





राजकुमार राजहंस अखेर गजाआड
चंदगड:: प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील ढोलगरवाडी येथील अमली पदार्थ निर्मिती प्रकरणातील मुख्य आरोपी राजकुमार राजहंसला मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाने मुंबई येथे आज अटक केली आहे. मुंबई क्राइम ब्रँचच्या पथकाने दोन कोटी 35 लाख रुपयांचा मुद्देमाल ढोलगरवाडी येथील या अमली पदार्थ निर्मिती कारखान्यातून हस्तगत केला होता.या प्रकरणांमध्ये महिलेसह दोघांना अटक ही झाली आहे प्रकरणातील मुख्य संशयित राजकुमार अर्जुनराव राजहंस याचा पोलिस शोध घेत होते आज त्याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले . चार दिवस या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्हा तर हादरुन गेला होता. गोवा आणि कर्नाटकच्या सीमेवर असलेल्या चंदगड तालुक्यातील अवैद्य धंद्यांचा कारभार या प्रकरणामुळे अधोरेखित झाला आहे. आयेशा आणि निखिल लोहार यांना अटक केल्यानंतर पोलीस राजकुमारच्या शोधात होते.
आजरा येथून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
आजरा: विशेष प्रतिनिधी
आजरा- आंबोली मार्गावर असणाऱ्या चराटी यांच्या पेट्रोल पंपाशेजारी ट्रॅव्हल्स ऑफिस समोर उभा करण्यात आलेली हिरो कंपनीची स्प्लेंडर दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविली. या बाबतची फिर्याद मारुती जोतीबा जाधव (वय ३२ रा. कोळींद्रे) यांनी आजरा पोलिसात दिली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

