mrityunjaymahanews
अन्यकोल्हापूरठळक बातम्यामहाराष्ट्र

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

गवसेत आमदार आबिटकर यांच्या हस्ते आरोग्यकेंद्राचे उद्या भूमीपूजन

गवसे (ता. आजरा) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी मागणी गेली अनेक वर्षापासून पश्चिम भागातील जनतेतून मागणी होत होती. या केंद्रासाठी आमदार प्रकाश आबिटकर यांनी पाठपुरावा ६ कोटी ६४ लाखांचा निधी मंजूर केला आहे. या आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम उद्या मंगळवार (ता. १४) रोजी आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते होत आहे. दुर्गम व डोंगराळ भागातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याने गवसे पंचक्रोशितून समाधान व्यक्त होत आहे.

तालुक्यात उत्तूर ,मलिग्रे, भादवण व वाटंगी अशी चार प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. पश्चिम भागातील पंधरा सोळा गावे ही वाटंगी प्राथमिक आरोग्य केंद्राला जोडलेली आहेत. येथील ग्रामस्थांना उपचार व आरोग्य सुविधांसाठी सुमारे अठ्ठावीस किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. त्यामुळे रुग्णावर वेळेत उपचार होत नाही अशी स्थिती आहे. त्याचबरोबर वाटंगी आरोग्य केंद्रावरही दुर्गम व डोंगराळ भागातील गावात आरोग्याच्या स्विधा देण्यासाठी मोठा ताण आहे. गवसे येथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरु झाल्यावर हा ताण कमी होणार असून जनतेलाही तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहे. याबाबत पंचायत समिती सभेत अनेकदा पाठपुरावा व ठराव झाले आहेत. आमदार आबिटकरांनी याबाबत पाठपुरावा केला असून याला मुहूर्त स्वरुप मिळणार आहे. या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, अण्णा भाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई,माजी सभापती उदयराज पवार, सौ. रचना होलम, पंचायत समिती सदस्य बशीर खेडेकर, नगराध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना चराटी, उपनगराध्यक्षा सौ.अस्मिता जाधव, गवसेच्या सरपंच सोनाली पाटील, आजऱ्याचे तहसीलदार विकास अहिर, गट विकास अधिकारी दाजी दाईंगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. यशवंत सोनवणे, उपसरपंच व विविध संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

वाटंगी येथील सन्मित्र पतसंस्थेच्या चेअरमनपदी अल्बर्ट डिसोझा

वाटंगी येथील सन्मित्र पतसंस्थेच्या चेअरमनपदी अल्बर्ट डिसोझा यांची तर व्हा. चेअमनपदी भिमराव सुतार यांची निवड करण्यात आली. सहाय्यक निंबधक निवडणूक निर्णय अधिकारी एस. व्ही. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत या निवडी पार पडल्या.

स्वागत शाखाधिकारी विजय पोवार यांनी केले. चेअरमनपदासाठी डिसोझा यांचे नाव संचालक मार्शल मिनिंजीस यांनी सुचविले. त्यास दत्तात्रय डोंगरे यांनी अनुमोदन दिले. व्हा. चेअरमनपदासाठी सुतार यांचे नाव केरेबिन नोरेंज यांनी सुचविले. त्यास पांडूरंग माने यांनी अनुमोदन दिले. यानंतर नूतन चेअरमन डिसोझा यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नूतन संचालक केरेबिन नोरेंज, पांडूरंग माने, मार्शल मिनिंजीस, दत्तात्रय डोंगरे, बाबुराव चौगुले, विश्वास कांबळे, केरोलिन डिसोझा यांच्यासह संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

राजकीय घडामोडी

mrityunjay mahanews

अज्ञात वाहनाच्या धडकेत शेतकऱ्याचा मृत्यू

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews
error: Content is protected !!