mrityunjaymahanews
अन्य

सातच्या बातम्या

हा छंद जीवाला लावी पिसे

अखेर सीसीटीव्ही कॅमेरे चोर सापडला


                   आजरा : प्रतिनिधी

         सीसीटीव्ही कॅमेऱ्याची आवड व ते जवळ बाळगण्याचा छंद आजरा तालुक्यातील खेडे येथील तरुणाला चांगलाच महागात पडला असून शहरातून गायब झालेले कॅमेरे नेमके कोणी चोरले ? याचा शोध अखेर लागला असून खेडे येथील एका तरुणाने केवळ छंद जोपासण्यासाठी केलेला हा उपद्व्याप होता असे स्पष्ट झाले आहे. यामुळे संबंधित तरुणाच्या कुटुंबीयांना मात्र चांगलाच त्रास सहन करावा लागला. तरूण मात्र अनोख्या छंदापायी गजाआड झाला आहे.

         बुधवारी रात्री आजरा शहरातील व्यापाऱ्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या दुकानाजवळ लावलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यापैकी चार ते पाच जणांचे कॅमेरे अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्यानंतर व्यापारी वर्गात चांगलीच खळबळ उडाली होती. अन्य काही कॅमेऱ्यामध्ये मात्र संबंधित चोरटा गाडीसह कैद झाला होता.

         शुक्रवारी आठवडा बाजाराच्या निमित्ताने आलेल्या एका व्यक्तीच्या गाडीचा क्रमांक व वर्णन सीसीटीव्ही मध्ये कैद झालेल्या गाडीशी मिळते जुळते असल्याचे कांही तरुणांच्या लक्षात आले तातडीने त्याला ताब्यात घेण्यात आले.

         संबंधित वाहनचालक व्यक्ती देखील या प्रकाराने गोंधळून गेली. गाडी माझी आहे पण गाडीवरचा चोर मी नाही, असे त्यांनी सांगण्यास सुरुवात केली. सदर बाब पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तीला अंधारात ठेवून मुलाने केवळ कॅमेरे जमा करण्याच्या हौसेपोटी बापाच्या माघारी दुचाकी नेऊन सदर उपद्व्याप केल्याचे स्पष्ट झाले. 

शुक्रवारी रात्री उशिरा दिलेल्या व्यापाऱ्यांच्या फिर्यादीवरून आजरा पोलिसांनी खेडे येथील तरुणाविरोधात विरोधात गुन्हा नोंद करून अटक केली आहे. सदर गुन्ह्याची कबुली संबंधित तरुणाने दिली असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक  सुनील हारुगडे यांनी दिली.


प्रा. शिंत्रे पात्र

राजकीय हालचाली वेगावल्या


                      आजरा:प्रतिनिधी

         आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी हात्तीवडे – मलिग्रे गटामध्ये व ब वर्ग बिगर उत्पादक गटातून विद्यमान अध्यक्ष प्रा. सुनील शिंत्रे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर तक्रारदार व शिंत्रे यांच्या वतीने वकिलांनी जोरदार युक्तिवाद केल्यानंतर सदर निकाल प्रलंबित ठेवण्यात आला होता. अखेर वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी गोपाळ मावळे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज दोन्ही गटातून वैध ठरवला आहे. यामुळे पॅनल रचनेच्या पुढील हालचाली गतिमान झाल्या आहेत.

         १५२ जणांनी १७८ अर्ज दाखल केले होते. त्यापैकी २६ दुबार व ६ अर्ज अपात्र ठरले आहेत. १४६ पात्र उमेदवारांची यादी…

गट क्र. एक – उत्तूर मडिलगे गट (दोन अर्ज अपात्र)

संजय शेणगावे (बहिरेवाडी)

प्रकाश चव्हाण (चव्हाणवाडी)

दिपक देसाई (मडिलगे)

मारूती घोरपडे (उत्तूर)

शिरीष देसाई (उत्तूर)

भिकू गुरव (मडिलगे)

सदानंद पाटील (मडिलगे)

पांडुरंग दिवटे (वडकशिवाले)

धोंडीराम सावंत (उत्तूर)

निवृत्ती पाटील (मडिलगे)

उमेश आपटे (उत्तूर)

वसंतराव धुरे (उत्तूर)

गट क्र. दोन – आजरा श्रृंगारवाडी गट ( एक अपात्र, चार दुबार)

युवराज पोवार (देऊळवाडी)

दिगंबर देसाई (शिरसंगी)

अशोक चराटी (आजरा)

गणपतराव देसाई (शिरसंगी)

जयवंत शिंपी (आजरा)

