी आभार मानले.

कार डीलर असोसिएशनची कार्यकारणी जाहीर

                     आजरा:प्रतिनिधी

        गडहिंग्लज,आजरा व चंदगड कार डीलर असोसिएशन मार्फत आजरा तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.चंदगड आजरा गडहिंग्लज संपर्कप्रमुख- पंढरीनाथ एकल. गडहिंग्लज तालुका अध्यक्ष- शेखर पाटील, उपाध्यक्ष- दुंड्डाप्पा मतकरी,अभिजीत करंबळी, राजू पाटील, संग्राम लोकरे, अभिजीत साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

      यामध्ये आजरा तालुका अध्यक्षपदी समीर तकीलदार,उपाध्यक्षपदी विजय डोंगरे, खजिनदारपदी भाऊ कदम व आजरा संपर्कप्रमुखपदी इम्तियाज माणगावकर
सेक्रेटरी – इस्माईल शेख व हारूण शेख यांची निवड करण्यात आली.

     या कार्यक्रमास आजरा तालुक्यातील सर्व कार डीलर उपस्थित होते.

उत्तूरला बिमा ग्राम योजना पुरस्कार : १ लाख रुपये विकास निधी


                     उत्तूर: प्रतिनिधी

       उत्तूर(ता.आजरा) ग्रामपंचायतीला २०२२-२३ सालचा बिमा ग्राम योजना पुरस्कार प्राप्त झाला आहे. या योजनेअंतर्गत ग्रामपंचायतीच्या खात्यावर १ लाख रुपये जमा झाले आहेत.

         सरपंच किरण आमणगी यांनी सांगली येथील शांतीनिकेतन येथे झालेल्या शासनाच्या सरपंच प्रशिक्षण कार्यक्रमात भाग घेतला. यावेळी गावभेट कार्यक्रमांत त्यांना बिमा ग्राम योजनेची माहिती मिळाली.ज्या गावातून दरवर्षी १०लाख रुपये विमा हप्ता भरला जातो त्या गावासाठी १लाख रुपये विकास कामांसाठी निधी मिळतो अशी माहिती मिळाली. कागदपत्रे पूर्ततेनंतर १ लाख रुपये प्राप्त झाले.२०२३-२४ साठी विमा कंपनीकडे प्रस्ताव सादर केला असून यावेळी विकास निधी प्राप्त होईल असे सरपंच किरण आमणगी यांनी सांगितले.उपसरपंच सौ.समिक्षा देसाई व गावातील विमा प्रतिनिधी यांनी यासाठी सहकार्य केले.

निधी गावच्या विकासासाठी खर्च करणार…

बिमा ग्राम योजनेतून १लाख रुपये ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा झाले असून ग्रामपंचायत सदस्य यांच्या सुचनेनुसार हा निधी गावच्या विकासासाठी खर्च करण्यात येईल असे पी.के.पाटील- ग्रामविकास अधिकारी उत्तूर यांनी सांगितले.

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत साळगाव द्वितीय


                     आजरा: प्रतिनिधी

     मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा स्पर्धेत आजरा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा गटात विद्या मंदिर साळगाव शाळेचा द्वितीय क्रमांक आला आहे. प्रथम केंद्रस्तरावर पात्र ठरल्या. नंतर तालुकास्तरिय कमिटीचे संजय ढमाळ गटविकास अधिकारी पं. स.आजरा , मा बसवराज गुरव गटशिक्षणाधिकारी आजरा व संजय पोवार, केंद्र मुख्याध्यापक उत्तूर यांनी मुल्यांकन केले.

      यावेळी कमिटीचे स्वागत लेझीम पथकाने केले तसेच प्लास्टिक मुक्तीवर पथनाट्य , साधन कवायत , त्रिपुरा राज्य होजागिरी नृत्य सादर करण्यात आले . त्यानंतर शाळेने अभियान काळात राबवलेले परसबाग , रोपवाटीका , संस्कार बचत बँक , लोकसहभागातुन शै उठाव व शाळा सजावट व विविध उपक्रम यांचे सादरीकरण करण्यात आले. मुख्याध्यापिका सौ. मंजिरी यमगेकर यांनी स्वागत व स्पर्धेतील सहभाग व केलेले काम याचा आढावा घेतला.

