mrityunjaymahanews
गुन्हाठळक बातम्यामहाराष्ट्र

बहिरेवाडीत चोरट्यांचा धमाकूळ…

 

बहिरेवाडीत चोरट्यांचा धमाकूळ…

पाच ठिकाणी घरफोड्या… पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

 

 

आजरा तालुक्यातील बहिरेवाडी येथे रविवारी चोरट्यानी धुमाकूळ घालत पाच ठिकाणी घरफोड्या करून संसारोपयोगी साहित्यासह सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास केल्याने बहिरेवाडी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आजरा पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

याबाबत आजरा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बहिरेवाडी (ता. आजरा) येथील सौ. हौसाबाई गुंडू तावडे, गणपती आप्पा जोंधळे, अशोक भैरू आढावकर, साधना सुनील सावंत, काशव्वा रामचंद्र पोरे यांच्या राहत्या घरी अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कडी कोयंडे तोडून प्रवेश करून घरातील रोख रक्कमांसह सोन्या चांदीचे दागिने व संसारोपयोगी साहित्य लंपास केले आहे.

 

सोन्या-चांदीच्या दागिन्यावर व रोख रकमेवर डल्ला मारण्याबरोबरच चोरट्यांनी चक्क सोयाबीन व जोंधळ्याची पोतीही लंपास केली आहेत.

याबाबतची फिर्याद सौ. हौसाबाई गुंडू तावडे यांनी पोलिसात दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

एकाच वेळी पाच ठिकाणी घरफोड्या झाल्याने बहिरेवाडी पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

 

संबंधित पोस्ट

होण्याळी येथून महाविद्यालयीन तरुणी बेपत्ता…आजरा तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात…सोमवारी आजरा येथे शिवप्रेमींची बैठक

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

चिमणे येथील एकाचा चिकोत्रा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू

mrityunjay mahanews

आंबोली घाटात चिरा डंपर कोसळला…सौ. संजीवनी सावंत यांचा आंतरराज्य पुरस्काराने गौरव…क्रीडा स्पर्धेत आजरा महाविद्यालयाचे घवघवीत यश…चंद्रशेखर फडणीस यांची निवड

mrityunjay mahanews

आजरा -आंबोली मार्गावर वेळवटटी नजीक ‘दि बर्निंग’ कारचा थरार

mrityunjay mahanews
error: Content is protected !!