विलास नाईक (आजरा)

राजाराम होलम (पोळगाव)

विजय देसाई (वाटंगी)

शिवाजी नांदवडेकर (वाटंगी)

सुभाष देसाई (शिरसंगी)

अभिषेक शिंपी (आजरा)

प्रकाश बुगडे (शिरसंगी)

महादेव होडगे (यमेकोंड)

तुळसाप्पा पोवार (देऊळवाडी)

विश्वास गाईंगडे (वाटंगी)

बाबुराव नार्वेकर (वाटंगी)

आबुताहेर तकिलदार (आजरा)

रशीद पठाण (आजरा)

मुकुंद देसाई (आजरा)

गट क्र.३ – पेरणोली गवसे गट (सहा दुबार)

उदयसिंह पवार (पेरणोली)

सहदेव नेवगे (गवसे)

दशरथ अमृते (हाळोली)

सदाशिव डेळेकर (बाची)

गोविंद पाटील (घाटकरवाडी)

मुकुंद तानवडे (देवर्डे)

अजिंक्य तानवडे (देवर्डे)

रामचंद्र पाटील (घाटकरवाडी)

जोतिबा चाळके (देवर्डे)

रणजित देसाई (सुलगाव)

प्रकाश पाटील (गवसे)

राजेंद्र सावंत (पेरणोली)

शिवाजी पाटील (गवसे)

सर्जेराव देसाई (पेरणोली)

इंद्रजित देसाई (आजरा)

शांताराम पाटील (दाभिल)

शामराव बोलके (माद्याळ)

तुकाराम गावडे (वेळवट्टी)

सुधीर देसाई (वेळवट्टी)

बाबासाहेब पाटील (साळगाव)

किरण तानवडे (देवर्डे)

दौलती पाटील (कोरीवडे)

लहू पाटील (दर्डेवाडी)

इंद्रजीत देसाई (वेळवट्टी

गट क्र.४- भादवण गजरगाव गट (चार दुबार)

मधुकर देसाई (सरोळी)

संजय पाटील (भादवण)

सुधीरकुमार पाटील (कानोली)

राजेंद्र मुरूकटे (कानोली)

मनोहर पाटील (सरोळी)

शिवाजी कुराडे (सरोळी)

आनंदा कुलकर्णी (गजरगाव)

भिवा जाधव (भादवण)

आनंदा जोशिलकर (भादवण)

गोपाळ केसरकर (भादवण)

राजेश जोशीलकर (भादवण)

अंजना रेडेकर (पेद्रेवाडी)

बाळकृष्ण चव्हाण (गजरगाव)

बाबासाहेब देसाई (कानोली)

अनिरूध्द रेडेकर (पेद्रेवाडी)

मनोहर जगदाळे (कोवाडे)

संभाजी सरदेसाई (निंगुडगे)

राजाराम पाटील (गजरगाव)

आनंदा पाटील (सरोळी)

संजय देसाई (भादवण)

बाजीराव पाटील (कानोली)

गट क्र.५ – हात्तिवडे मलिग्रे गट (चार दुबार)

आनंदराव बुगडे (मलिग्रे)

विष्णू केसरकर (किणे)

शंकर उगाडे (कोळिंद्रे)

सदाशिव माणगांवकर (मलिग्रे)

संभाजी पाटील (हात्तिवडे)

अनिल फडके (सुळे)

शिवाजी लाड (मेंढोली)

तानाजी राजाराम (पोश्रातवाडी)

सुरेश सावंत (कोळींद्रे)

गोविंद नारळकर (पोश्रातवाडी)

सुर्यकांत रेडेकर (हारूर)

रामचंद्र पाटील (कोळींद्रे)

राजाराम जाधव (सुळे)

पांडुरंग हरेर (आजरा)

सुनिल शिंत्रे (मेंढोली)

रमेश बुगडे (कोळींद्रे)

ब वर्ग बिगर उत्पादक सभासद गट

(एक अपात्र, दोन दुबार)

नामदेव नार्वेकर (आजरा)

संतोष भादवणकर (बोलकेवाडी)

अशोक तर्डेकर (मलिग्रे)

उदयराज पवार (पेरणोली)

जनार्दन टोपले (आजरा)

रामचंद्र पाटील (सुळेरान)

अनिरूध्द रेडेकर (पेद्रेवाडी)

सुनिल शिंत्रें (मेढोंली)

जयवंत शिंपी (आजरा)

अनुसुचित जाती-जमाती प्रतिनिधी गट

(एक दुबार)

मलिककुमार बुरूड (आजरा)

अशोक कांबळे (का. कांडगाव)

दिनेश कांबळे (पेरणोली)