      गटविकास अधिकारी ढमाळ  यांनी शालेय परिसर ,स्वच्छता व राबवलेले उपक्रम याचे कौतुक केले . या अभियान यशस्वी करण्यासाठी सरपंच धनंजय पाटील , व्यवस्थापन अध्यक्ष संदिप पाटील व उपाध्यक्ष ज्ञानदेव जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. या स्पर्धेच्या तयारीसाठी संजय मोहिते सौ. गीता जंगम व निवृती मिटके यांनी परिश्रम घेतले.

व्यंकटराव प्रशालेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ उत्साहात

                   आजरा: प्रतिनिधी

       येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर  कॉलेज, आजरा येथे ‘मराठी भाषा गौरव दिन’ व कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने प्रशालेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.निबंध लेखन स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चारोळी,स्वरचित कविता, नाट्यछटा,इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमांना प्रशालेतील विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला.

      कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली.प्रशालेच्या पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांच्या हस्ते कविश्रेष्ठ कुसुमाग्रज तथा वि.वा.शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शिक्षक-शिक्षिका, विद्यार्थी व कर्मचारी उपस्थित होते.

      मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी लिहिलेले ‘सृजनशील लेखन’ या भित्तीपत्रकांचे पर्यवेक्षकांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेतील मराठी विषय शिक्षक व्ही.एच.गवारी यांनी केले.  कु.सिमरन भिकाजी पाटील व कु. सानवी लक्ष्मण चौगुले यांनी भाषण केले.  विद्यार्थिनींनी अभिवाचन केले. 

      प्रशालेत मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित केलेल्या स्पर्धा मधील बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

   बक्षीस पात्र विद्यार्थी पुढील प्रमाणे:-

निबंध स्पर्धा- लहान गट कु.आस्था सचिन गुरव (प्रथम)कु.निरंजन गणेश पाटील(द्वितीय) कु.स्वराज प्रवीण निंबाळकर(द्वितीय ) कु.तनुजा तानाजी मिसाळ (तृतीय)

निबंध लेखन -मोठा गट कु.दिव्या परशराम होरटे( प्रथम) कु.उत्कर्षा दिगंबर देसाई द्वितीय ) कु.रिया बाबुराव निकम( तृतीय)

वक्तृत्व स्पर्धा . कु.सिमरन भिकाजी पाटील( प्रथम) कु.लक्ष्मण चौगुले (द्वितीय)
चारोळी लेखन- कु.गौरी विजय देसाई (प्रथम) कु.तेजस्विनी विकास नरके (द्वितीय)

नाट्यछटा स्पर्धा- कुमार हाजीक महंमद इरफान सय्यद( प्रथम) कुमारी आफिया नजीम भडगावकर( द्वितीय) कु. अथर्व दीपक कोरवी (तृतीय)

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता कु.सबिहा जमीर नायकवाडी व कु. नैशदा पाटील यांनी केले. तर आभार कु. गौरी विजय देसाई हिने मानले.

निधन वार्ता…
डॉ.जयदीप देसाई


       वाटंगी ता.आजरा येथील रवळनाथ उद्योग समूहाचे नेते, जनता बँकेचे माजी अध्यक्ष कै. पांडुतात्या देसाई यांचे ज्येष्ठ चिरंजीव, रवळनाथ सेवा संस्थेचे संचालक व उद्योग समूहाचे मार्गदर्शक डॉ. जयदीप पांडुरंग देसाई (वय ५२ वर्षे) यांचे मंगलोर येथे आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा,आई, भाऊ, बहीण असा परिवार आहे.

      अंत्यविधी गुरुवार दि.२९ रोजी वाटंगी येथे सकाळी ८:०० होणार आहेत.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

कै. केदारी रेडेकर हे लढवय्या कार्यकर्ते…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!