
सुळे येथे एकाची आत्महत्या

सुळे (ता. आजरा) येथे माळाप्पा मारुती कुरबर (वय २१, मूळ गाव रा. यादगुड ता. हुक्केरी जि. बेळगावी राज्य कर्नाटक) याने गोठ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास सदर प्रकार घडला.
याबाबतची वर्दी मलिकार्जुन मारुती कुरबर (वय २३,व्यवसाय शेती रा. यादगुड ता. हुक्केरी जि. बेळगावी ) यांनी पोलिसात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की,यातील मयत हा वर्दीदार यांचा लहान भाऊ असुन वरील तारखेस वेळी व ठिकाणी मयत याने अज्ञात कारणावरुन प्रकाश धोंडीराम केसरकर रा. सुळे धनगरवाडा ता. आजरा यांचे राहते घराचे पाठिमागील जनावारांचे गोठ्याच्या छतास असणाऱ्या लोंखडी बारला दोरीने बांधून गळफास लावुन घेतला.यात त्यांचा मृत्यू झाला.
पुढील तपास आजरा पोलीस करीत आहेत.
कोल्हापूर जिल्हा गिरणी कामगार व वारस यांचा जाहिर मेळावा.

गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्था मुंबईचे कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी व सहकारी यांचे सहकार्याने कोल्हापूर जिल्हयातील सर्व गिरणी कामगार व वारस यांचे म्हाडा लिंक वर मिल वर्कर्स इलिजिबिलीटी फार्म अपडेट करणेचे शासकीय काम व गिरणी कामगारांच्या इतर समस्या सोडवण्यासाठी रविवार दि. २४ रोजी सकाळी ९.३० वा. गंगामाई वाचनालय, आजरा येथे मेळावा आयोजित करण्यात आला असून बहुसंख्य गिरणी कामगार व वारस यांनी यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
तसेच येताना प्रत्येक गिरणी कामगार/वारसदार यांनी आपले आधारकार्ड आधारकार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर सोबत घेऊन येणे आवश्यक आहे. तसेच आपण म्हाडाच्या खोल्या मिळणे करीता गेली तीस वर्षे वेंटिंग लिस्ट मध्ये आहात पण म्हाडाच्या या लिंक अपडेट करण्याचे महत्त्वाचे काम सदर मेळाव्याला येऊन आपले मिल वर्कर्स पात्रता (Mill Worker Eligibility) सिध्द करणेचे काम करून घ्यावे.
तसेच सदर काम हे जबाबदार व कॉप्युटरची माहिती असलेल्या तज्ञ व्यक्तींच्या मार्फत निशुल्क करून देणेचे संघटनेमार्फत ठरविलेले आहे. तरी यांचा लाभ जास्तीत जास्त गिरणी कामगार / वारसदार यांनी घ्यावा असेही संयोजकांनी स्पष्ट केले आहे.

गोंधळ बिगर शेतीचा…
तेरी भी चूप… मेरी भी चूप…(बिगरशेती भूखंडाचे श्रीखंड)
तालुक्यात जमिनी बिगरशेती होत असताना वापरले जाणारे अनेक फंडे आता चर्चेत येऊ लागले आहेत. प्रशासन आपल्या खिशात अशा पद्धतीने या क्षेत्रात काम करणारी मंडळी वावरत असल्याने व प्रशासनातील मंडळींचे होणारे दुर्लक्ष पाहता खरोखरच प्रशासन अशा मंडळींच्या हातात आहे असे म्हणण्यास हरकत नाही.
तालुक्यात शेकडो एकर जमिनींचे बिगरशेती करण करण्याचे काम वेगाने सुरू आहे. साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा वापर करून सुरू असणाऱ्या या बिगर शेती प्रकरणांच्या फायलींमध्ये बराच गोंधळ असून काही ठिकाणी तर चक्क विविध विभागांचे खोटे दाखले जोडले गेल्याचेही दबक्या आवाजात चर्चा आहे. काही चलाख मंडळींनी माहितीच्या अधिकाराचा पद्धतशीरपणे वापर करून ‘चोरावर मोर ‘ बनत अशा मंडळींकडून मोठ्या प्रमाणात रकमा उकळल्या असल्याचेही समजते. गेल्या काही वर्षातील बिगर शेती प्रकरणांच्या फायलिंच्या कागदपत्रांचे क्रॉस चेकिंग केल्यास अनेक धक्कादायक प्रकार समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिगर शेती प्रकरणातील सर्व प्रकार बिनबोभाटपणे सुरू असताना प्रशासन नेमके काय करत आहे ? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे. सर्वसामान्यांना एखादा दाखला मिळवताना होणारी त्यांची दमछाक पाहता बिगर शेती करता लागणारी विविध कागदपत्रे झटक्यात जमा करणे कसे काय शक्य होते ? या एकाच प्रश्नाच्या उत्तरात कितीतरी प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत.
कोल्हापुरात शिवसेना ठाकरे-शिंदे गटातील वाद गणेश मूर्तीपर्यंत पोहचला ; पक्ष, चिन्हानंतर आता एकाच मंडळावर दावा !

