mrityunjaymahanews
अन्य

BREAKING NEWS…

मंगळवार

१८ ऑगस्ट २०२६

बेपत्ता शेतकऱ्याचा मृतदेह नदीपात्रात आढळला


आजरा : मृत्युंजय महान्यूज वृत्तसेवा

मासेवाडी तालुका आजरा येथील विठ्ठल अण्णाप्पा पाटील या गेल्या शुक्रवारपासून बेपत्ता असलेल्या ४५ वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह आज मंगळवारी दुपारच्या दरम्यान कोवाडे गावच्या हद्दीतील हिरण्यकेशी नदीपात्रात तरंगताना आढळला.

मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढण्यात आला असून आजरा पोलीस पुढील तपास करीत आहे.

पाटील यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई असा परिवार आहे.

उत्तूर येथे ३९ जणांची कॅन्सर तपासणी

उत्तूर : मंदार हाळवणकर 

सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून सार्वजनिक आरोग्य विभाग, कोल्हापूर यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत उत्तूर यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१८ ऑगस्ट) कॅन्सर तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात तोंड, स्तन व गर्भाशयाच्या कॅन्सरसाठी एकूण ३९ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चेतन शिखरे व दंतचिकित्सक डॉ. तेजस्विनी पोवार यांनी रुग्णांची तपासणी केली. शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांच्या हस्ते झाले. वैद्यकीय अधिकारी डॉ. सौरभ कसबे यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर आरोग्य सहायक अनिल कुरणे यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी पंचायत समिती सदस्य विकास चोथे, विस्तार अधिकारी विनायक काटकर, सरपंच किरण आमनगी, सरपंच रूपाली पाटील, सरपंच रत्नजा सावंत, माजी उपसरपंच समीक्षा देसाई, ग्रामपंचायत सदस्य तसेच आरोग्य समिती सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी, आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तक व ग्रामस्थ उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

गुरुवार – सातच्या बातम्या

mrityunjay mahanews

mrityunjay mahanews
error: Content is protected !!