गोविंद जाधव (पेरणोली)

किरण कांबळे (आजरा)

हरी कांबळे (पेरणोली)

भाऊसो कांबळे (सुळे)

शिवाजी कांबळे (हरपवडे)

शशिकांत सावंत (बुरूडे)

तानाजी दावणे (गजरगाव)

महिला प्रतिनिधी गट (दोन दुबार)

सुनिता रेडेकर (सरंबळवाडी)

सुजाता पाटील (हाजगोळी खु)

रचना होलम (पोळगाव)

संगीता माडभगत (साळगाव)

रेखा राजाराम (पोश्रातवाडी)

सुमित्रा देसाई (मडिलगे)

चेतना देसाई (देवकांडगाव)

श्रध्दा शिंत्रे (गडहिंग्लज)

मनिषा देसाई (वेळवट्टी)

सुमन डेळेकर (बाची)

सुमन पोतनीस (सातेवाडी)

अंजना रेडेकर (पेद्रेवाडी)

गिता वांगणेकर (आजरा)

राजश्री पवार (पेरणोली)

वृषाली कोंडूसकर (सोहाळे)

इतर मागास प्रतिनिधी गट

(एक दुबार, दोन अपात्र)

जनार्दन टोपले (आजरा)

गोविंद पाटील (घाटकरवाडी)

रामचंद्र पाटील (घाटकरवाडी)

राजेंद्र मुरूकटे (कानोली)

अभिषेक शिंपी (आजरा)

अबुताहेर तकिलदार (आजरा)

काशिनाथ तेली (होन्याळी)

रशिद पठाण (आजरा)

रियाज तकिलदार (आजरा)

नौशाद बुडेखान (आजरा)

गिरीधर कुराडे (लाकूडवाडी)

विजय गुरव (मुमेवाडी)

मधुकर येलगार (शिरसंगी)

बाजीराव पाटील (कानोली)

भटक्या विमुक्त जाती जमाती गट

(एक दुबार)

कल्लाप्पा नाईक (उत्तूर)

संभाजी पाटील (आजरा)

मालुबाई गवळी (दाभिल)

बयाजी मिसाळ (आवंडी)

बाबू येडगे (आवंडी)

विकास बागडी (कोवाडे)


उद्या स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशनच्या वतीने रक्तदान शिबीर व पुरस्कार वितरण


                   आजरा:प्रतिनिधी

         आजरा येथील स्व. राजारामबापू देसाई फाउंडेशन च्या वतीने राजारामबापूंच्या १६ व्या पुण्यतिथी निमित्त रक्तदान शिबिर व विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार वितरण असा कार्यक्रम रविवार दिनांक १९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष वृषाल हुक्केरी व उपाध्यक्ष युवराज पोवार यांनी दिली.

         आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांच्या अध्यक्षतेखाली व साहित्यिक प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर कार्यक्रम होणार असून श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे होणाऱ्या या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.


आजरा साखर कारखाना निवडणुक बिनविरोध करावी..
सभासद शेतकऱ्यांची मागणी


                       आजरा:प्रतिनिधी

         आजरा साखर कारखाना वाचवण्यासाठी व आजरा तालुक्याचा विकास होण्यासाठी शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला कारखाना हे तालुक्याचे वैभव आहे हा कारखाना सध्या अडचणीत आहे. तो वाचण्यासाठी सर्व पक्ष, गट, तट बाजूला ठेवून उमेदवारांना एकत्र घेऊन जिल्ह्यातील जेष्ठ मंडळींनी यात लक्ष घालून कारखाना बिनविरोध करावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे.

         कारखान्याची निवडणूक घेतल्यास कारखान्यावर ८० ते ९० लाख रुपये आणखी बोजा पडेल त्यामुळे कारखाना आणखीन तोट्यात जाईल अशी भीती आहे. ज्येष्ठ नेत्यांनी यामध्ये लक्ष घालावे व बिनविरोधाचा प्रयत्न व्हावा यासाठी सामाजिक कार्य म्हणून सर्व सन्माननीय उमेदवार यांनी एकत्र यावे व चर्चा करावी. अशी मागणी कॉ. शिवाजी गुरव यांच्यासह काही सभासदांनी केली आहे.


 

 

आज तालुक्यात...

🔴🟣हात्तीवडे येथे शिवसेना व अथायु हॉस्पिटल कोल्हापूर यांचे वतीने मोफत आरोग्य शिबीर


🔴🟣संध्याकाळी ७.०० .वाजता नेहरू चौक उत्तुर येथे माजी खासदार राजू शेट्टी यांची जाहीर सभा


संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!