♦️कोल्हापूर : शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटामध्ये पक्ष आणि चिन्हांवरून गेल्या दीड वर्षांपासून राजकीय आणि न्यायालयीन लढा सुरु असतानाच आता चक्क एका गणपती मंडळापर्यंत हा वाद येऊन पोहोचला आहे.
कोल्हापूर शहरामध्ये शिवाजी चौकातील छत्रपती शिवाजी चौक संयुक्त मित्र मंडळामध्येही पक्षातील वादामुळे ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, पोलिसांसोबत झालेल्या बैठकीत ज्यांनी मंडळ स्थापन केलं आहे त्यांनी मुर्तीची प्रतिष्ठापना करावी, आणि राजकीय गटांनी दूर राहावे, असा तोडगा काढण्यात आला होता. मात्र, रात्रीत त्याठिकाणी शिंदे गटाकडून २१ फुटी मूर्ती बसवण्यात आल्याने ठाकरे गट आक्रमक झाला.
शिंदे गटाने मूर्ती बसवल्याने वाद…?
दोन्ही गट आमनेसामने आल्याने याठिकाणी आमने सामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला. शिंदे गटाने बैठकीनंतरही २१ फुट मुर्ती बसवल्याने वादाला तोंड फुटले. त्यामुळे संतापलेल्या ठाकरे गटाकडूनही क्रियेला प्रतिक्रिया म्हणून त्याच मंडपात २१ फुटी मूर्ती बसवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.
शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट
छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या शिवाजी चौक संयुक्त मित्रमंडळामध्ये शिवसेना पक्षातील राजकीय वादामुळे दोन गट पडले आहेत. त्यामुळे मंडळात ठाकरे आणि शिंदे गट असे दोन गट निर्माण झाले आहेत. त्यामुळे या मंडळाची मूर्तीची प्रतिष्ठापना कोण करणार? यावरुन वाद निर्माण झाला होता. म्हणूनच या ठिकाणी स्थापन केलेल्यांनी गणेशोत्सव साजरा करावा, दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी यामध्ये सहभागी होऊ नये असे पोलिस प्रशासन व झालेल्या बैठकीत ठरविण्यात आले होते. मात्र, शिंदे गटाने मूर्ती बसवल्याने वादाची ठिणगी पडली. हा सर्व प्रकार सुरू असताना त्याठिकाणी शिंदे गटाचे माजी आमदार राजेश क्षीरसागर पोहोचले. त्यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्याची मागणी केली.
News Source :-
https://chat.whatsapp.com/JdTscwkK04n3RWNSijpnIq

धनगरमोळा येथे विविध स्पर्धांचे आयोजन

श्री आदर्श कला ,क्रीडा व सांस्कृतिक मंडळ धनगरमोळा यांच्या वतीने विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन व सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
दिनांक २४ रोजी दुपारी १२ ते ५ या वेळेत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यानसाठी तालुकास्तरीय चित्रकला, हस्ताक्षर स्पर्धा आयोजित केली आहे.
ही स्पर्धा …लहान गट १ ते ४ थी. मध्यम गट ५ ते ७ वी.मोठा गट ८ वी ते १२ वी अश्या तीन गटात आयोजित केलेली असून प्रत्येक गटात रोख रू.१००१/- ,७०१/-,५०१/- अशी प्रत्येक स्पर्धेत स्पर्धकांना बक्षीसे ठेवलेली आहेत.
दिनांक २४ व २५ रोजी जिल्हा स्तरीय भजनी
स्पर्धा चे दिवभर आयोजन केलेले असून यातील पहिल्या तीन क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे रोख रू. ५००१/-, ३००१/- व २००१/-
ह्या प्रमाणे बक्षीसे ठेवलेली असुन उत्कृष्ट गायक,वादक आणि हार्मोनियम वादक यांस प्रत्येकी रोख रु.५०१/- अशी बक्षीसे ठेवलेली आहेत.
दिनांक २६ सप्टे. रोजी तालुक्यांतील सर्व महिलांसाठी तालुका स्तरीय मंगळागौर व झिम्मा फुगडी स्पर्धा सांघिक स्वरूपात व वैयक्तिक स्वरूपात दुपारी १२ ते रात्री ८ दरम्यान आयोजन केलेले आहे . सांघिक प्रथम संघास रोख रु.५००१/-, द्वितीय संघास ३००१/- तृतीय संघास २००१/- अशी बक्षीसे ठेवलेली आहेत.
वैयक्तिक स्वरूपात प्रथम क्रमांक १००१/- द्वितीय क्रमांक ७०१/- ,तृतीय क्रमांक ५०१/- अशी बक्षीसे ठेवलेली आहेत .
सर्व स्पर्धामध्ये मोफत प्रवेश असून
ज्या भजनी मंडळाना, मंगळागौर व झिम्मा फुगडी महिला संघांना ,महिलांना व शालेय विद्यार्थ्यांना सहभाग घ्यायचा असेल त्यांनी मंडळाचे
अध्यक्ष- प्रकाश मोरूस्कर(९१३०३५८०२०)उपाध्यक्ष- नामदेव जाधव (७७९५७२३१६५)कोषाध्यक्ष – संतोष शेटगे (७८७५२६ ११३९)
सचिव- तुषार खरुडे (८३०८५२०३९७)
यांच्याकडे नावनोंदणी करावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

गणेश दर्शन :-
सुभाष चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,आजरा
(वर्ष ३८ वे )

अध्यक्ष :- शंकर उर्फ भैया टोपले उपाध्यक्ष :- महांतेश गुंजाटी सचिव :- राजेश विभुते / नितीन कारेकर खजिनदार :- रोहित कारेकर
(महाप्रसाद सोमवार दिनांक २५ रोजी)



