mrityunjaymahanews
अन्य

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

भावेवाडी येथे अपघातात जेऊर येथील एक जण ठार

भावेवाडी( ता. आजरा) येथे आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास जेऊर येथील शामराव कृष्णा गुडुळकर या पन्नास वर्षीय व्यक्तीचा मोटरसायकल वरील ताबा सुटून मोटरसायकल ओढ्यात पडून झालेल्या अपघातात दुर्दैवी अंत झाला.

गुडूळकर हे म्हाळुंगे येथील यात्रेनिमित्त जेऊर येथून मोटरसायकलने चालले होते. दरम्यान भावेवाडी येथील तीव्र उताराला त्यांचा मोटरसायकलवरील ताबा सुटल्याने मोटरसायकल १५ ते २० फूट खोल ओढ्यामध्ये  कोसळली. यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व ते जागीच ठार झाले.

मुंबई येथे कामानिमित्त स्थायिक असणारे गुडूळकर हे गावी घर बांधण्याच्या निमित्ताने गेले वर्षभर जेऊर येथे आले होते त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुली, मुलगा, जावई असा परिवार आहे.

संबंधित पोस्ट

मंगळवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

BREAKING NEWS…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

लक्ष्मण कुंभार – परळकर यांचे निधन…

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!